Friday, September 30, 2011

मध्य प्रदेशात सापडले मंदिरांचं 'बेट'!

मध्य प्रदेशात खजुराहोपेक्षाही ३00 वर्षं जुन्या मंदिरांचं उत्खनन सध्या सुरू आहे.. खजुराहोची मंदिरं हे मध्य प्रदेशातील जगप्रसिद्धपर्यटनस्थळ.. कामशास्त्रावर आधारित शिल्पांमुळे खजुराहोच्या पुरातन मंदिरांना वेगळं वलय प्राप्त झाले आहे. मात्र या मंदिरांपेक्षा तब्बल ३00 वर्षं आधीची, अतिप्राचीन मंदिरं मध्यप्रदेशातल्या मोरेना जिल्ह्यात चंबळ नदीच्या खोर्‍यात सापडली आहेत. 'बटेश्‍वर मंदिर' या नावानं ओळखल्या जाणार्‍या या १0 हेक्टर क्षेत्रफळाच्या वास्तूत तब्बल २00 लहान-मोठी मंदिरं आहेत. यातील बहुतांशमंदिरं शंकर किंवा विष्णुची आहेत. भारतीय पुरातत्व विभागाच्या दिल्ली सर्कलचे अधीक्षक के.के. मोहम्मद यांनी या मंदिरांची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. सर्वप्रथम १९९४ साली या मंदिराचे अवशेषमिळाले होते. त्यानंतर २00५ साली पुरातत्व खात्यानं या क्षेत्रात उत्खनन सुरू केल्यानंतर बटेश्‍वर मंदिराची ही अतिभव्य जागा जगासमोर आली. आणखी किमान १0 वर्षं हे उत्खननाचं काम चालेल, इतकी ही वास्तू भव्य आहे. 'आर्यावर्ताचे महाराजाधिराज' अशी उपाधी धारण करणार्‍या गुर्जर प्रतिहार राज्यकर्त्यांनी ही मंदिरं उभारली आहेत. इसवी सनाच्या ६ ते ११व्या शतकात गुर्जर प्रतिहार घराण्याची उत्तर भारतातल्या बर्‍याच भागात सत्ता होती.
■ मोहम्मद यांनी या निमित्तानं एक महत्त्वाचा विषय छेडला आहे.. देशात अशा अनेक पुरातन वास्तू असून त्यांचं योग्य संवर्धन व्हायला हवं असेल, तर हा विषय शालेय अभ्यासक्रमात घेतला जायला हवा, असं मत त्यांनी मांडलं आहे.
( दैनिक लोकमत, पान ६, ३० सप्टे. २०११)

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी