अखेरचा भाग
एन्ट्रो-
सेवा
हा धर्म आहे पण, सेवेने धर्मतत्त्वांना ग्लानी आणून धर्मांतरणाचा कुटिल
डाव खेळणे हे पापच आहे. आधी त्यांनी व्यापाराचे निमित्त करून देश गुलाम
केला.आता सेवेचा बुरखा पांघरून देश बाटविण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे.
‘चर्चचे वास्तव’मध्ये आम्ही अधिकमासात माहितीचा यज्ञ केला. ते सारेच
ज्यांनी थांबवायला हवे त्यांना माहितीच नाही, असे नाही. पण सत्ताकारणात
त्यांनी डोळे झापडबंद केले आहेत. त्यांना हलविण्यासाठी हा आमचा प्रपंच
नव्हताच. सामान्य हिंदूंनी जागे व्हावे,त्यांना वास्तव कळावे अन् हा देश
पुन्हा एकदा गुलामगिरीत जाण्यापासून रोखावा, म्हणूनच हा ज्ञानयज्ञ
प्रज्वलित केला होता. ‘आम्ही काय करणार?’ असा अगतिक सवाल किमान तभाच्या
वाचकांनी तरी विचारू नये
कैसे आकाश को सुराख हो नही सकताएक पत्थर तो जरा तबीयत सें उछांलों यारों
चर्चचे वास्तव - ३१
अमेरिकी ध्येय-धोरणांमध्येही वरचढ असणार्या शक्ती
चारुदत्त कहू
नागपूर, ३१ सप्टेंबर
द युनायटेड स्टेटस् एजन्सी फॉर इंटरनॅशनल
डेव्हलपमेंट (युएसएआयडी) ही अमेरिकी सरकारची निरनिराळ्या देशांना देण्यात
येणार्या मदत निधीचे संचालन करणारी संस्था आहे. लायबेरियाच्या १४
वर्षांच्या गृहयुद्धानंतर युएसएआयडीने २००५ मध्ये वर्ल्ड व्हिजनला कॅथॉलिक
रिलिफ सर्व्हिसेसमार्फत १.९ मिलियन अमेरिकी डॉलर्सचे अनुदान मंजूर केले.
लायबेरियातील समाज पुनर्बांधणीच्या दोन वर्षांच्या मानवतावादी प्रकल्पासाठी
ही मदत जाहीर करण्यात आली होती. तथापि, ही मदत लायबेरियाच्या गरीब
जनेतपर्यंत आजतागायत पोहोचलेली नाही.