निमित्त होते 'लोकसत्ता' आयोजित 'आयडिया
एक्स्चेंज' या कार्यक्रमाचे. गडकरी
यांनी 'प्रतिमा विरुद्ध वास्तव' आणि 'धारणा विरुद्ध वास्तव' ही पक्षाची
मुख्य समस्या असल्याचे यावेळी ठामपणे सांगितले. मेधा पाटकर यांचे ऐकले
असते तर मुंबईत एकही पूल बांधला गेला नसता, अशी माहितीही त्यांनी दिली....
गिरीश कुबेर - गडकरींचा कार्यक्रम कधी चुकवायचा नसतो. त्यांच्या एका कार्यक्रमात दोन कार्यक्रम असतात. जेवण आणि गप्पा. त्यांच्याकडे जेवायला जाण्यापूर्वी २४ तास आधी काहीही खायचं नसतं आणि दुसऱ्या राजकारण्याविषयी बोलायचे नसते. त्यांच्या गप्पा श्रवणीय आणि प्रेक्षणीय असतात. सर्वाच्या मनातील प्रश्न विचारतो, भाजपमध्ये सध्या नक्की चाललंय काय?
नितीन गडकरी - भाजपमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे. मी आता दिल्लीत आहे. विविध वाहिन्यांना मुलाखती देतो, तेव्हा तेही सगळं व्यवस्थित सुरू आहे, असे सांगतात. तुम्हीही ऐकलं असेल दोन वर्षांत भाजपमध्ये सर्व सुरळीत सुरू आहे. आमचा प्रॉब्लेम आहे तो इमेज वर्सेस रिअॅलिटी आणि पर्सेप्शन वर्सेस ग्राऊण्ड रिअॅलिटी. आम्ही लोकतांत्रिक पक्ष आहोत, फॅमिली पार्टी नाही.