Sunday, December 18, 2011

श्रीकृष्णावरही चालला होता मजेशीर खटला

भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात अनेक देशभक्तांना प्रेरणादायी ठरलेल्या भगवत गीतेवर बंदी आणण्याचा प्रयत्न रशियात सुरु आहे. २००७ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने भगवत गीतेला भारताचे राष्ट्रीय धर्मशास्त्र घोषित करावे, असे म्हटले होते. http://divyamarathi.bhaskar.com//article/REL-bhagadgeeta-russia-ban-2650519.html
 

लो. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतेवर भाष्य करणारा 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला होता. मदनलाल धिंग्रा यांनी फासावर जाताना आपल्या हातात भगवत गीता धारण केली होती. भगवत गीता हा हिंदू धर्मियांचा एक पवित्र ग्रंथ आहे. काळाच्या कसोटीवर उतरलेल्या या ग्रंथात जीवनाचे तत्त्वज्ञान आहे.
भगवान श्रीकृष्णाने भगवत गीतेच्या माध्यमातून जगाला सोप्या पद्धतीने जगण्याची कला शिकविली आहे. तरीही रशियात भगवत गीतेला भावना भडकविणारे साहित्य ठरविण्याचा प्रयत्न सुरु आहे. याआधी भगवान श्रीकृष्णावरच खटला चालविण्याचा मजेशीर प्रकारही पोलंड या देशात झाला होता.
२०११ सालच्या सुरवातीलाच हा मजेशीर खटला गाजला. 'इस्कॉन' अर्थात 'इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्ण कान्शसनेस' या संघटनेविरुद्ध युरोपच्या पोलंड देशातील एका ख्रिश्चन भिक्षुणीने (नन) खटला भरला होता. तिचे म्हणणे होते की, ही संस्था 'कृष्ण' नावाच्या व्यक्तीचा उदोउदो करते व त्याद्वारे नीतिभ्रष्टतेचा प्रचार करते. या कृष्णाने १६ हजार बायकांशी लग्न केले होते. प्रकरण न्यायालयात गेले. तेव्हा इस्कॉनच्या वकिलाने, न्यायाधीशाला म्हटले, या भिक्षुणीने, भिक्षुणीचे व्रत स्वीकारताना जी शपथ घेतली. ती तिने येथे म्हणून दाखवावी. न्यायाधीशाने तिला शपथेचा उच्चार करायला सांगितले. पण तिने ती शपथ उच्चारण्यास नकार दिला. मग इस्कॉनच्या वकिलानेच ती शपथ वाचून दाखविली. त्या शपथेचा मुख्य अर्थ असा की, ''तिने आता येशूशी विवाह केला आहे.'' वकील म्हणाले, कृष्णाने फक्त १६ हजार स्त्रियांशीच विवाह केला होता आणि ज्यांनी येशूशी लग्न केले आहे, अशा भिक्षुणींची संख्या तर लक्षावधी आहे. आता आपणच सांगा की, येशू आणि कृष्ण यात कोण अधिक नीतिभ्रष्ट आहे?' न्यायाधीशाने अर्थात खटला खारीज केला.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी