Thursday, January 9, 2014

स्वामी विवेकानंद : संगम अध्यात्म आणि विज्ञानाचा

विज्ञान आणि अध्यात्म, युवा विचार आणि बुजुर्ग चिंतन अशा कित्येक द्वंद्वांचा अद्भुत संगम म्हणजे स्वामी विवेकानंद. 12 जानेवारीला स्वामीजींची 151 वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त..

सिद्धाराम भै. पाटील, सोलापूर



जगाने आजवर पाहिलेले उदात्त विचार आणि महान संस्कृतीचे स्वामी विवेकानंद हे प्रतिनिधी होते. अज्ञान, अंधर्शद्धा आणि खुळचट समजुतींच्या चिखलात खितपत पडलेला देश अशी भारताची प्रतिमा झाली होती; परंतु विवेकानंदांनी सिद्ध करून दाखवले की, भारत ही सर्वाधिक विकसित संस्कृती असलेली आणि परिपूर्ण तत्त्वज्ञान लाभलेली भूमी आहे. प्रागतिक विचारांची विशालता आणि उदात्त परंपरा यांचा सुरेख संगम स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो.

स्वामी विवेकानंदांनी पाश्?चात्त्य आणि पौर्वात्य विचारधारांचे विविध प्रवाह सारख्या प्रमाणात आत्मसात केले होते. ते पूर्णपणे देशभक्त होते आणि ख?र्‍या अर्थाने या जगाचे नागरिकसुद्धा. खरे तर यात विरोधाभास काहीच नाही. कारण ते संपूर्ण चराचरात एकत्व पाहणा?र्‍या भारतीय तत्त्वज्ञानाचे दूत होते. विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता.
स्वामी विवेकानंदांनी निकोलस टेस्ला, जगदीशचंद्र बसू यांच्यासह अनेक जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांना प्रेरित केल्याचे दिसते. ‘राजयोग’सारख्या ग्रंथामध्ये स्वामीजींनी अनेक विज्ञाननिष्ठ उदाहरणे दिली आहेत. दूषित पाण्यापासून होणा?र्‍या आजारांची माहिती सांगून पाणी शुद्ध करण्यासाठीच्या नवीन संशोधनाची माहितीही स्वामीजी गुरुबंधूंना पत्रांतून देतात.
भारताने पाश्?चात्त्यांकडून विज्ञान शिकायचे आहे आणि भारताने जगाला अध्यात्म द्यायचे आहे, असेही स्वामीजी सांगतात. ते म्हणतात, ‘अध्यात्माचा संदेश देणे म्हणजे तत्त्वज्ञान देणे आहे. आपण वर्षानुवर्षे छातीशी कवटाळून बसलो आहोत त्या अंधर्शद्धा आणि रूढी देणे नव्हे. त्या आपल्याला आपल्या देशातही नष्ट करायच्या आहेत, फेकून द्यायच्या आहेत. त्या कायमच्या संपाव्यात यासाठी त्यागायच्या आहेत.’ (खंड 3, पृष्ठ 277-278)
मद्रास विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी बोलताना ते म्हणाले की, ‘हे सांगण्याची गरज वाटत नाही की, पाश्?चात्त्य देशातल्या आधुनिक संशोधकांनीही भौतिक साधनांच्या मदतीने या विश्?वाचे एकत्व कसे सिद्ध केलेले आहे. भौतिकशास्त्राच्या भाषेत बोलायचे झाले तर तुम्ही आणि मी, सूर्य, चंद्र, तारे हे या जड वस्तूंनी बनलेल्या अनंत महासागरातल्या लाटा किंवा तरंग आहोत हे तुम्हाला माहीत आहेच. अगदी आपल्या पूर्वजांनीही असेच म्हटले आहे. हे शरीर, हे मन ही केवळ नावे आहेत किंवा या जड जगतरूपी सागरातले छोटे तरंग आहेत. सृष्टीची रूपे आहेत. वेदांतानेही असेच दाखवून दिले आहे की, या सगळ्या एकत्वाच्या आविष्कारामागे असलेला खरा आत्मा एकच आहे. या विश्वात एकच आत्मा आहे. सारे काही एकच अस्तित्व आहे. ही ख?र्‍या आणि मूलभूत एकत्वाची कल्पनाच जगाला आपल्याकडून हवी आहे. भारतातल्या मूक जनसमुदायाला हीच जीवनदायी कल्पना त्यांच्या उत्कर्षासाठी हवी आहे. या कल्पनेचा व्यवहारात अंमल, उपयोजन आणि प्रभावी प्रयोग केल्याशिवाय कोणालाही या पवित्र भूमीचे पुनरुज्जीवन करता येणार नाही.’ (खंड 3, पृष्ठ 188-189)
स्वामीजी आपल्याला सांगतात की, आधुनिक विज्ञानातले आणि वेदांतातले निष्कर्ष सारखेच आहेत. यातले वेदांतातले निष्कर्ष फार वर्षांपूर्वी काढले गेले आहेत, तर आधुनिक शास्त्रात ते जडवादी भाषेत लिहिले गेले आहेत. या ठिकाणी वेदांताचा आधुनिक वैज्ञानिक मनापेक्षा अधिक तर्कशुद्ध असल्याचा दावा खरा ठरतो. सध्याच्या युगातल्या काही पाश्?चात्त्य शास्त्रज्ञांनी, वेदांतातील निष्कर्ष कसे आश्?चर्यकारक तर्कशुद्ध आहेत, हे माझ्याशी बोलताना प्रतिपादन केले आहे. त्यातला एक शास्त्रज्ञ तर अहोरात्र प्रयोगशाळेत गुंतलेला असतानाही वेदांतावरची प्रवचने ऐकण्यासाठी वेळ काढत असल्याची आठवण स्वामीजी सांगत असत. वेदांतातील निष्कर्ष आधुनिक काळातल्या आशा, आकांक्षांशी सूर जुळवणारे आहेतच. पण, विज्ञानातील निष्कर्षांशी मिळतेजुळतेही आहेत. (खंड 3, पृष्ठ 185)
23 नोव्हेंबर 1898 ला जमशेदजी टाटा यांनी विवेकानंदांना पत्र लिहिले. भारतातील विज्ञान संशोधन संस्थेचे नेतृत्व विवेकानंदांनी करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. (टू टेक द लीडरशिप ऑफ अ रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सायन्स इन इंडिया) हीच संस्था पुढे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू या नावाने प्रसिद्धीस आली. जमशेदजी व विवेकानंदांनी 1893 मध्ये जपान ते अमेरिका सोबत प्रवास केला होता. जमशेदजी हे पोलाद उद्योग भारतात आणण्याच्या ध्येयाने पछाडले होते. विवेकानंदांनी त्यांना सुचवले की, फक्त साधनसामग्री आणून चालणार नाही, तर तुम्हाला ‘साधनसामग्रीचे तंत्रज्ञान भारतातच उभे करता आले पाहिजे.’ म्हणून जमशेदजी आध्यात्मिक प्रेरणा विज्ञानात आणू इच्छित होते. त्यांनी विवेकानंदांना पाठवलेल्या आमंत्रणपत्रात म्हटले आहे, (विज्ञान संशोधन संस्था उभी करण्यासाठी) ‘ही योजना यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्याशिवाय दुसरे नाव आता माझ्यापुढे नाही.’
स्वामी विवेकानंदांनी हॉर्वर्ड विद्यापीठात 25 मार्च 1896 रोजी दिलेले व्याख्यान आधुनिक युवकांसाठी हिंदू धर्मग्रंथाचा सारांश म्हणावा लागेल.
स्वामी विवेकानंदांनी 100 वर्षांपूर्वी सांगितल्याप्रमाणे आधुनिक विज्ञानात (सापेक्षवादाचा सिद्धांत असो किंवा विश्?व उत्पत्तीचा नियम) अद्वैत वेदांताच्या विरोधी असे काहीही नाही. ही एक कुतूहलाची बाब आहे की, निर्जीव वस्तूमधील अणु, दूरवर असलेली आकाशगंगा आणि आपले अस्तित्व हे सर्व एकाच नियमाने नियंत्रित आहेत. सगळीकडे एकच अस्तित्व आहे, हा वेदांताचा गाभा आहे. प्रत्येक जीव हा पूर्ण आहे. त्या अस्तित्वाचा एखादा तुकडा नव्हे, असे स्वामी विवेकानंदांनी स्पष्ट केले आहे.
(लेखासाठी संदर्भ : 1. भारताचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांचा ‘युवा भारती’ या नियतकालिकातील लेख. 2. माता अमृतानंदमयी यांचा ‘विवेक विचार’ या मासिकातील लेख. 3. स्वामी विवेकानंद समग्र वाड्मय, खंड 3)

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी