गैरव्यवहारांनी उखळ पांढरे करणारे पदाधिकारी
चारुदत्त कहू
नागपूर, १८ सप्टेंबर
चर्च म्हणजे कुणाच्याही
व्यक्तिगत बाबीत नाक न खुपसता, त्यांच्या धर्मकार्याच्या मार्गात नाकाच्या
शेंड्याने सरळ चालणारे प्रतिष्ठान वा जगाला सन्मार्गाची दिशा देणारी एक
चळवळ अथवा येशूच्या मार्गाने मुक्ती देणारे तत्त्वज्ञान आहे, असा जो भास
होतो, तोदेखील चर्चबद्दलची पैशांचा दुरुपयोग करण्याची प्रकरणे कानावर आली
की गळून पडतो आणि मनात प्रश्न निर्माण होतो की, मोठमोठ्या चमत्कार
करणार्या संतांचे नाव घेणारी ही चळवळ मानवाला विशेषतः रंजल्या-गांजल्यांना
प्रतिष्ठेचे कोंदण लावू इच्छिते की गैरव्यवहाराच्या मार्गाने जाण्याचे नवे
फंडे त्यांच्यापुढे उघड करते.