Wednesday, August 15, 2012

स्मरण वेदनामय अपघाताचे...

काही घटना अशा असतात की त्या विसरू म्हटले तरी विसरता येत नाही. विसरल्याचा आव आणला तरी भूतकाळ थोडाच बदलतो ! आणि भूतकाळाचा ठसा वर्तमान आणि भविष्यावर उरतोच की. भूतकाळातील त्रूटीपासून बोध न घेतल्याने इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, संदर्भ थोडेफार बदलत असतील तेवढेच.
१४ ऑगस्टच्या रात्रीच जीवघेणा आघात झाला होता. संपूर्ण शरीरच लुळे पडले. पुढे या आघातातून सावरण्यासाठी काही वर्षे जावी लागली. हे वर्णन मला झालेल्या जीबीएस या जीवघेण्या आजाराचे आहे आणि आपल्या मातृभूमीच्या वेदनादायी फाळणीचेही. हा दुर्दैवी योगायोग. मी आता त्या आजारातून पूर्णपणे सावरलोय. शरीरातील अज्ञात बिघाडीमुळे त्या आजारात आपलीच रोगप्रतिकार शक्ती आपल्यावर हल्ला करते, त्यामुळे बाहेरची प्रतिजैविके निरुपयोगी ठरतात. सेक्युलर, मानवाधिकार आदी बुरखा पांघरून काही घरभेदी भारताला पोखरून काढत आहेत. याच 'विषाणूंमुळे' देशाची फाळणी झाली होती. देशाला पोखरणाऱ्या या रोगाविषयी ब्लॉगवर अधिकाधिक माहिती सातत्याने देण्याचा प्रयत्न केलाय आणि करतही आहे.
देशविरोधी शक्तींबाबत जागरूक राहण्याची क्रिया निरंतर चालणारी आहे, त्याच प्रमाणे आरोग्याची काळजी घेणे हीदेखील निरंतर चालणारी क्रिया आहे. जी बी एस च्या आजाराचा आघात होऊन १४ / १५ ऑगस्ट रोजी बरोबर तीन वर्षे होत आहेत. जी बी एस म्हणजे मूत्यूद्वारच. त्यातून ईश्वर कृपा आणि प्रेम करणाऱ्या असंख्य जीवलगांमुळे मी सुखरूप सुटलो. आजपासून सातत्याने आरोग्याची काळजी घेण्याचा शुभ संकल्प करतोय. देशाच्या आरोग्यासाठी जागरूक राहण्याचा सामुहिक संकल्प करुया...
जीबीएसबद्दल अधिक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी