Wednesday, March 20, 2013

श्रध्दा: धगधगती यज्ञशिखा

16मुकुल कानिटकर
गत दोन वर्षांचा अनुभव दिसतो की भारताच्या नवशिक्षित युवकांमध्ये जागृति आली आहे. मोर्चे, आंदोलन उपोषणात तरूणांची संख्या वाढतेच आहे. दूसरीकडे कावड, पदयात्रा, किर्तन, कथा, मंदिरदर्शन अश्या धार्मिक कामातही युवकांचा सहभाग वाढतानांच दिसतो. हे दोन्ही शुभसंकेतच आहेत. पण काय स्वामी विवेकानन्दांना असा जागर अपेक्षित होता ? न पेक्षा काहीही बरे. स्वामीजी म्हणायचेच आळशीपणे पडून राहण्यापेक्षा चोरी करणे केव्हाही बरेच. तमसाधीन युवसमाजापेक्षा आक्रोशित बंडखोर, राजस्तिक कर्मशीला, तरूणाई उत्तमच. पण हयापूढचा विचारा करायला हवा. तारूण्याच्या हया उद्रेकाला सकारात्मक राष्ट्रनिर्माणाची दिशा कशी देता येईल?

विराटाची साधना : भारतमातेची उपासना

तारीख: 3/14/2013 11:38:24 AM

- मुकुल कानिटकरश्रीरामकृष्ण परमहंसांना काशी विश्‍वनाथाच्या दर्शनाची इच्छा झाली. पूर्ण तयारीने ठाकूरांबरोबर काही शिष्य आणि त्यांचे प्रबंधक मथुरबाबू रेल्वेने काशीला निघाले. एका डब्ब्यात ठाकूर आणि भक्तगण व शेजारी दुसर्‍या डब्ब्यात प्रसादाची सामग्री मथुरबाबूंनी घेतली होती. फळं, मिठाई अशा अनेक गोष्टी होत्या.देवघर स्थानकावर गाडी खूप वेळ थांबते. ठाकूर बाहेर फलाटावर पाय मोकळे करायला उतरले. ही बहुदा १८६८ ची घटना असावी. बंगालमध्ये दुष्काळी परिस्थिती होती.

जेसुइट पोप

मल्हार कृष्ण गोखले 

-नवा पोप निवडण्याची कार्डिनल मंडळींची बैठक पूर्ण होऊन तिथून अखेर जॉर्ज मारिओ बर्गोग्लिओ यांच्या नावाची निश्‍चिती झाली आहे. बर्गोग्लिओ हे ब्यूनोस आयर्सचे आर्चबिशप आहेत. ब्यूनोस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी आहे. अशा प्रकारे अखेर पोप पदाचा सन्मान दक्षिण अमेरिका खंडाकडे गेला आहे. बर्गोग्लिओ हे मूळचे इटालियनच आहेत. सर्वात महत्त्वाची आणि अभ्यासकांच्या भुवया उंचावणारी गोष्ट म्हणजे ते जेसुइट आहेत.
रोमन कॅथलिक या ख्रिस्ती संप्रदायाच्या मुख्य पंथामध्ये अनेक गट आहेत. शतकानुशतकांमध्ये हे गट निर्माण होत गेले आहेत. फ्रान्सिस्कन किंवा ग्रे फ्रायर्स, डॉमिनिकन्स, कार्मेलाईट किंवा बेगिंग फ्रायर्स, ऑगस्टिन, थिएटिन्स किंवा कापुचिन्स ही त्यांच्यापैकी काही नावं. त्यातलाच एक गट म्हणजे जेसुइट किंवा पॉलिस्टिन्स.

पाण्याखालून क्षेपणास्त्र - भारत एकमेव देश

भारत ठरला जगातील एकमेव देश


वृत्तसंस्था /  विशाखापट्टनम्, २० मार्च

भारताने आज पाणबुडीवरून मारा करणार्‍या ‘ब्राह्मोस’ या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरातून यशस्वी चाचणी घेऊन नवा इतिहास रचला आहे. अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राची पाण्याखालून चाचणी घेणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे. २९० किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

या क्षेपणास्त्राची ही पहिलीच चाचणी असून ती पूर्णपणे यशस्वी राहिली आहे, अशी माहिती ‘ब्राह्मोस’ प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवथानू पिल्लई यांनी वृत्तसंस्थेला दिली.

जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशाने आजवर पाण्याच्या खालून सुपरसॉनिक कू्रझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली नाही. चाचणीनंतर या क्षेपणास्त्राने संपूर्ण २९० किलोमीटरचा प्रवास केला. चाचणीच्या काळात क्षेपणास्त्राची कामगिरी अगदी अचूक राहिली. असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी या क्षेपणास्त्राची जमिनीवरील चाचणीही यशस्वी राहिली होती. आता पाण्याखालूनही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र लष्करासोबतच भारतीय नौदलाच्या सेवेतही तैनात करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
साभार / तरुण भारत 

एकूण पृष्टदृश्ये 97000

वाचक बंधू - भगिनी,
आताच काही क्षणांपूर्वी माझ्या ब्लॉग पृष्ठदृश्यांची संख्या 97000 इतकी झाली. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण या ब्लॉगचे वाचक आहत. वाचक म्हणून या ब्लॉगविषयी आपले मत, सूचना अवश्य सांगा, ही विनंती. 
आपला स्नेहांकित, 
सिद्धाराम 
psiddharam@gmail.com 
8806555588

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी