Saturday, April 13, 2013

गुगलचे महत्त्व अधिक, की देशाच्या घटनेचे?

गुगल ही जगातील सर्वांत मोठी ई-मेल अथवा वेब साईटशी संबंधित सूचना अथवा संवाद सुविधा पुरविणारी कंपनी आहे. संवादासाठी या माध्यमाचा वापर करणार्‍यांची संख्या अब्जावधीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतातील सर्वांत मोठा आणि प्रतिष्ठित, मानचित्र निर्मिती तथा सर्वेक्षण क्षेत्रातील भारतीय सर्वेक्षण विभाग गुगलविरुद्ध दिल्लीच्या आर. के. पुरम्‌‌ येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास बाध्य झाला आणि सर्वांचे कान टवकारले गेले.

विवेकानंद आणि डॉ. आंबेडकर पुस्तकाचे १४ एप्रिल रोजी प्रकाशन



सोलापूर (प्रतिनिधी) : स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीतर्फे ‘स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (१४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ऍम्फी थिएटरमध्ये बौद्ध धर्मगुरू भन्ते सुमेधजी यांच्या हस्ते होणार आहे.

स्वामी विवेकानंद यांचे १५० वे जयंती वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे प्रकाशन होत आहे. रमेश पतंगे यांनी लिहिलेले हे पुस्तक विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे.

संभाजीनगर (औरंगाबाद) येथील डॉ. आंबेडकर यांचे अभ्यासक रमेश पांडव यांचे व्याख्यान यावेळी होईल. याशिवाय प्रा. विक्रम कांबळे व प्रा. विलास बेत हे पुस्तकासंबंधी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. विवेकानंद केंद्राचे प्रांत संघटक विश्‍वास लपालकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.या पुस्तकामुळे बहुतेक करून दुर्लक्षित राहिलेले स्वामी विवेकानंदांचे सामाजिक विचार आणि त्याच पद्धतीने दुर्लक्षित राहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धार्मिक विचार यांचे दर्शन होते, अशी माहिती संयोजक वल्लभदास गोयदानी यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधाने पुष्कळ लेखन केलेले लेखक रमेश पतंगे यांनी स्वामी विवेकानंदांच्या सामाजिक विचारांचा आढावा घेणारे पुस्तक लिहिले आहे. तो आढावा घेताना त्यांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये किती साम्य होते, हे दाखवून दिल्याचेही ते म्हणाले.

((here I am giving the details of photo used on front page of ambedkar book. This photo is basically was from Babasahebs Buddhis deeksha samaroh. The photo was published in outlook magazine of 20 August 2012 issue in the article 
named The Apostate Children Of God.
link of the same is
http://www.outlookindia.com/article.aspx?281931 ))

बाबासाहेब आम्हाला क्षमा करा


आज जरी आम्ही राजकीय, सामाजीक आणि आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत विभागले गेलो आहे तरी मला खात्री आहे की, अनेक जाती-पंथ असूनदेखिल आम्ही 'एक-राष्ट्र' म्हणुन उभे राहू. एक दिवस अअसाही येईल की, फाळणीची मागणी करणार्‍या मुस्लिम लीगला पण 'अखंड हिंदुस्थानच' हिताचा वाटू लागेल."                         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन

बाबासाहेब, म्हणाले होते, "जातीयतेच्या वडवानलाने गौतम बुद्ध, विवेकानंद, ज्ञानदेव, तुकाराम, सर्वांना भस्मिभूत करुन टाकले आहे." आता हा कूपमंडुक समाज कुठे आपलीही अशीच दशा करणार नाही ना, अशी भयशंका मनाला व्याकूळ करते. म्हणून हे बाबासाहेब आम्हाला क्षमा करा.

हिंदुत्वात धर्मांतरास परवानगी नाही

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी