
पतीची नोकरी बदलल्याने पुण्याहून त्यांनी सोलापूरला स्थलांतर केले. मुलगा इंजिनीयर होईपर्यंत त्या फक्त घर सांभाळून होत्या. मुलगा स्वावलंबी होताच १९९६ साली अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. मात्र कोर्टात उमेदवारी करताना पीडित महिलांचा त्रास आणि वकिलांचे वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असे ठरवले. अशील आणि प्रतिवादीत त्या समेट घडवून आणू लागल्या. आर्थिक स्थिती हे भांडणाचे कारण अनेक प्रकरणांत दिसले. त्यासाठी उद्योगवर्धिनी ही संस्था सुरू केली. गरजू महिलांना उद्योगवर्धिनीत काम मिळते. अनेक महिलांचे संसार यामुळे सावरले गेले आहेत. शतकानुशतके रानावनांत भटकणार्या पारधी समाजातील लोकांसाठीही अनेक वर्षांपासून त्या काम करीत आहेत. मरिआईवाले, मसणजोगी, बहुरूपी असे अनेक भटके नागरिक असल्याचा एकही पुरावा नाही. भटकंतीमुळे शिक्षण नाही. वडिलोपार्जित गुन्ह्यांचा ‘वारसा’ मुले पुढे चालवतात. पोलीसही एका खर्या खटल्याबरोबर दहा खोटे खटले लादून स्वतःचे काम सोपे करून घेतात. असेच एक पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आले. ज्ञानेश्वर भोसले त्यांचे नाव. दुहेरी खुनाचा खोटा खटला त्यांच्यावर दाखल होता. अपर्णाताईंनी त्याला निर्दोष सोडवले. त्याच्या मदतीने ६० पारधी मुले गोळा केली. सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळला जागा घेतली. मुलांना नागनाथ विद्यालयात घातले. पत्र्याच्या शेड उभारून मुले एके ठिकाणी राहू लागली. तत्कालीन जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी ही जमीन दिली. त्याशिवाय ‘आई तू जागी हो’, ‘चला नाती जपूया’, ‘मुली सांभाळा’ अशा विषयावर अपर्णा रामतीर्थकर महाराष्ट्रभर व्याख्याने देत आहेत. त्यासाठी महिन्यातील २८ दिवस त्या दौर्यावर राहतात. व्याख्यानाचे मानधन आणि श्रोत्यांनी उत्स्फूर्त दिलेल्या देगण्या यातून गेली दोन वर्षे हे वसतिगृह चालू आहे. कोकण ते विदर्भ सर्व प्रवास राज्य परिवहन बसनेच करीत त्यांचे समाजकार्य सुरू आहेत. घटस्फोट, वृद्धाश्रम, ज्येष्ठाचा निराधारपण या सर्वांचा मागोवा त्या आपल्या व्याख्यानातून देत असतानाच लव्ह जिहादसारख्या धर्मविरोधी चळवळीवरही त्या हिंदू धर्मातील तरुण-तरुणींना लव्ह जिहाद गाडून टाका, अशा शब्दांत आपल्या आक्रमक पद्धतीने मार्गदर्शन करतात. हिंदू मुलींचे धर्मांतरण थांबविण्यासाठी त्या सातत्याने काम करीत आहेत.
साभार - दै. सामना
http://www.saamana.com/2012/August/11/stambhalekh.htm
No comments:
Post a Comment