Friday, November 6, 2015

ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलीज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांचे शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रात्री निधन झाले. मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते. गेल्या तीन दिवसांपासून अश्विनी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्ययात्रा ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या ओंकार सोसायटी (होटगी रोड) येथील राहत्या घरापासून निघणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे ते पती होत.
arun ramtirthkar

arun ramtirthkar

arun ramtirthkar
arun ramtirthkar, study tour with journalism students


-------------------------------

सोलापूर तरुण भारतचे माजी संपादक व विचारवंत अरुण करमरकर यांनी वाहिलेली शब्दांजली...

एक धगधगीत जीवन : अरुण रामतीर्थकर
अरुण रामतीर्थकर हे अभिजात देशभक्तीचा हुंकार जागवणारे एक निष्ठावंत पत्रकार.
पत्रकारिता हा व्यावसाय, करियर किंवा निव्वळ चरितार्थाचे साधन नाही तर ते एक व्रत असल्याची निष्ठा जिवापाड जपणाऱ्या पत्रकारांच्या पिढीचे अग्रणी प्रतिनिधी होते ते.
एक माणूस या नात्याने उदात्त जीवनमूल्यांची जपणूक जीवनाच्या प्रत्येक क्षणोक्षणी जगणारी व्यक्ती होती ती.
हिंदुत्वनिष्ठा म्हणजे सांप्रदायिक (रिलिजियस) दृष्टीकोन किंवा बंदिस्त चौकट नव्हे, तर ती जीवनशैलीचा एक आदर्श आविष्कार आहे, हे व्यवहारातून जगणारे एक धगधगीत जीवन म्हणजे अरुण रामतीर्थकर.
जाज्वल्य देशभक्ती आणि निष्कलंक चारित्र्य यांचे मूर्तरूप होते ते.
अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् ।
या पंक्ती अक्षरश: सार्थ करणारे जीवन ते जगले.
म्हणजे सहज मृत्यू. कोणत्याही कारणासाठी लाचारी नाही. त्यामुळे कोणत्याही धडपड, प्रयत्नाशिवाय सहज मृत्यू.
त्यांच्या आत्म्यास सद््गती मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना...
अरुण रामतीर्थकर यांचे सडेतोड लेख वाचा
http://tarunsadetod.blogspot.in/

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी