या छायाचित्रांवर वेगळ्याने भाष्य करण्याची आवश्यकता नाही. ही खूपच बोलकी छायाचित्रे आहेत. ही छायाचित्रे स्वत पाहा... इतरांनाही पाठवा... रामलीला मैदानावरील जिवंत छायाचित्रे ... साभार : दै. भास्कर
मावळ हा पूर्वी जनसंघाचा व आत्ता भाजपचा बालेकिल्ला. तो फोडणे 'काका'ला जमले नाही. ७२ च्या निवडणुकीत मावळमधून कृष्णा भेगडे निवडून आले. 'काकांनी' आणीबाणीचा फायदा उठवला. भेगडे यांना काँग्रेसमध्ये यायला भाग पाडले. आत्ता मावळचे आमदार भाजपाचे संजय भेगडे आहेत, तर खासदार शिवसेनेचे गजानन बाबर आहेत. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना मावळमध्ये तो नसल्यामुळेच मावळ प्रकरण हाताळताना संवेदनशीलता दाखविली गेली नाही, असे म्हणणे चुकीचे होईल काय ? पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... विचार महाराष्ट्राचा http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-mawal-firing-and-we-2370315.html?HT5=
राज्यात गृहमंत्री राष्ट्रवादीचा. राहुल गांधींच्या भेटीने राष्ट्रवादीचे नाक कापले गेले अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाली. परिणामी अजित पवार यांनी वक्तव्य दिले की, 'अण्णा हजारे यांना अटक करून केंद्र सरकारने घोडचूक केली.' मावळचा हा उत्तर रंग. उट्टे काढून झाले. या सा-या प्रकरणाचे सेना-भाजप या पक्षांनी राजकारण केले, असा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला. विषय संसदेत गेला. एक दिवस देशाचे सर्वोच्च सभागृह बंद पाडले गेले. सरकारने पोलिस शिपायांना निलंबित करण्याची तत्परता दाखविली. (अर्थात काही दिवसांनी ते पुन्हा नोकरीवर रुजू होतील.) उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशाकरवी या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...