Monday, September 5, 2011

भारतीय इतिहासातील युगनायक शिक्षक

भारताच्या इतिहासात हजारो वर्षांपासून अनेक युगनायक शिक्षक होऊन गेल्याचे दिसते. श्रीरामापासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत जेवढे महापुरुष होऊन गेले त्या प्रत्येक महापुरुषामागे एक खंबीर शिक्षक किंवा गुरूचे आशीर्वाद होते. या लेखात आपण युगनायक घडविणा-या महान शिक्षकांची ओळख करून घेऊ या.
सांदिपनी.आचार्य सांदिपनी हे भगवान श्रीकृष्णाचे गुरू होते. त्यांचा आश्रम उज्जयिनी अर्थात आजच्या उज्जैन येथे होता. सांदिपनी ऋषींनी श्रीकृष्णाला या आश्रमात 64 कलांचे शिक्षण दिले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
हे आहेत भारतीय इतिहासातील युगनायक शिक्षक  

रस्त्यावर नाचण्याची व्यवस्था करणे, हाही गणेशोत्सवामागील उद्देशच !

अंथरुणातून बाहेर न पडताच मोठमोठे उपदेशाचे डोस पाजणारी, फुकटचे सल्ले देणारी मंडळी सर्वच काळात असतात. सुरुवातीच्या काळातच लोकमान्यांनी त्यांना खणखणीत उत्तर देऊन ठेवलं आहे. 22 सप्टेंबर 1896 रोजी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात लोकमान्य म्हणतात, ""आपले राष्ट्र म्हणजे काही गुलामांचे राष्ट्र नाही. मानवी प्राण्याला कैद्याच्या राहणीने राहा असे सांगणे म्हणजे महामूर्खपणा आहे. समारंभ व थाटमाट ही प्रत्येक उत्सवाची आवश्यक अंगे होत. कोणतेही काम पैशावाचून होत नसते. इतर वाईट गोष्टींत पैसे खर्च होण्यापेक्षा गणेशोत्सवात थोडेबहुत खर्च झाल्यास पुण्यच आहे. या उत्सवात प्रत्येकजण आपापल्या हौसेने खर्च करीत असतो. कोणाची कोणावर सक्ती नाही. आठ-दहा दिवस जर उत्साहाने काढता येत नाहीत व त्या उत्सवाप्रीत्यर्थ थोडेसे द्रव्य खर्चण्याचे जर सामर्थ्य नाही, तर ते राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखेच आहे. या गोष्टीला उधळपट्टी म्हणणारे म्हणोत, पण कष्टमय संसाराची यात्रा सुखाची व शांतीची होण्यास असले खर्च आवश्यकच आहेत.''
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
रस्त्यावर नाचण्याची व्यवस्था करणे, हाही गणेशोत्सवामागील उद्देशच !

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी