माझे हे शब्द स्मरणात असू द्या :
'हिंदू' हा शब्द उच्चारताच
अपूर्व चैतन्याची लहर जर तुमच्यात सळसळून जात असेल
तर आणि तरच तुम्ही हिंदू आहात.
मुस्लिमांबद्दल हिंदू कशा रीतीने विचार करतात हे विख्यात साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी अतिशय मार्मिक शब्दांत नोंदविले आहे. ते म्हणतात, ""...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.''