Tuesday, December 6, 2011

सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे...


नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साईट्सवर कॉंग्रेसची वक्रदृष्‍टी पडली आहे. या वेबसाईट्सवरुन प्रसारित होणा-या माहितीवर अंकूश आणण्‍याचा सरकारचा प्रयत्‍न सुरु आहे. कॉंग्रेसच्या अध्‍यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्‍याबद्दल फेसबुक, ट्विटर, गुगल इत्‍यादी साईट्सवरुन आक्षेपार्ह माहिती प्रसारित होत आहे. त्‍यामुळे सरकारने अशा माहितीवर नजर ठेवण्‍याचा निर्णय घेतला आहे. 
... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप
स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी
नागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे

दुरसंचारमंत्री कपिल सिब्‍बल यांनी फेसबूक, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि याहू या कंपन्‍यांच्‍या अधिका-यांसोबत एक बैठक घेतली. त्‍यात त्‍यांनी धार्मिक तसेच राजकीय व्‍यक्तिमत्वांच्‍या विरोधात प्रसारित होणा-या आक्षेपार्ह माहितीवर लक्ष ठेवण्‍याची सूचना केली आहे. यासाठी केवळ तंत्रज्ञानावर निर्भर न राहता अशा माहितीवर नजर ठेवण्‍यासाठी कर्मचारी नेमावे, असेही सरकारने म्‍हटले आहे.
सोशल नेटवर्किंग साईट्सवर अनेक आक्षेपार्ह छायाचित्र तसेच टीका करण्‍यात येते. त्‍यात धार्मिक छायाचित्रांचीही खिल्‍ली उडविण्‍यात येते. राजकीय नेत्‍यांवर तर त्‍याहून जास्‍त प्रमाणात असे प्रकार घडतात. त्‍यात सध्‍या सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्‍यावरील टीका अग्रस्‍थानी आहे. त्‍यामुळे सरकार भडकले आहे. अशा प्रकारच्‍या माहितीवर नजर ठेवून ती प्रसारित होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्‍याची सूचना सरकारने केली आहे. परंतु, या कंपन्‍यांनी सरकारच्‍या सुचनेवर नकारात्‍मक प्रतिक्रीया दिली आहे. भारतातून इंटरनेटवर प्रचंड माहिती प्रसारित होते. त्‍यावर लक्ष ठेवणे शक्‍य नाही. एखाद्या विशिष्‍ट प्रकारच्‍या तक्रारीवर कारवाई करणे शक्‍य आहे, असे या अधिका-यांनी सांगितले. या उत्तरावर सिब्‍बल भडकले. तसेच या मुद्यावर अमेरिकेच्‍या दुतावासातील अधिका-यांनी भारताच्‍या या भुमिकेवर नाराजी व्‍यक्त करण्‍यासाठी एक अधिका-याला बोलावून घेतले. त्‍यावरुनही खडाजंगी झाली. या अधिका-याने स्‍पष्‍ट सांगितले की, दुतावासाचा या मुद्याशी काहीही संबंध नाही.

http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-government-proposes-to-filter-content-on-social-sites-2619139.html?HT2= 
इंटरनेट विश्वात आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे केंद्र सरकारने गुगल, याहू, फेसबुक यांच्याविरुद्ध कडक धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली आहे.

केंद्र सरकारने गुगल, याहू, मायक्रोसॉफ्टसारख्या इंटरनेट कंपन्या, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित सर्व आक्षेपार्ह गोष्टी हटविण्यास सांगितले आहे. तसेच सरकारने या सर्व साईट्सवर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी एखादी यंत्रणा विकसित करण्यास सांगितले आहे.

सरकारचा हा प्रस्ताव या सर्व कंपन्यांनी धुडाकावून लावला आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे, की या सर्व साईट्सवर प्रसिद्ध होणाऱा मजकूर इंटरनेट युजर्सकडूनच येत असतो. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. मात्र, सरकारने यावर नियंत्रण ठेवण्यास सांगितल्याने यापुढे काळजी घेण्यात येईल. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार काहि दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी या सर्व कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवून फेसबुकवर सोनिया गांधी यांच्याविषयी प्रसिद्ध झालेला आक्षेपार्ह मजकूर दाखविला होता.

http://www.esakal.com/esakal/20111206/5411406916295255938.htm

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी