एक हात गेला म्हणून काय, दुसरा आहे ना!
ऑटोमोबाईल डिप्लोमाच्या तिस-या वर्षात शिकणा-या 19 वर्षीय उमद्या तरुणाचा उजवा हात बस अपघातात तुटून 20 मीटर लांब जाऊन पडला. एक हात तुटून गेला म्हणून काय झालं, दुसरा हात आहे ना, ही सकारात्मक ऊर्जा त्याला जगण्याचं बळ देत राहिली. त्याने डाव्या हातात कुंचला धरला आणि स्वत:ला पेंटिंगच्या विश्वात झोकून दिलं. अपघातापूर्वी काढत होता त्याहून उजवी चित्रे तो डाव्या हाताने साकारू लागला. या मूर्तीमंत जिद्दीचं नाव आहे झीशान युनूस दुर्गकर.