देवेंद्र गावंडे
२००६च्या फेब्रुवारी महिन्यातला एक दिवस. तारीख आता नक्की आठवत नाही, पण छत्तीसगडमधील बिजापूरजवळच्या गंगालूर गावात हजारो आदिवासी एकत्र आलेले.. 'सलवा जुडूम'च्या नावावर गोळा झालेले व नक्षलवाद्यांच्या विरुद्ध उघडपणे नारेबाजी करणारे हे आदिवासी, त्यांचे नेते महेंद्र कर्माच्या आगमनाची वाट बघत आहेत. कर्मा येताच साऱ्यांमध्ये संचारलेला जोश, त्यानंतर गाजलेली सभा, त्यातील कमार्ंचे मुख्य भाषण, सारे कसे आता स्वप्नवत डोळय़ासमोरून सरकत आहे. त्यानंतरचा गेल्या आठवडय़ातला २५ मेचा दिवस. सात वषार्ंनंतर आलेला. कर्मा ठार झाले हे ठाऊक असूनसुद्धा २०० नक्षलवादी त्यांच्या पार्थिवावर गोळय़ा झाडत आहेत. त्याआधी चाकूचे ७८ वार कर्माच्या देहाने झेलले. एका लोकनेत्याला आलेल्या या अत्यंत निर्घृण आणि दुर्दैवी मरणाबद्दल सध्या देशात सर्वत्र हळहळ, संताप व्यक्त होत असला तरी नक्षलवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित केले आहेत.