Sunday, June 2, 2013

‘राज’कडून वर्षा बनसोडेंना लोकसभेसाठी विचारणा

सिद्धाराम पाटील | May 31, 2013, 11:31AM IST
सोलापूर-  आगामी लोकसभा निवडणुकांना आणखी वर्षभराचा अवधी असला तरी राजकीय चाचपणी आणि जुळवाजुळव याला कधीच सुरुवात झाली आहे. अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी आगामी निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय बुधवारी जाहीर केला. रिपाइंचे नेते रामदास आठवले हे महायुतीकडून सोलापुरात उमेदवारी दाखल करतील अशी चर्चा आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अ‍ॅड. बनसोडे यांच्या पत्नी वर्षा बनसोडे यांना सोलापूर लोकसभेसाठी विचारणा केल्याचा दुजोरा शरद बनसोडे यांनी दिला आहे.


ताज्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बनसोडे यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला. स्वत: निवडणूक लढवणार नसलो तरी यापुढेही भाजपचा सक्रीय कार्यकर्ता राहणारच आहे. कारण, हिंदुत्व विचारासाठी मी राजकारणात आहे. कौटुंबिक कारणामुळे निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक लढवणार नाही हे वर्षभर आधी पक्षाला कळवतोय, त्यामुळे नवीन उमेदवार उभे करण्यास पक्षाला पुरेसा वेळ मिळेल, असे ते म्हणाले. मनसेकडून वर्षा बनसोडे निवडणूक रिंगणात उतरतील किंवा नाही याबद्दल मात्र श्री. बनसोडे यांनी संदिग्ध भूमिका घेतली.

विचार मंचला पोंक्षेंची मदत
सावरकर विचार मंच पुढील काळातही आणखी जोमाने काम करेल. हे काम आम्ही व्रत म्हणून स्वीकारले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर काम करणाºया राज्यभरात विखुरलेल्या छोट्या-मोठ्या संघटनांना एकत्र करून काम करण्याची योजना आहे. या कामात शरद पोंक्षेही आमच्यासोबत असतील. आता निवडणूकच लढवणार नसल्याने विचार मंचाचे काम करताना राजकीय हेतूही चिटकवला जाणार नाही, याचा आनंद वाटतो.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-lokasabha-election-issue-4279108-NOR.html

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी