Saturday, March 9, 2013

लव्ह जिहादपासून वाचवण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या – ऍड. अपर्णा रामतीर्थकर


आज कुठे भगूरला, उद्या पुणे, परवा सांगली… सगळा प्रवास लाल डब्यातून (एसटीने). गडचिरोली व चंद्रपूर सोडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्यानांच्या माध्यमातून समाजकार्याचा आणि धर्मकार्याचा यज्ञ त्यांनी पेटवलाय. बहुतांश सभांना तीन-चार हजार गर्दी ठरलेली. परवा वाशीम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील सभेला 40 हजारांची उपस्थिती होती अन् नाशिक जिल्ह्यातील पिंपळनेरला 30 हजारांची. हे वर्णन आहे 58 वर्षीय ऍड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचं. ‘लव्ह जिहाद’ ही समस्या हळूहळू वाढत असल्याचं त्यांना जाणवलं. लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना सावरता सावरता लव्ह जिहाद थोपवणं, त्याविषयी जनजागृती करणं हे त्यांचं अंगीकृत कार्यच होऊन गेलं.
मुलाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996मध्ये अपुरं शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. त्यांचा प्रवास सुरूच आहे. सलग 384 दिवस प्रवास करून त्या आज (27 फेब्रुवारी 2013) सकाळी घरी पोहोचल्या आणि त्यांना सा. विवेकच्या महिला दिन पुरवणीसाठी गाठलं. त्यांच्याशी झालेल्या संवादातून अनेक विषय उलगडत गेले.
2001पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. 2008पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, हीच त्यांची यामागची तळमळ आहे.
आज कुठे भगूरला, उद्या पुणे, परवा सांगली… सगळा प्रवास लाल डब्यातून (एसटीने). रोज व्याख्यानं म्हटलं की मानधनही मिळणारच. त्या मानधन स्वीकारतात, पण आपल्या 75 लेकरांच्या उदरनिर्वाहासाठी. मोहोळ (जि. सोलापूर) येथे पारधी समाजाची मुलं त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणली आहेत. त्या दरमहा 60 हजार रुपयांचा खर्च व्याख्यानाच्या मानधनातून उभा करतात. गडचिरोली व चंद्रपूर सोडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्यानांच्या माध्यमातून समाजकार्याचा आणि धर्मकार्याचा यज्ञ त्यांनी पेटवलाय. बहुतांश सभांना तीन-चार हजार गर्दी ठरलेली. परवा वाशीम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील सभेला 40 हजारांची उपस्थिती होती अन् नाशिक जिल्ह्यातील पिंपळनेरला 30 हजारांची. हे वर्णन आहे 58 वर्षीय ऍड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचं. कुणी त्यांना अपर्णाताई म्हणतं, कुणी नानी, तर कुणी मॅडम. तुटणारी घरं जोडण्यासाठी समाजात फिरू लागल्या, तेव्हा ‘लव्ह जिहाद’ ही समस्या हळूहळू वाढत असल्याचं त्यांना जाणवलं. लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना सावरता सावरता लव्ह जिहाद थोपवणं, त्याविषयी जनजागृती करणं हे त्यांचं अंगीकृत कार्यच होऊन गेलं.
लव्ह जिहादचं तुम्हाला समजलेलं स्वरूप काय आहे?
महाराष्ट्रात काही ठिकाणी मुस्लीम वस्ती अतिशय तुरळक तर काही ठिकाणी मुस्लिमांचं प्रमाण मोठं आहे, पण लव्ह जिहादची समस्या थोडयाफार फरकाने सर्वत्र जाणवते. उच्च शिक्षितांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जैन, गुजराती, माहेश्वरी, ब्राह्मण या समाजातून लव्ह जिहादला बळी पडून मुस्लीम बनणाऱ्या मुलींचं प्रमाण तुलनेने अधिक आहे. मराठा, लिंगायत समाजात हे प्रमाण कमी आहे.
 हिंदू मुली स्वत:हून जातात, असं असेल तर या प्रकाराला ‘लव्ह जिहाद’ का म्हणावं?
नाही! मुली बिनधास्त सांगतात की मी स्वत:हून जातेय; पण प्रश्न असा आहे की एम.एस्सी. शिकलेली, लक्षाधीश बापाची मुलगी भंगार गोळा करणाऱ्या मुलासोबत का जातेय? आठ बाय आठच्या खोलीत, शौचासाठी बाहेर तांब्या घेऊन जातेय. आधीच्या दोन दोन बायका असूनही… वास्तविक कागदोपत्री तसं भासवलं जातंय. केवळ कुमारिकाच नाही, तर विवाहित स्त्रियाही लव्ह जिहादचा बळी ठरताहेत. वशीकरणाचा हा एक प्रकार आहे.
पण आजच्या विज्ञानयुगात वशीकरणावर विश्वास कसा ठेवायचा?
मी स्वत: अशी प्रकरणे पाहिलीत. पाहिजे तर तुम्ही या प्रकाराला संमोहनाचा (हिप्नॉटिझमचा) एक प्रकार समजा. लग्नाला दहा वर्षे झालेल्या, डी.फार्मसी शिकलेल्या महिलेचं एक उदाहरण आहे. नवरा कामानिमित्त बाहेर होता म्हणून ही मेडिकल स्टोअरमध्ये बसली होती. एक मुस्लीम मनुष्य आला. त्याला हवी ती औषधं नव्हती, त्यामुळे नाही म्हणून सांगितले तर त्याने पाहिजेच म्हणून हट्ट धरला. नवऱ्याला विचार म्हणाला. 'मोबाईलमध्ये बॅलन्स नाही' म्हणून सांगितले, तर 'नंबर दे, मी बॅलन्स टाकतो' म्हणाला आणि नंबर घेऊन बॅलन्स टाकलाही. नंबर हाती येताच चौथ्या दिवशी भेटायला बोलावलं. नाही येणार म्हणताच, 'आपले संबंध आहेत असं नवऱ्याला सांगेन' म्हणाला. ही घाबरली. भेटायला गेली. पुढे प्रकरण वाढलं. त्याच्यापासून बाळ झालं. बाळाला मुस्लीम नाव दिलं. त्यांनतर तो फिरकेनासा झाला. माहेरी गेल्यानंतर वशीकरण उतरवलं गेलं. एका शहरात तर फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली म्हणून मुलीने ऍक्सेप्ट केलं. कॉफी पिण्याचं निमंत्रण आलं. नंतर प्रकरण वाढलं. मुंब्रा येथील मदरशात अडीच महिने होती ती. आईने आणि भावाने पोलिसात रोज हेलपाटे मारले. तिने दागिने चोरून नेल्याची फिर्याद दिली. शोध लागला. पूर्वी हिंदू असलेली आणि आता मुस्लीम बनलेली महिलाच तिला अडकवण्यात होती, हे समोर आलं. वशीकरण काढेपर्यंत ही घरीही पाच वेळा नमाज पढायची. मदरशात रोज कुराण पठण करावे लागे आणि काळा बुरखा पांघरावा लागे. वशीकरणामुळे ही जवळपास जिहादीच बनली होती. एसएमएसच्या आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनही लव्ह जिहाद फोफावतोय.
लव्ह जिहादपासून वाचवण्याचं तुमचं काम कसं चालतं?
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, शिवसेना आदी हिंदुत्व विचाराच्या संघटनांचे कार्यकर्ते या कामी जागोजागी मदतीला धावून येतात. लव्ह जिहादचा प्रकार कोठे होत असेल, तर लगेच तिथले कार्यकर्ते फोन करतात. चौकशी करून मुलीच्या आईपर्यंत पोहोचतो. तिथे समुपदेशन केलं जातं. पळून जाण्यापूर्वी ध्यानात आलं तर साधारण 60 टक्के मुली वाचवण्यात यश येतं. पळून गेलेल्या मुली परत यायला सहसा तयार होत नाहीत. आपण पूर्णपणे फसलो गेलो आहोत हे ध्यानात आल्यानंतर काही मुली आपणहून संपर्क साधतात, तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
लव्ह जिहादला रोखण्यासाठी सर्वसामान्य मनुष्य काय करू  शकतो?
महत्त्वाचं म्हणजे, हे काम वैयक्तिक आणि संघटित अशा दोन्ही पातळयांवर करायचं काम आहे. धर्म शिक्षणाच्या अभावानेच हे सारं घडतं आहे. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षापासून धर्मशिक्षण दिलं जातं. आपण मात्र ख्रिश्चन धर्मप्रसार करणाऱ्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये आपली मुलं घालतो. हे थांबलं पाहिजे. हिंदू संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या इंग्रजी शाळांत मुलांना जाऊ द्या. तिथेही संस्कृती, मूल्यं जपली जातील यासाठी संस्थाचालकांच्या भेटी घ्या.
तरुणांनी करियरकडे अधिक लक्ष द्यावं. जे स्वत:च्या पायावर उभे झाले आहेत, त्यांनी संघटितरीत्या काम करणाऱ्यांसोबत स्वत:ला जोडून घ्यावं.
या विषयावर आणखी कुठल्या संस्था, व्यक्ती काम करत आहेत?
 हिंदू संघटनांचे कार्यकर्ते काम करताना दिसतात. परंतु लव्ह जिहादची वाढती विषवेल पाहता आणखी नियोजनबध्दरीत्या जागृती होण्याची गरज वाटते. हिंदू धर्मातून बाहेर जायला दरवाजे आहेत पण परतायला नाहीत, ही स्थितीही हळूहळू बदलतेय. लव्ह जिहादमधून सुटून आलेल्या मुलींशी लग्न करायला आम्ही तयार आहोत, असं सांगणारे तरुण पुढे येताहेत. अशा तीन मुलींची लग्ने करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. हा शुभसंकेत वाटतो. याला चळवळीचे रूप यावं, असं वाटतं.
‘नाती जपू या’ या विषयावरही आपण काम करत आहात. त्याविषयी काय सांगाल?
वृध्दाश्रमांमध्ये वाढ होतेय. घरगुती कलहामुळे कोर्टकचेऱ्या वाढताहेत. समाजाचं वास्तव चिंताजनक आहे. उच्च आणि प्रतिष्ठित पदावरील एका व्यक्तीची पत्नी (जी एम.एस्सी., बी.एड. शिकली आहे) घरी सासू-सासरे नको म्हणून माहेरी गेली. चार वर्षं परत आलीच नाही. शेवटी कुटुंब तुटलं. ‘किचन नको’ संस्कृती येऊ घातलीय. शीला की जवानी यासारख्या गाण्यावर आईच नाचते, अशी दृश्यंही पाहायला मिळताहेत. नात्यांमधला समजूतदारपणा, आदर कमी होतो आहे. त्यामुळेही घरं दुभंगताना दिसताहेत. तसंच, नाती जपताना संस्कार आणि धर्म याच्याशी फारकत घेतल्यास लव्ह जिहादला रोखणं अवघड आहे. त्यामुळे नाती जपत असताना स्वधर्माचं नेमकं ज्ञान, संस्कार याला पर्याय नाही.
साभार - साप्ताहिक विवेक 

( वाचा दै. सामनातील लेख …अपर्णा रामतीर्थकर
महाराष्ट्रातही लव्ह जिहाद 

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी