दलित मुस्लिम-दलित ख्रिश्चन?
रविवारचे भाष्य दि. ८ जुलै २०१२ करिता
गेल्या आठवड्यात, दिल्लीहून प्रकाशित होणार्या ‘ऑर्गनायझर’ या इंग्रजी साप्ताहिकात' Who is Secular? And what is Secular' या शीर्षकाचा माझा लेख प्रकाशित झाला होता. त्याची दखल सर्वत्र घेतली गेली याचा मला आनंद आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’नेही आपल्या दि. ५ जुलैच्या अंकात ‘व्ह्यू फ्रॉम् द राईट’
या स्तंभात पुरेशा विस्ताराने त्याचा सारांश प्रकाशित केला आहे. त्या लेखानंतर,
मला अनेक ठिकाणांहून अभिनंदनाचे संदेशही आले. ‘हिंदुस्थान टाईम्स’
या सुप्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या एका वार्ताहराने मला एक दूरध्वनी करून, प्रश्न विचारला की, ‘‘दलित ख्रिस्ती व दलित मुस्लिम यांना आरक्षण देण्याला संघाचा विरोध आहे,
असे बिहारचे मुख्य मंत्री नीतीशकुमार यांनी म्हटले आहे, आपले मत काय?’’
मी म्हणालो, ‘‘मी माझे वैयक्तिक मत देईन.’’ आणि त्यांनाच प्रश्न केला की, ‘‘आपण ‘ऑर्गनायझर’मधील लेख वाचला आहे काय?’’
त्यांनी तो वाचलेला नव्हता. मग मी एवढेच म्हणालो की,
‘‘धर्माच्या आधारावर आरक्षणाला आपल्या संविधानाची मान्यता नाही आणि सर्वोच्च न्यायालयानेही तसाच निर्णय दिला आहे. आपण माझा लेख वाचा आणि मग प्रश्न विचारा.’’ त्यानंतर त्यांचा पुन: दूरध्वनी आला नाही.