दिव्य सिटी, दिव्य मराठी, 14 april 2013 |
सोलापूर- जातीपातीत विभागलेला समाज, अस्पृश्यता, धर्माचा विकृत अर्थ लावून होणारी फसवणूक आणि असंघटितपणा या आपल्या देशासमोरील मूलभूत समस्या आहेत. या दोषांतून मुक्त कसे होता येईल, याचा विचार स्वामी विवेकानंदांनी आध्यात्मिक अंगाने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक संदर्भांच्या आधारे केला. आपला समाज दोषमुक्त व्हावा, हीच तळमळ दोनही महापुरुषांची होती, असे विचार ‘विवेकानंद आणि डॉ. आंबेडकर’ या पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे यांनी व्यक्त केले. महापुरुषांच्या विचारांतून समान मुद्दे शोधण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे असे ते म्हणाले.