Sunday, April 14, 2013

विवेकानंदानाही होते बुद्धाचे आकर्षण

दिव्य सिटी, दिव्य मराठी, 14 april 2013


सोलापूर- जातीपातीत विभागलेला समाज, अस्पृश्यता, धर्माचा विकृत अर्थ लावून होणारी फसवणूक आणि असंघटितपणा या आपल्या देशासमोरील मूलभूत समस्या आहेत. या दोषांतून मुक्त कसे होता येईल, याचा विचार स्वामी विवेकानंदांनी आध्यात्मिक अंगाने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक संदर्भांच्या आधारे केला. आपला समाज दोषमुक्त व्हावा, हीच तळमळ दोनही महापुरुषांची होती, असे विचार ‘विवेकानंद आणि डॉ. आंबेडकर’ या पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे यांनी व्यक्त केले. महापुरुषांच्या विचारांतून समान मुद्दे शोधण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे असे ते म्हणाले.


‘वैराग्य घेतल्यास दलित समाजाला मार्ग कोण दाखवणार? त्यामुळे वैराग्य घेऊ नये असा दृष्टांत रमाईने दिला. त्यानंतर बाबासाहेबांनी संन्यास वस्त्राचा त्याग केला,’ अशी माहिती बौद्ध धर्मगुरू सुमेधजी यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील संन्यासी वेषातील बाबासाहेबांच्या छायाचित्राविषयी बोलताना दिली.
(
cover page ref http://www.ambedkar.org/images/Rajgruha/target70.html)
http://www.ambedkar.org/images/Rajgruha/target70.html


भारतीयत्वाची भावना मोठी
जातीयतेच्या वडवानलाने गौतम बुद्ध, विवेकानंद, ज्ञानदेव, तुकाराम या सर्वांना भस्मिभूत करून टाकले आहे,’ असे बाबासाहेब म्हणाले होते. या पुस्तकाच्या माध्यमातून महापुरुष संपूर्ण समाजाचे आहेत, हे साधार मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. बाबासाहेबांना जातीय भावनाविरहित एकवर्णिय समाज हवा होता. जातीपेक्षा भारतीयत्वाची भावना मोठी पाहिजे, असे त्यांचे मत होते. प्रस्तुत पुस्तकातून हीच गोष्ट साधली आहे.

भन्ते करणार प्रकाशन
पुस्तकाचे प्रकाशन रविवारी सायंकाळी 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँम्फी थिएटरमध्ये बौद्ध धर्मगुरू भन्ते सुमेधजी यांच्या हस्ते होणार आहे. रमेश पतंगे यांनी लिहिलेले हे पुस्तक विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे. प्रकाशनानंतरऔरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अभ्यासक रमेश पांडव यांचे ‘स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान होईल. विवेकानंद केंद्राचे प्रांत संघटक विश्वास लपालकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.

शोध आशेचा
स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे आज प्रकाशन, अँम्फी थिएटरमध्ये रमेश पांडव यांचे सायंकाळी व्याख्यान

‘समाज दोषमुक्त व्हावा हे दोनही महापुरुषांचे समान ध्येय’
विवेकानंदांनाही होते बुद्धाचे आकर्षण
अस्पृश्यता हे धर्म नसून अधर्म असल्याचे विवेकानंदांचे मत होते. बाबासाहेबांचेही तेच मत होते. दोघांचे विचार समानच होते असे मानावे लागेल. विवेकानंद हे संन्यासी होते तर बाबासाहेब गृहस्थी. विवेकानंदांचा कल वेदांताकडे होता. बुद्धांसारखा महात्मा याआधी झाला नाही, असे त्यांचे मत होते. त्यांना बुद्धाचे आकर्षण होते. या पुस्तकाने समाजात विश्वासाचे वातावरण तयार होईल.’’ भन्ते सुमेधजी, बौद्ध धर्मगुरू

अन्य काही महत्वाचे लेख 

डॉ. बाबासाहेब यांचे विचारधन

आणि बुद्ध रडला ...

दलित राजकारण आणि शरद पवार

क्या मुसलमान जाति नहीं मानते ????
आसमंत, तरुण भारत, १४ एप्रिल २०१३ 

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी