Tuesday, April 16, 2013

बौद्ध धर्माविषयी ‘ते’ लागू होत नाही !

स्वामी विवेकाननंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाचे प्रकाशन
श्रीनिवास दासरी । सोलापूर
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असे सावरकरांनी म्हटले आहे. परंतु बौद्ध धर्माविषयी ते लागू होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन समरसता मंचचे प्रांताध्यक्ष रमेश पांडव (औरंगाबाद) यांनी केले. धर्म आणि धम्म समजून घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंतरजातीय विवाह झाल्याशिवाय समाजात खºया अर्थाने समरसता येणार नाही, असेही ते म्हणाले.
vishwas lapalkar, chandrakant gadekar, bhante sumedhji, ramesh pandaw, vikram kamble, vilas bet
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-swami-vivekanad-and-dr-4237385-NOR.html

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरात झालेल्या डॉ. रमेश पतंगे लिखित ‘स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. बौद्ध धर्मगुरू भन्ते सुमेधजी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. विवेकानंद केंद्राचे प्रांत संघटक विश्वास लपालकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा. विलास बेत, प्रा. विक्रम कांबळे, संघाचे प्रचारक चंद्रकांत गडेकर आदी उपस्थित होते.
राहुट्या नको, राष्ट्र हवंय!
मत, धर्म, संप्रदाय अशी विविधता एकत्र नांदताना मतभेद असतातच; परंतु मनभेद होता कामा नये. त्यासाठी वैचारिक प्रगल्भता आवश्यक आहे; जी स्वामी विवेकानंद आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. मतभेदांतून छोट्या-छोट्या राहुट्या निर्माण होतात; त्या नष्ट करून राष्ट्र बलिष्ठ करण्याचा विचार महत्त्वाचा आहे, असे विचार पांडव (औरंगाबाद) यांनी व्यक्त केले.
... स्वामीजी ‘जिजस’ वाटले
श्री. पांडव पुढे म्हणाले, ‘‘डॉ. आंबेडकरांच्या आधी विवेकानंदांनी भगवान बुद्धांवर स्वतंत्र व्याख्यान दिले. शिकागोतल्या धर्म परिषदेनंतर ते अमेरिकेत तीन वर्षे राहिले होते. न्यूयॉर्कच्या चर्चमध्ये आठ दिवस राहून धर्मविचार सांगितला. त्याने तेथील लोकांना स्वामीजी ‘जिजस’ वाटले. बोस्टनमध्येही त्यांचे व्याख्यान झाले. देशात जेव्हा परतले, तेव्हा मात्र येथील विषमतेवर त्यांनी कडाडून टीका केली. पुढील 50 वर्षे देव गुंडाळून ठेवा. एकमेव भारतमाता देव सांभाळा, असे आवाहन केले. त्यानंतर बरोबर 50 वर्षांनी देश स्वतंत्र झाला.’’
हिंदूंवर अनंत उपकार
विवेकानंदांचे विचार पुढे नेत महामानव डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली. हिंदू कोड बिल लिहून हिंदूंवर अनंत उपकार केले. बहुजनांमध्ये सात हजार व्यवसाय होते. तेही या देशाचे तितकेच मालक आहेत. त्यांना समान हक्क दयेने नव्हे तर हक्कानेच मिळाले पाहिजेत, ही त्यांची धारणा होती, असेही श्री. पांडव या वेळी म्हणाले. प्रा. अनिता अलकुंटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रस्तावना सिद्धाराम पाटील यांनी केली. श्रीकांत माळगे यांनी आभार मानले.


स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर यांच्या मांडणीतील साम्यस्थळे

विवेकानंदानाही होते बुद्धाचे आकर्षण

डॉ. बाबासाहेब यांचे विचारधन

आणि बुद्ध रडला ...

दलित राजकारण आणि शरद पवार

क्या मुसलमान जाति नहीं मानते ????


******************
book cover ref.
http://www.ambedkar.org/images/Rajgruha/target70.html

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी