Tuesday, September 7, 2010

... ,,,,

सोलापूर, (खास प्रतिनिधी) :- कृषिक्षेत्रात आता काही राहिले नाही. तरुणांनी शेतीकडे न वळता इंडस्ट्रीकडे वळावे, असा सल्ला खुद्द कृषिमंत्रीच देत असतील, तर अशा कृषिमंत्र्यांना जोड्याने मारा! असे उद्‌गार पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी काढले. सोलापूर विद्यापीठात सामाजिक शास्त्रे संकुलात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
"सर्वसमावेशक विकासातून शाश्वत विकास' या विषयावर त्यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. आर. आर. पाटील, डॉ. अशोककुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे भिकाऱ्याला भीक वाढण्यासारखे झाले. हे काम वाईट नाही, परंतु चांगलेही नाही! मोठ-मोठ्या कंपन्या, उद्योग यांना सरकारकडून कोट्यवधी रुपये पुरवले जातात आणि शेतकऱ्यांसाठी मात्र त्याच्या एक टक्काही दिले जात नाही. कर्ज बुडविण्यात मोठे उद्योग आघाडीवर असूनही बदनामी मात्र शेतकऱ्यांची करण्यात येते. कृषिक्षेत्र मागास असल्याचे सांगितले जाते, यातून शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास कसा शक्य आहे, असा प्रश्नही डॉ. सप्तर्षी यांनी उपस्थित केला.
समाजातील सर्व घटकांना विकासाची संधी मिळाली पाहिजे, असे सांगून डॉ. सप्तर्षी यांनी यावेळी विविध सोपी उदाहरणे दिली. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक शास्त्रांशिवाय पर्यावरणशास्त्र परिपूर्ण होऊ शकत नाही. जैन इरिगेशनने सोलार वॉटर हीटरच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमवले, पण ते वर्षभरातच बंद पडले. पुण्याच्या आरती संस्थेने आरती कुकर बनविले, पण एकाही घरी ते चालू नाहीत. निर्धूर चुलींचेही तसेच आहे. लोकांची गरज भागवणे महत्त्वाचे आहे. शाश्वत दृष्टी असल्याशिवाय सर्वसमावेशक विकास शक्य नाही. शाश्वत विकासासाठी मूळ पाया सुधारणे आवश्यक आहे. खेड्यातलं पारंपरिक तत्त्वज्ञान यादृष्टीने मोलाचे आहे, असेही ते म्हणाले.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी