सोलापूर, (खास प्रतिनिधी) :- कृषिक्षेत्रात आता काही राहिले नाही. तरुणांनी शेतीकडे न वळता इंडस्ट्रीकडे वळावे, असा सल्ला खुद्द कृषिमंत्रीच देत असतील, तर अशा कृषिमंत्र्यांना जोड्याने मारा! असे उद्गार पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी काढले. सोलापूर विद्यापीठात सामाजिक शास्त्रे संकुलात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
"सर्वसमावेशक विकासातून शाश्वत विकास' या विषयावर त्यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. आर. आर. पाटील, डॉ. अशोककुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे भिकाऱ्याला भीक वाढण्यासारखे झाले. हे काम वाईट नाही, परंतु चांगलेही नाही! मोठ-मोठ्या कंपन्या, उद्योग यांना सरकारकडून कोट्यवधी रुपये पुरवले जातात आणि शेतकऱ्यांसाठी मात्र त्याच्या एक टक्काही दिले जात नाही. कर्ज बुडविण्यात मोठे उद्योग आघाडीवर असूनही बदनामी मात्र शेतकऱ्यांची करण्यात येते. कृषिक्षेत्र मागास असल्याचे सांगितले जाते, यातून शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास कसा शक्य आहे, असा प्रश्नही डॉ. सप्तर्षी यांनी उपस्थित केला.
समाजातील सर्व घटकांना विकासाची संधी मिळाली पाहिजे, असे सांगून डॉ. सप्तर्षी यांनी यावेळी विविध सोपी उदाहरणे दिली. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक शास्त्रांशिवाय पर्यावरणशास्त्र परिपूर्ण होऊ शकत नाही. जैन इरिगेशनने सोलार वॉटर हीटरच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमवले, पण ते वर्षभरातच बंद पडले. पुण्याच्या आरती संस्थेने आरती कुकर बनविले, पण एकाही घरी ते चालू नाहीत. निर्धूर चुलींचेही तसेच आहे. लोकांची गरज भागवणे महत्त्वाचे आहे. शाश्वत दृष्टी असल्याशिवाय सर्वसमावेशक विकास शक्य नाही. शाश्वत विकासासाठी मूळ पाया सुधारणे आवश्यक आहे. खेड्यातलं पारंपरिक तत्त्वज्ञान यादृष्टीने मोलाचे आहे, असेही ते म्हणाले.
Tuesday, September 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
.
माझी टी.व्ही. मुलाखत पाहा...
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (12)
- congress (19)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (5)
- shivaji (4)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (4)
- अतिरेकी हल्ले (6)
- अध्यात्म (16)
- अनुभव (2)
- अन्य (3)
- आंबेडकर (18)
- आर्मी (4)
- इतिहास (29)
- इस्लाम (35)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (2)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (21)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (2)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (9)
- नक्षलवाद (5)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (7)
- पत्रकारिता (7)
- परिचय (10)
- पाक (2)
- पाकिस्तान (7)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (3)
- पोलिस (3)
- प्रज्ञा (2)
- बातमी (12)
- बातम्या (4)
- बुद्ध (6)
- भारत (4)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (16)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (13)
- मोदी (9)
- योग (5)
- रमेश पतंगे (1)
- राजकारण (28)
- विमर्श (6)
- विवेक विचार (17)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (57)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (7)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (22)
- संस्कृती (6)
- सामाजिक (9)
- सावरकर (2)
- साहित्य (7)
- सिद्धरामचे लेख (17)
- सुविचार (2)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (9)
- सोलापुर दंगल (5)
- सोलापुर बातमी (9)
- स्वामी विवेकानंद (3)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (32)
- हिंदू (9)
No comments:
Post a Comment