मुक्ती तत्वज्ञानाच्या मुद्यावरून जेस्युट आणि लाल बावटा
खांद्यावर मिरविणार्या गोदाताई परुळेकर यांच्यात संघर्ष आणि हातापायी झाली
होती. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील तलासरी येथे गरीब आणि
आदिवासींमध्ये पाय पसरविण्याचा जेस्युटांचा इरादा होता. पण, गोदाताईंनी
वर्षानुवर्षे त्या भागाची श्रमपूर्वक मशागत केली होती. ग्रामीण लोकांच्या
अधिकारांसाठी गोदाताईंनी प्रामाणिकपणे उभारलेल्या आंदोलनामुळे चर्चला येथे
आपले जाळे पसरविताना प्रचंड त्रास झाला. गोदाताई हयात होत्या तोवर
जेस्युटांना वारली, धोडिया, कोंकणा, काथौडी आदी समाजांमध्ये घुसखोरी करता
आली नाही. तथापि,...