पत्रकारितेतचार दशके गाजवलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर हे मुद्रित आणि इलेक्ट्राॅनिक या दोन्ही प्रसिद्धी माध्यमांत ठसा उमटवणारे पत्रकार ठरले. पत्रकारितेकडे करिअर किंवा निव्वळ चरितार्थाचे साधन म्हणून पाहता ते एक व्रत असल्याची निष्ठा जीवापाड जपणाऱ्या पत्रकारांच्या पिढीचे अग्रणी म्हणून त्यांची ओळख होती.
पुणे आकाशवाणी केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर पुणे तरुण भारतमध्ये काम केले. १९८५ मध्ये दैनिक सोलापूर केसरीमध्ये वृत्तसंपादक म्हणून ते रुजू झाले. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या वेळी दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरांतून त्यांनी वार्तांकन केले. सोलापूर केसरीसाठी बिहारमधील तत्कालीन प्रभावशाली नेते लालूप्रसाद यादव यांची मुलाखत घेतली होती. १९९० नंतर त्यांनी दिल्ली येथे विशेष प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे पत्रकारिता केली. यानंतर सोलापुरातील स्थानिक वृत्तवाहिनी "वृत्तदर्शन'च्या संपादकपदाची धुरा त्यांनी सांभाळली. निवृत्त सैनिकांची मालिका, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय हे बुलेटिन विशेष गाजले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात अनेक वर्षे, तर सोलापूर विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागातही काही वर्षे अध्यापनाचे काम केले. वृत्तपत्रांचा इतिहास, राजकीय विश्लेषण हे त्यांचे आवडते विषय होते. त्यांनी अनेक पत्रकारांना घडवले. दैनिक सोलापूर तरुण भारतमधील ‘सडेतोड’ या स्तंभातून ते गेल्या १२ वर्षांपासून ते वैचारिक लेखन करत होते. आपला एक खास वाचक वर्ग त्यांनी निर्माण केला होता.
साधी, सोपी अन् सडेतोड भाषा
त्यांच्याबातमीदारीत, वार्तांकनात तसेच लेखांमध्ये अनेक संदर्भ, इतिहास, खोलवर माहितींचा खजिना असे. सरळ, साधी आणि सोपी पण सडेतोड भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. शिवाय, ते तितकेच कठोरपणे प्रहारही करत. त्यांची वाणीदेखील शुद्ध आणि सुस्पष्ट अशी होती. त्यामुळे वाचक असो वा श्रोता त्यांना ते खिळवून ठेवत असत.
दिव्य मराठी, ७ नोव्हेंबर पान ३
अरुण रामतीर्थकर यांचे सडेतोड लेख वाचा
http://tarunsadetod.blogspot.in/
No comments:
Post a Comment