Wednesday, March 20, 2013

श्रध्दा: धगधगती यज्ञशिखा

16मुकुल कानिटकर
गत दोन वर्षांचा अनुभव दिसतो की भारताच्या नवशिक्षित युवकांमध्ये जागृति आली आहे. मोर्चे, आंदोलन उपोषणात तरूणांची संख्या वाढतेच आहे. दूसरीकडे कावड, पदयात्रा, किर्तन, कथा, मंदिरदर्शन अश्या धार्मिक कामातही युवकांचा सहभाग वाढतानांच दिसतो. हे दोन्ही शुभसंकेतच आहेत. पण काय स्वामी विवेकानन्दांना असा जागर अपेक्षित होता ? न पेक्षा काहीही बरे. स्वामीजी म्हणायचेच आळशीपणे पडून राहण्यापेक्षा चोरी करणे केव्हाही बरेच. तमसाधीन युवसमाजापेक्षा आक्रोशित बंडखोर, राजस्तिक कर्मशीला, तरूणाई उत्तमच. पण हयापूढचा विचारा करायला हवा. तारूण्याच्या हया उद्रेकाला सकारात्मक राष्ट्रनिर्माणाची दिशा कशी देता येईल?

आंदोलनांमध्ये रस्त्यावर येवून कायदा किंवा व्यवस्था परिवर्तनाची मागणी करणारा युवक रागात आहे. त्याचा आक्रोश विश्वासघ्यातातून उत्पन्न झालेला आहे. प्रस्थापित व्यवस्थेच्या सगळयाच स्तम्भांवरून त्याचा विश्वास उडालेला आहे. राजकीय पक्ष, सुरक्षा व्यवस्था, न्यायालय हया सगळयातूनच त्याला स्वतःच्या समस्यांचे निदान दिसत नाही. म्हणून ‘सब कुछ बदल डालूंगा’ हया लेखाने तो आन्दोलनात उतरलाय. अनास्थेतून जन्मलेला हा उदे्रक अयशस्वी झाला तर सामूहिक निराशा देवून जाई. यशाचा मार्ग पण घोर अराजकतेतच घेवून जाईल. एकूण हा सगळा प्रकार बौद्धिक नक्षलवादच बनत चाललाय.
दूसरीकडे कथा, कीर्तन, यात्रेत लोटणारी तरूणांची गर्दी आस्थाहीन आंदोलकांपेक्षा थोडी सकारात्मक असली तरी प्रत्यक्ष राष्ट्रनिर्माणीच्या विधायी कार्यात लावल्याशिवाय ही धार्मिक उर्जा बांझच राहणार. धर्माच्या प्रदर्शनापेक्षा धर्माचे आवरण तरूणाईत रूजायला हवे.
हया दोन्ही प्रकारच्या युवकांना ख-या श्रद्धा जागरणाची आवश्यकता आहे. स्वामी विवेकानन्दांच्या जीवनात श्रद्धा जागरणाचे शास्त्रीय सुत्र आम्हास swamiji 006aपहावयाला मिळते. नरेन्द्रनाथ दत्त महाविद्यालयात शिकत असतांना तर्कप्रधान, विचारशील व पर्यायी शंकालू पण होता. कुठलीही गोष्ट स्वतः चाचणी करून अनुभवल्याशिवाय तो मान्य करीत नसे. हयाच तर्कबुद्धितून श्रीरामकृष्णांनी श्रद्धेचा जागर केला. ती पद्धतीच आजच्या युवकांवर प्रभावी होऊ शकते. नरेन्द्र आणि ठाकुरांचा गुरू-शिष्य सम्बन्ध अद्भूत आहे. निव्र्याज्य प्रेमाच्या पायावर उभा हे संबन्धाचे दिव्य मंदिर आहे. श्रीरामकृष्ण बद्दल नरेन्द्रच्या मनात निरनिराळया शंका आहत. त्यांची त्याला मिळणारी विशेष वागणूक पण त्याला उमगत नाही. इतरांना न देता नरेन्द्रला प्रसादाची मिठाई देणे वेडयासारखे त्याची वाट पाहणे, हया सगळयाचा अर्थ नरेन्द्रला कळेना. काही दिवस नरेन्द्र दक्षिणेश्वराला जाऊ शकला नाही तर स्वतः श्रीरामकृष्ण परमहंस कलकत्त्याला त्याच्या घरी जाऊन पोहचले. ही आत्मीयताच श्रद्धा जागरणाची प्रथम पायरी आहे. आजच्या तरूणांत समस्त भारतीयांबद्दल ही आत्मीयता अंकुरित व्हायला हवी. हाच क्रांतिचा प्रारम्भ! हाच उपासनेचा आधार!
Sri Ramakrishna Paramahamsa 2आत्मीयतेने दरवाजा उघडतो. पण तेवढेच पूरेसे नाही. त्या मार्गे अनुभूतिचा प्रसाद पोहोचायला हवा. अनुभूतिनेच पूढे प्रयोग करण्याचा उत्साह येतो. नरेन्द्रची जिज्ञासा होती – काय ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो? श्रीरामकृष्णांनी फक्त सांगितलेच नाही की मी ईश्वराला तितक्याच स्पष्टतेने पाहतो जितका तुला पाहतोय तर त्यांनी शक्तिपाताच्या वैज्ञानिक प्रयोगाने युवा नरेन्द्रला ईश्वरशक्तिचा अनुभव करवला. ठाकुरांच्या उजव्या पायाच्या अंगठयााच नरेन्द्रच्या छातीला स्पर्शमात्र झाला आणि सर्व ब्रहमांड शून्यात विलीन होण्याचा अद्भूत अनुभव त्याला झाला ही झलक त्याला पूढच्या साधनेला सतत प्रेरित करीत राहीली. व्यवस्था परिवर्तनाची आकांक्षा ठेवणा-या क्रांतिकारकांना भारताच्या मर्माचा जवळून अनुभव घ्यायला हवा. सुदूर गावांमध्ये धर्मनिष्ठेने सूखपूर्वक जीवन जगण्याचा मोकळया मनानी अनुभव घ्यायला हवा. शासन निरपेक्ष स्वावलम्बी जीवनाची अनूभूतीच ख-या व्यवस्था परिवर्तनाची पथप्रदर्शक होऊ शकते.
अनुभवातून पूढे प्रयोगांचा जन्म झाला. नरेन्द्रने आपल्या गुरूच्या मार्गदर्शनात साधनेचे विविध प्रयोग केले. दक्षिेश्वर काली मंदिर हया युवा शिष्यांची प्रयोगशाळाच होती. पूढच्या पूर्ण जीवनातच स्वामी विवेकानन्दांचे प्रयोग चालूच राहिले. त्याबद्दल अधिक विस्ताराने समजून घेण्याची गरज आहे. ते पूढे पाहूच.
तूर्तास श्रद्धा जागरणाचे तीन सुत्र आचरणात आणूया आत्मीयता, अनूभूति व प्रयोग. युवा मित्रांनो भारतमातेला पूजण्यासाठी तिच्या समस्त पुत्रांशी आपली आत्मीयता असावी. त्यांच्या कष्टाचा स्वतःला बोचणा-या काटयासारखा अनुभव व्हावा म्हणजे मग त्या दूःखांना दूर करण्यासाठी आपण जीवनात प्रयोग करू. वर वर दिसायला हा मार्ग दूरचा वाटत असला तरी हाच सुनिश्चित मार्ग आहे. अनेक शतकांपासून हजारो अनाम साधक ही राष्ट्रसाधना करीत आहेत. गरज आहे त्या चमूत शामिल होण्याची. यज्ञज्वाला धगधगतेय चला जीवनाची आहुति देवूया !

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी