Saturday, May 26, 2012

अण्णा हजारे आणि स्वामी विवेकानंद
सन २०११ या वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव राहिला. अण्णांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असा होता. संपूर्ण जगाने अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची दखल घेतली. कोट्यवधी भारतीयांनी त्यांच्याबद्दल नितांत आदर व्यक्त केला. अण्णांनी राळेगणसिद्धीचा केलेला कायापालट हा कोणालाही नतमस्तक व्हायला लावणारा आहे. समाजाची काळजी असणा-या अण्णांसारख्या काही लोकांमुळेच या देशाला माहितीचा अधिकार मिळाला. आज याच माहितीच्या अधिकारामुळे अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. 

अण्णांचे जनलोकपालसाठीचे आंदोलन हळू हळू भरकटत गेल्याने एका चांगल्या आंदोलनाचा विचका झाला. अण्णांचे आंदोलन वैचारिक गोंधळात अडकल्याने शक्तिहीन होत गेले. असे असले तरी अण्णा हजारे यांनी आजवर केलेल्या कार्याचे मोल कमी होत नाही. अण्णा हजारे यांचे आजवरचे जीवन अनेकांना प्रेरणादायी बनले आहे. सर्वसामान्यांसारखे जीवन जगणाऱ्या किसन बाबुराव हजारे यांच्या जीवनाला स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा स्पर्श झाला आणि किसनचा अण्णा होण्याकडे प्रवास सुरु झाला. 
स्वामी विवेकानंद एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व
स्वामी विवेकानंद म्हणतात की, 'आधी विचार जन्म घेतात आणि मग कृती !'  सकारात्मक आणि शक्तिदायी विचारांमुळे जीवनाचे नंदनवन होते. नोबेल परितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वच सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.’’
गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस  म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. अण्णा हजारे यांच्या जीवनालाही स्वामी विवेकानंदांच्या विचारांमुळेच ख-या अर्थाने अर्थ प्राप्त झाला. 

'माझे गाव माझे तीर्थ' या आत्मचरित्रात अण्णा हजारे यांनी त्यांच्या जीवनात विवेकानंद कसे आले याबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे.
 ''१९६२ साली चीनने भारतावर अतिक्रमण केले. त्या युध्दात भारताची मोठी हानी झाली. मोठ्या संख्येने भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली. सेनादलात युवकांची भरती सुरू झाली. भूमिगत असताना ते मला समजताच मी सेनादलात भरती होण्याचे ठरविले. खरे तर सेनादलात भरती होण्याचे माझ्या जीवनातील उद्दिष्ट नव्हते. माझी उंचीही योग्य नव्हती; परंतु भारत-चीन युध्दात जे काही घडलं त्याची खंत मनात होती. ‘आपल्या मातृभूमीच्या सीमांचे रक्षणासाठी युवकांनो तुमची गरज आहे. भारतमाता तुम्हास साद घालत आहे,’ असे आवाहन सेनादलात भरतीसाठी भारत सरकारने युवकांना केले होते. मातृभूमीच्या सेवेसाठी आपण धावून गेले पाहिजे. या विचाराने भारावून मी भरतीसाठी अर्ज केला. ‘एंप्लॉयमेंट एक्सचेंज’कडून मला बोलावणे आले. त्यानुसार मी गेलो, उंची, छाती व वजन नसतानाही योगायोगाने माझी निवड झाली. सुरूवातीला दोन महिने मुंबईला बॉम्बे मोटार ड्रायव्हिंगमध्ये ट्रक आणि इतर गाड्या चालविण्याचे तांत्रिक प्रशिक्षण झाले. आरटीओची ड्रयव्हिंग परिक्षा पास झालो. नंतर आमच्या बॅचला बेसिक प्रशिक्षणासाठी औरंगाबादला पाठविण्यात आले. तेथे आम्हास अवजड वाहने चालविण्याबरोबर गाड्यांच्या इंजिन व इतरसर्व स्पेअरपार्टची माहिती देण्यात आली. नादुरुस्त गाड्या दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सेनादलात प्रत्येक ड्रायव्हर हा स्वत: प्रशिक्षित फिटर असतो. तसे प्रशिक्षण आम्हास देण्यात आले. तसेच बंदूक, स्टेनगन व लाईट मशिनगन चालविण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले. रोज परेड व पीटी होतीच. वर्षभर हे सर्व प्रशिक्षण झाल्यावर आमची आर्मी सप्लाय कोर (ए.एस.सी.एम.टी.) रेजिमेंटसाठी निवड झाली. शेवटची पासआऊट परेड झाल्यावर आमची कंपनी दिल्लीकडे रवाना झाली. तो दिवस १ जानेवारी १९६४ होता. दिल्लीतल्या कडाक्याच्या थंडीचा प्रथमच अनुभव घेतला. थंडीने हाताची बोटे आखडली. शर्टाची बटने लावणे अवघड झाले. महिनाभर दिल्लीत राहिलो. नवीन लष्करी ट्रक आमच्या हवाली करण्यात आले. त्या गाड्या घेऊन आम्ही पंजाबात अंबाला कॅम्पला आलो. अंबालात कालका, नहान, सिमला, रामपूर, टापरी शुगर सेक्टर या पहाडी भागात अवजड ट्रक चालविण्याचे प्रशिक्षण आम्हास देण्यात आले. अंबाला, कालकामार्गे सिमला, टापरी, शुगर सेक्टर अशा अवघड नागमोडी वळणाच्या घाटरस्त्यावरुन गाड्या चालविण्याचे कौशल्य आम्ही संपादन केले. १४ ते १५ हजार फूट उंचीवरील हिमप्रदेशातही गाड्या चालविण्याचे प्रशिक्षण आम्ही घेेतले. हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम सहा महिने चालला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अंबालातून प्रत्यक्ष सरहद्दीवर रसद पोहचविण्याचे काम आम्हास देण्यात आले. हे काम सतत दोन वर्षे चालू होते. माझ्या वयाने पंचविशी पार केली होती. आम्ही पहाटे उठल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत अविश्रांतपणे राबत हातो. त्याचवेळी मनात विचाराने वादळ उठत होते. आपण थंडीवार्‍यात का राबतो? हे सर्व कशासाठी करतो? जीवनाचे रहस्य काय आहे? रोज पहाटे उठा, झोपेपर्यंत सतत धावपळ करा. अखेरच्या श्‍वासापर्यंत ही धावपळ चालू असते. कुणी पोटासाठी धावत असतो. धनिकात आपल्या तिजोर्‍या भरण्याची स्पर्धाच लागलेली असते. माड्या-बंगले बांधले, गाड्या घेतल्या, संपत्तीच्या राशी रचल्या तरी धनिकांची हावहाव आणि खावखाव थांबत नाही. शेवटी इथंच सर्व सोडून त्याला जावे लागते. जग जिंगणारा विश्‍वसम्राट सिंकदरला आपल्या मृत्यूची चाहूल लागली त्यावेळी स्मशानभूमीवर नेताना माझे हात शवपेटीच्या बाहेर काढा असे सांगितले. ‘‘मी जग जिंकले तरी सिकंदर धरतीवर रिकाम्या हाताने आला आणि रिकाम्या हाताने गेला हे जगाला कळू द्या.’’ हा संदेश त्याने जगाला दिला. आपल्या ऋषी-मुनींनीही हाच संदेश दिलेला आहे, पण त्याकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. आपण धनांच्या राशीवर लोळत जगण्यासाठी धडपडतो आहोत. माझ्या जीवनाचा विचार करताना रोज भल्या पहाटे उठा, परेड करा. दिवस मावळेपर्यंत राबा. हे कशासाठी आपण करतोय? रोज उठा, खा, संसाराचं दुकान मांडा. ते चालवित चालवित एक दिवस मरुन जा. एवढ्याचसाठी जीवन आहे का? हे जग ईश्‍वराने कशासाठी निर्मिले? माणसाच्या जीवनाचे ध्येय काय? रात्रीचं स्वप्न आणि आयुष्याच्या स्वप्नात काय फरक आहे? आपण सुवर्ण सिंहासनावर विराजमान झालो आहोत. राजा झालो आहोत. प्रजेने हत्तीवरील अंबारीतून शाही मिरवणूक काढली आहे. सर्वत्र आपला जयजयकार होतो आहे. असे स्वप्न कुणा गरीब माणसास पडले. स्वप्नभंग होताच जाग येते आणि फाटक्या गोधडीतून एक पाय बाहेर आलेला असतो. अशा प्रकारे स्वप्न आणि जीवन यात काय फरक आहे? शरीरातली चेतना निघून गेली की सर्व जाग्यावरच राहते आणि देह मातीला मिळतो. पंचमहाभूते पंचमहाभूतांमध्ये विलीन होतात. कोट्यवधी वर्षांपासून हे जीवनाचे रहाटगाडगे चालू आहे. दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी आपल्या परिवाराची स्थापना करणाराचेही नाव आपणास आठवत नाही. मग माझं माझं करीत जगायचे कशासाठी? इत्यादी अनेक प्रश्‍न, विचारांनी मनाचा गोंधळ उठला. जगायचे कशासाठी? याचे उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे कधीतरी मरायचेच आहे तर परिश्रम करीत का जगायचे? त्यापेक्षा कष्ट, चिंता व ताणतणावातून मुक्तीसाठी नैसर्गिक मृत्यूची वाट न पाहता लवकर मृत्यू स्वीकारायचे ठरविले. कोणत्याही वेदना सहन न करता लवकर मृत्यू येण्यासाठी धावत्या रेल्वेपुढे उडी मारण्यास मी एका दिवशी सिध्द झालो. ते दिल्ली स्टेशन होते. गाड्या सारख्या ये-जा करीत होत्या. एका कमी गर्दी असलेल्या रिकाम्या प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहत विषण्ण मनाने फेर्‍या मारत होतो. खिशात आत्महत्येबाबतचे सविस्तर पत्र होते. फिरता फिरता सहज लक्ष एका बुकस्टॉलवर गेले. त्यावरील स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकाने माझे लक्ष वेधले. ते पुस्तक मी विकत घेतले. गाडी येण्याची वाट पाहत एका बाकड्यावर पुस्तक वाचत बसलो. जसजसं वाचत गेलो तसतसं मन सावधान पावत गेलं. वाचताना वेळेचं भान राहिलं नाही. गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली तेही कळलं नाही. इतका एकाग्र झालो. गाडी पुढच्या प्रवासाला गेली तरी वाचतच होतो. एका बैठकीतच पुस्तक वाचून काढले. त्या पुस्तकात जीवनाचा अर्थ मला सापडला. आत्महत्येचा विचार गळून पडला. दिल्लीवरुन मी अंबालाला ड्युटीवर हजर झालो. 
(अण्णा हजारे यांचे आत्मचरित्र ‘माझे गाव - माझे तीर्थ’ , पृष्ठ १८, १९, २०)
नव्या क्रांतीचा उदय
'त्याग आणि सेवा' ही भारताची चिरंतन मूल्ये आहेत आणि त्या बळावरच ख-या अर्थाने भारताचे उत्थान होईल, अशी स्वामी विवेकानंदांची धारणा होती. स्वामी विवेकानंदांचा हा संदेश अण्णांनी कृतीतून साकारल्याचे दिसते. अण्णा म्हणतात, ' सेनादलाची चाकरी बजावत असताना स्वामी विवेकानंदांची अनेक पुस्तके मी मिळवली. मन लावून वाचली. माणसाला या धरतीवर लाभलेले जीवन हे सेवेसाठी आहे. याचा साक्षात्कार मला विवेकानंदांच्या विचारातून झाला. तुम्हाला ईश्वर हवा असेल तर दरिद्री नारायणाची सेवा करा. दरिद्री नारायणाच्या रुपात तो प्रगत झाला आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. हा स्वामी विवेकानंदांचा संदेश आहे. या संदेशातून जीवनाचे कोडे उलगडले. माझ्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झाला आणि जीवनात नव्या क्रांतीचा उदय झाला.'
पुनरुत्थानाचा मार्ग 
स्वामी विवेकानंद यांनी देशाच्या विकासाचा आणि पुनरुत्थानाचा शाश्वत मार्ग सांगितला आहे. स्वामीजी म्हणतात, 'या देशाचे जीवन म्हणजे धर्म, याला धर्माचीच भाषा उमगते. धर्म हेच याचे प्राणतत्त्व. तुमचे राजकारण, तुमचा समाज, महापालिका, प्लेगनिवारण कार्य, दुष्काळ विमोचन कार्य या सगळ्या गोष्टी केवळ धर्माच्याच माध्यमातून होतील. एरवी तुम्ही कितीही हातपाय आपटलेत आणि आक्रंदने केलीत, तरी त्याचा काय उपयोग नाही.' 
यादवबाबा मंदिराच्या जीर्णोद्धारातून अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीच्या विकासाच्या शुभारंभ केला. ज्ञानेश्वरीतून पाणलोट विकासाचा मार्ग त्यांनी शोधला. अण्णांनी ग्राम विकासाला धर्म आणि अध्यात्माची जोड दिली, यामागे विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. आध्यात्माअभावी vidnya

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी