Sunday, February 1, 2009
मोची समाज जागा होतोय...
सोलापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला आणि कर्नाटक-आंध्रच्या सीमेजवळ वसलेले एक महत्त्वाचे शहर आहे. हुतात्म्यांची नगरी अशीही या शहराची ओळख आहे. शिवयोगी सिद्धराम हे येथील ग्रामदैवत आहे. हे शहर हिंदूबहुल आहे. या शहरात लिंगायत, पद्मशाली, मराठा आणि अन्य समाज मोठ्या प्रमाणात राहतो. सुमारे 2 लाख संख्येने राहणारा मोची समाज हा येथील एक प्रमुख घटक आहे. मादिगा किंवा मातंग समाज म्हणूनही या समाजाला ओळखले जाते. रामायण काळात वीर हनुमंताला लंका उड्डाणासाठी तयार करणाऱ्या वीर जांबुवंतांचा वारसा या समाजाला लाभला आहे.
गेल्या दोन-तीन दशकांपासून या शहराला एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हिंदूबहुल सिद्धेश्वर पेठेत आता हिंदू घरांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच राहिली आहे. अधूनमधून होणाऱ्या दंगलींच्या वेळी या कुटुंबाना दहशतीत वावरावे लागते. लक्ष्मी मंडईजवळ रमजान ईदच्या दिवशी दुकान चालू का ठेवले म्हणून धर्मांधांनी हल्ला चढविल्याची घटना अजून ताजी आहे. मुस्लिमबहुल वस्त्यांमधून आणि कॉलेजमधून हिंदू मुलींना गळाला लावून मुस्लिम बनविण्याचे प्रकार सोलापुरात आता अपवाद राहिले नाहीत. पद्मशाली समाजात याबद्दल काही प्रमाणात जागृती आली असली तरी उर्वरित हिंदू समाजात तेवढी जागृती दिसत नाही. हिंदूबहुल सोलापुरात हिंदू अल्पसंख्यक तर होणार नाहीत ना, अशी शंका मनात येत आहे.
तीन-चार दशकांपूर्वी शहरात दत्त चौकाजवळ एक चर्च होते. ख्रिश्चन समाजाची लोकसंख्याही मोजकीच होती. मशिदींची संख्याही आजच्यासारखी फोफावलेली नव्हती. मुस्लिम बांधव हिंदूंमधे मिळून-मिसळुन राहत होते. दरम्यानच्या काळात आपल्या मूळ स्वभावानुसार हिंदू राजकारणी सर्वधर्मसमभावाचा जप करीत राहिले. अन्य धर्मीयांची विस्तारवादी रणनीती समजून घेण्याची दृष्टी नसल्यामुळे गाफील राहिले. गठ्ठा मतांसाठी दाढी कुरवाळण्याची नीती अवलंबिणाऱ्या नेत्यांचे प्रस्थ राहिल्यामुळे शहरात अन्यधर्मीयांचे वर्चस्व वाढतच राहिले.
शहराच्या विविध भागांमध्ये ख्रिस्ती मिशनरी पैशाच्या बळावर ख्रिस्तीकरणाची मोहीम राबवू लागले. शहराच्या अनेक भागांमध्ये चर्चेसची संख्या वाढू लागली. समाजमंदिरांचे चर्चमध्ये रूपांतर होऊ लागले. हिंदू लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलीबाळींची लग्ने ख्रिस्ती पद्धतीने चर्चमध्ये लावण्यापर्यंत परिस्थितीत परिवर्तन आले.
ख्रिस्ती मिशनऱ्यांचा सर्वाधिक आघात झाला असेल तर तो येथील मोची (मादिगा) समाजावर. सोलापूरच्या जडणघडणीत या समाजाचा वाटा मोलाचा राहिला आहे. समाजात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी आहे, पण व्यवसाय मग ते हातमागावर कपडे विणणे असो की विडी वळणे, यात आघाडीवर आहे. शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळेच ख्रिश्चन मिशनऱ्यांनी या समाजाला लक्ष्य केलं. ख्रिश्चन मिशनरी या लोकांना नोकरीची आमिषे तर कधी पैशाची लालूच दाखवून धर्मांतरं घडवून आणू लागले. मोची समाज जो मोठ्या प्रमाणात होता त्याची दिवसेंदिवस संख्या घटू लागली. ख्रिश्चनांच्या संख्येला मात्र सूज येत राहिली. हे इथेच थांबले असते तर ठीक, पण ख्रिश्चन समाजात लग्न करून गेलेल्या मुली या परत घरी येऊ लागल्या. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच होती.
सुरुवातीला समाजातील लोकांचे याकडे लक्ष नव्हते. हिंदू समाजातील मुलींची ख्रिश्चन मुलांशी बेधडक लग्ने होत होती, मात्र याउलट होत नव्हते. हिंदू मुलाला ख्रिस्ती बनलेल्या मुलीशी लग्न करायचे असेल तर मुलाला ख्रिस्ती बनणे बंधनकारकच होते. मोची समाजातील धुरिणांनी वेळीच धोका ओळखला. समाज जागरूक झाला. ख्रिस्ती मिशनऱ्यांची चालाखी मोची समाजाच्या ध्यानात आली. समाजाने काही नियम बनविले. परिणामी मोची समाजातून ख्रिस्ती बनण्याचा प्रकार थांबला. मोची समाजातील मुलींची लग्ने मोची मुलांशीच होऊ लागली. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मोची समाजातील काही नेत्यांना वश करण्याचा प्रयत्न केला, पण समाजाने भीक घातली नाही.
हिंदू देवदेवतांबद्दल बदनामीकारक, ओंगळ माहिती देऊन हिंदूंच्या श्रद्धा नष्ट करणे. मूर्तीपूजा चुकीची आहे असे सांगणे. तुम्ही मूर्तीपूजा केलात तर नरकात जाल, अशी भीती दाखविणे. आकाशातल्या बापाच्या कळपात आलात तर तुमचे कल्याण होईल असे सांगणे. तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असे सांगणे. चमत्कारांचे कुंभाड रचून देवामुळे चमत्कार घडतोय. जीझस तुमचा कल्याण करेल असे सांगत, धर्मांतरण करणे या प्रकारांनी लोकांना खूप काळ वेड्यात काढणे शक्यच नव्हते. दरम्यान ख्रिस्ती मिशनऱ्यांचा भोंगळपणा उघड करणाऱ्या पुस्तकांचा प्रसार, हिंदू धर्म जागृती सभा आणि व्याख्याने यांमधून मिशनऱ्यांचा खोटेपणा उघड होऊ लागला. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांची लबाडी ओळखली होती. माझ्या हातात सत्ता आली तर प्रथम मी या मिशनऱ्यांना देशाबाहेर काढेन, असे गांधीजी म्हणाले होते. हे सारे विचार मोची समाजासमोर येऊ लागले.
मोची समाजाचा गौरवशाली इतिहास जांबमुनी महोत्सवातून समोर आणण्यात येऊ लागला. मोची समाजाला स्वत:ची ओळख होऊ लागली. मोची समाजात आत्मविश्वास आला. समाज संघटित होऊ लागला. समाजातील तरुण एक झाले. याचा खूप चांगला परिणाम झाला. अज्ञानामुळे, चुकीने, फसले गेल्यामुळे ख्रिश्चन बनलेले बांधव पुन्हा हिंदू समाजात, मोची समाजात दाखल होऊ लागले.
दि. 8 जानेवारी 2009 रोजी सोलापुरातील उपलप मंगल कार्यालयात हिंदू मोची समाजाचा मोठा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. पूर्णानंद भारती महाराज आणि षडाक्षर मुनी स्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला तोडमे गुरुजी, मल्लया महाराज शरदराव ढाले, तायप्पा म्हेत्रे, प्रा. नरसिंग आसादे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अंबादास म्हेत्रे यांनी आपल्या पत्नीसह पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. उपस्थित मोची समाजाने अतिशय आनंदात त्यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर जांबमुनी महाराजांची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली होती. मोची समाज आता जागा होत आहे. लबाड ख्रिस्ती मिशनऱ्यांनो आता सावध राहा.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांची या प्रसंगी आठवण होत आहे. विवेकानंद म्हणतात, ""येशू भारतात आला आहे आणि आकाशातल्या बापाचा आदेश लौकरच फळाला येणार आहे!, असे डंके पिटणाऱ्यांनो, तुम्ही उघड्या कानांनी ऐका, जीझस्ही इथे आलेला नाही आणि येहोवा त्याहून आलेला नाही. ते येण्याची सुतराम शक्यताही नाही. आपापल्या चुली सांभाळताना त्यांना इथे यायला उसंत देखील होणार नाही !
तुम्हाला जर ही दैवते सोसत नसली तर रामराम! तुमच्यासारख्या मूठभर करंट्यांसाठी काय या देशाने दम उखडावा आणि मुलखाचे नीरस जीवन पत्करावे? एवढे जग तुमच्यापुढे पडले आहे. शोधा की, तुम्हाला सोयीचे कुरण मनमुक्त चरायला! पण हे मूठभर करंटे असे गुण्यागोविंदाने जातील थोडेच? तसे करायलाही हिंमत लागते. ते शिवाच्या या भूमीतच पोटे भरून घेतील, पण शिवाचीच बदनामी करतील आणि कोण्या परक्या प्रेषिताचे गोडवे गातील!''
-सिद्धाराम भै. पाटील २९ जनुअरी ०९
www.psiddharam.blogspot.com
mobile: 9325306283
Tuesday, January 27, 2009
विजय! पूर्ण विजय!!
युवाशक्तीला घातलेली साद
31 डिसेंबर 2008 ते 4 जानेवारी 2009 या कालावधीत महाराष्ट्रातील युवाशक्तीचे शेगाव (जि। बुलढाणा) येथे महाशिबीर झाले।
Thursday, January 22, 2009
Tuesday, January 20, 2009
अडाणी निरक्षर की जागरूक साक्षर

मकरंद मुळे
"त्यांचाच' खुनी हात परत धरत गेलो।।
आपली सामूहिक स्थिती यापेक्षा फारशी वेगळी नाही. घटना घडतात. आक्रोश होतो. चर्चा होते. श्रद्धांजलीच्या सभा होतात आणि आता होर्डिंग्जही लागतात, परंतु अजूनही आपल्या देशाचा नेमका शत्रू कोण? आपल्याला कोणाला धडा शिकवायचा आहे ? याबद्दल आपण अज्ञानी आहोत. अडाणीपणाची ही स्थिती सार्वत्रिक आहे. माध्यमे, नोकरशहा, राजकारणी, बुद्धिवंत, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) व निधर्मी (?) आदी त्यांच्या निहित स्वार्थासाठी (वेस्टेड इंटरेस्ट) व वैयक्तिक अजेंड्यासाठी मिशनरी, इस्लामिक व कम्युनिस्ट दहशतवादाबाबत निरक्षर राहू इच्छितात. सर्वसामान्य भारतीय त्याच्या रोजच्या जगण्याच्या संघर्षात इतका गुरफटलेला आहे की, या निरक्षरतेविषयी त्याला काही सोयरसुतक नाही आणि म्हणून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर दहशतवाद या शब्दामागे "स्वदेशी' शब्द हेतूत: लिहितात. दिशाभूल करणारा नवा शब्द "कॉईन' करून स्थापित करण्याची बौद्धिक चूक करू शकतात. गैरसमज पसरविणारी वैचारिक खेळी करतात, याला त्याच परिभाषेत सणसणीत प्रत्युत्तर देण्याचे धाडस करण्यात आपण असमर्थ आहोत. आपली बौद्धिक उदासिनता याला कारणीभूत आहे. खरे तर कुमार केतकर यांच्या "स्वदेशी दहशतवाद' यातील बुद्धिभेद उघड करणे फारसे अवघड नाही. मुळातच दहशतवाद हा भारतीय भूमीतला नाही. ही भूमी दहशतवादाची बळी ठरलेली आहे. परकीयांनी साम्राज्य विस्तार, धर्म विस्तार व कम्युनिझमचा पगडा यासाठी भारतात दहशतवाद आणला. रशिया, चीन, युरोप, अमेरिका, इंग्लंड व इस्लामिक देशांतून आलेला हा दहशतवाद यत्किंचितही निर्बुद्ध नाही. या दहशतवादाने मूळनिवासी, बहुजन-अभिजन, दलित-दलितेतर, अल्पसंख्याक, आर्य-अनार्य, नेशन इन मेकिंग, निधर्मीवाद, धर्मनिरपेक्षता वंचित-शोषित अशी अ-भारतीय परिभाषा बेमालूमपणे रूढ केली आहे. केतकरसारख्या प्रभृतींनी ती प्रचलित केली आहे. याचा आधार घेऊन या परकीय दहशतवादाने भारतीय सण, परंपरा, संस्कृती, उत्सव, मान्यता यांवर पाश्चिमात्त्य मापदंडाच्या आधारे टीका करून सामाजिक विद्वेष पसरविला. प्रलोभने, धाकधपट याद्वारे छुपे धर्मांतर सुरू केले. भारतीय समाजाची मानसिकता लक्षात घेऊन या दहशतवादाने सेवेचा मुखवटा धारण केलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपले तत्त्वज्ञान मांडण्यास सुरुवात केली. या स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) इंग्रजी प्रसारमाध्यमांनी सामाजिक नेतृत्व बहाल केले आहे. दहशतवाद, तत्त्वज्ञान म्हणून रुजला, कारण एक प्रचंड अर्थकारण, दुसरे "जुने जाऊ द्या मरणा लागोनी' ही वृत्ती, तिसरे परक्यांचे आकर्षण, चौथे इतिहासाकडे दुर्लक्ष, पाचवे वैचारिक-बौद्धिक क्षेत्राविषयी अनास्था, सहावे भ्याड व तडजोडी वृत्ती आणि सातवे "स्व'त्वाचा शोध नाकारणे हे आहे.
ज्यांना तत्त्वज्ञानाच्या रूपात दहशतवाद सांगणे अवघड असते किंवा कळत नाही; पण ज्यांना मरण्याची, मारण्याची भाषा कळते त्यांच्या हातात बंदूक-बॉम्ब देणे सोपे असते. त्यांचे पंथीय, भाषिक, जातीय अहंकार जागवून त्यांच्या तत्कालीन गरजा पूर्ण करून आपल्याला हवे ते कृत्य करून घेता येते. इथे कुमार केतकर यांच्या परिभाषेतील स्वदेशी दहशतवाद पुढे येतो. हा "स्वदेशी' दहशतवादी "केवळ जन्माने' भारतीय असतो. त्याचे केवळ "डोमिसाईल' भारतीय असते. तो "काया वाचा मनाने' परकीय झालेला असल्यानेच तो भारतविरोधी दहशतवादी कृत्य करू शकतो. किंबहुना, तो अनेकदा धर्मांतरित असतो; ज्याची नोंद झालेली नसते. हे सर्व सविस्तरपणे लिहिण्याचे कारण कुमार केतकर यांनी आसाममध्ये नुकत्याच झालेल्या स्फोटांचा संदर्भ घेऊन लोकसत्तेच्या अग्रलेखात स्वदेशी दहशतवादाची चर्चा केली आहे. ज्या भारताच्या भूभागाचा संदर्भ कुमार केतकर देतात तो पूर्वांचल मिशनरी कारवाया व बांग्लादेशी घुसखोरीने त्रस्त आहे. स्वातंत्र्यापासून "नेहरू डॉक्टरीन'चे कुमार केतकर चाहते आहेत. त्या "नेहरू डॉक्टरीननेच पूर्वांचलावर जाणीवपूर्वक अन्याय केला आहे. याच जवाहरलाल यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न युनोत नेला. पूर्वांचल व जम्मू-काश्मीरमध्ये फुटिरतावाद जोपासला गेला. हा फुटिरतावाद राजकारण्यांनी सत्तेसाठी वापरला, हाच फुटिरतावाद आता दहशतवादाच्या रूपात थैमान घालत आहे. याला "स्वदेशी' हे विशेषण लावणे म्हणजे भारतविरोधकांच्या हाती कोलित देणे आहे. हे न कळण्याइतके केतकर साहेब निरागस नाहीत. तरीही कुमारजी असे लिहितात म्हणजे ते दहशतवादाबद्दल सोईने निरक्षर राहू इच्छितात. प्रत्येकाच्या अशा सोईच्या भूमिकांमुळेच दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी "राष्ट्रीय भूमिका' तयार होत नाही. दहशतवादाला धर्म नसतो, असा कंठशोष बेंबीच्या देठापासून करायचा आणि त्याचवेळी "स्वदेशी' दहशतवादाचे पिल्लू सोडून द्यायचे या दुटप्पीपणाने समूहमन घडत नाही, ते गोंधळते. असे गोंधळलेले नागरिक "मला काय त्याचे?' या मानसिकतेत जातात व कर्तव्य विसरतात. या पार्श्वभूमीवर आणखी काही बातम्या पाहूया.
दि. 31 डिसेंबरच्या "हिंदुस्थान टाईम्स'ने वर्षभरातील काही प्रमुख घटना प्रकाशित केलेल्या आहेत. यात या इंग्रजी दैनिकाने ओरिसातील चर्चवरील हल्ला याची नोंद घेतली आहे, पण समाजसेवक स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची मिशनरी पुरस्कृत निर्घृण हत्या हिंदुस्थान टाईम्सला नोंदवावी असे वाटले नाही. दि. 1 जानेवारी 09 च्या "दि टाईम्स ऑफ इंडिया'च्या पहिल्या पानावर रशिया येथून हनिमूनसाठी आलेल्या दांपत्याने "लॉंग किस' देऊन नववर्षाचे स्वागत केल्याचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. मात्र त्याच रात्री ठाण्यातील शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन दहशतवादाच्या विरोधात राष्ट्रगीत गायन करून नव्या वर्षाचे स्वागत केल्याची बातमी छापावीशी वाटली नाही. मंगलोर (कर्नाटक) येथे चर्चवर हल्ला झाल्याची, ख्रिश्चनांना मारहाण झाल्याची बोंब एकमुखाने प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाने दणदणीतपणे मारली, परंतु "न्यू लाईफ ख्रिश्चन सेक्ट'च्या घटनाविरोधी कारवायांविषयी माहिती देण्याची हिंमत कोणी केली नाही. या सेक्टने "सत्यदर्शिनी' या पुस्तिकेचे मंगलोर, उडपी, चिकमंगळूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाटप केले होते.
या पुस्तिकेतून हिंदू देवदेवतांची विटंबना करण्यात आली होती.या सेक्टने अनधिकृत प्रार्थनास्थळे (चर्च) उभारली आहेत. मंगलोरमधील संघर्ष पोलीसविरुद्ध न्यू लाईफ असा झाला होता. ज्याला तथाकथित "नॅशनल मिडिया'ने आपल्या मालकांशी एकनिष्ठता राखून हिंदू-ख्रिश्चन दंगल असे स्वरूप दिले होते. प्रत्यक्षात न्यू लाईफच्या प्रार्थनास्थळातून पोलिसांवर दगडफेक झाली होती. मिशनरी समर्थकांनी जनजीवन विस्कळीत केले होते. पोलिसांनी या प्रार्थनास्थळावर कारवाई केल्यावर त्यांना अवैध शस्र मिळाली होती.
दि. 27 डिसेंबर रोजी "द इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाने ओरिसातील कंधमहाल येथील हुतात्मा स्वामी लक्ष्मणानंद यांच्या हत्येविषयी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी "हेडिंग'म्हणून प्रकाशित केली होती. अतिशय सविस्तर असलेल्या या बातमीत सीआयडीने कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य राधाकांत नायक यांना सबळ पुराव्याच्या आधारे स्वामीजींच्या हत्येसाठी दोषी ठरविले असल्याचे म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसने या बातमीचा सलग तीन दिवस पाठपुरावा केला आहे. स्वाभाविकच ही बातमी देणे म्हणजे सेक्युलॅरिझमच्या विरोधात जाणे ठरले असते हे जाणून अन्य सर्व माध्यमांनी ही बातमी दुर्लक्षित केली. हा सर्व घटनाक्रम माध्यमे दहशतवाद व राष्ट्रविरोधी कारवायांना पुष्ट करत आहेत हे दर्शविणारा आहे.
ईमेलद्वारा दोन बातम्या स्वरूपातील माहिती मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर एकमेकांना मोठ्या संख्येने पाठविल्या जात आहेत. यातील एक मेल दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये 60तास ओलीस ठेवलेल्या व नंतर ठार केलेल्या स्री, पुरुष, लहान मुलांशी केलेल्या विकृत अमानवी व्यवहाराची इत्यंभूत माहिती देणारा आहे. डोळे काढणे, बोट कापणे, नख उपटणे, स्रियांच्या गुप्तांगात गोळ्या घालणे, पाशवी बलात्कार करणे, केस उपटणे, ओलिसांवर विशेषत: मूल व स्रियांवर लघवी करणे, त्वचा खेचणे, कान-नाक यासह अन्य अवयव कापणे अशी माणुसकीला काळीमा फासणारी ही कृत्ये आहेत. मेलमधील माहितीनुसार या दुर्दैवी नागरिकांना "अधिकृत मृत' घोषित करणाऱ्या डॉक्टरांनी व त्यांची प्रेते शवागारात ठेवणाऱ्यांनी ही माहिती दिली असल्याचे म्हटले आहे. या माहितीच्या आधारे दै. सामना व दै. लोकमत व्यतिरिक्त कुठल्याही "मोठ्या' वृत्तपत्राने बातमी दिलेली नाही. कुठल्याही वृत्तवाहिनीला ही ब्रेकिंग न्यूज वाटलेली नाही. विशेष म्हणजे ही बातमी (मेल) अतिरंजित, कपोलकल्पित असल्याचे कुठल्याही शासकीय यंत्रणेने अद्याप म्हटलेले नाही. दुसरी मेल दक्षिणेतील एका नागरिकाने सर्व वाहिन्यांना पाठविलेली आहे. वािहन्यांनी 60 तास बातमी दिली ती ताज, ओबेराय येथील धुमश्चक्रीची, छत्रपती शिवाजी टर्मिंनस या सर्वसामान्य माणसाच्या रेल्वेस्थानकाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
ज्यांना यापूर्वी देशातील कुठल्याही दहशतवादी कृत्याची झळ पोचली नव्हती, ज्यांना स्फोटात मरणाऱ्या भारतीयांच्या रक्ताची किंमत नव्हती अशा उच्चभ्रूंचे दु:ख ग्लोरीफाय करण्यात धन्यता मानली. ही सर्व उदाहरणे "त्यांचाच' खुनी हात परत धरत गेलो, याची साक्ष देतात.
"बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो...'
हे समाजवादी स्वप्नरंजन वास्तवात परावर्तित करायचे असेल तर भारतीय संस्कृतीशी ओळख करून घ्यावी लागेल. आपल्या मूळांचा शोध घ्यावा लुागेल. (बॅक टू रुटस्) असा प्रयत्नपूर्वक शोध अरुणाचल प्रदेशातील तरुणांनी नुकताच घेतला आहे. चार हजार तरुण-तरुणींनी स्वधर्म युवा महोत्सवात भाग घेतला होता. (इंडिजीनस् युथ फेस्टिव्हल) अरुणाचलात 1952 साली पहिले चर्च उभारले गेले आहे. त्यानंतर धर्मांतराला सुरुवात झाली. 1980 नंतर ख्रिस्ती धर्मप्रसारक आक्रमक झाले आणि त्यांनी अरुणाचलात थैमान घातले. याच्याविरोधात 1986 साली पासीघाट येथे तालुम रुकबो यांनी "दोन्थी पोलो येलम केवांग' या नावाने साकार उपासना पद्धती सुरू केली. दोन्थी पोलो याचा अर्थ सूर्यचंद्र असा आहे. दद्य जिल्ह्यात 450पेक्षा अधिक ठिकाणी गांगीर (आदि), न्योदर नाम्लो (न्यीटी), मेदर नेलो (आपातामी), इंगतोंगहोम (तांगसा, तुक्सा, नॉवटे) अशा विविध भाषांतून उपक्रम सुरू झाला आहे. राज्यात विविध जनजातींच्या स्वधर्म संघटनात समन्वय असावा यासाठी "इंडिजीनस फेथ ऍन्ड कल्चरल सोसायटी ऑफ अरुणाचल प्रदेश' ही समिती कार्यरत आहे. या समितीतर्फे युवा महोत्सव होतो. यंदाच्या युवा महोत्सवात अरुणाचल राज्यातील 15 जिल्ह्यांतील 16 जनजातींच्या युवक-युवती सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवात स्वधर्म रक्षणात युवकांचा सहभाग, बांग्लादेशी घुसखोरी, चीनचे छुपे आक्रमण या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. समाजावरील संकट, राष्ट्रावरील आक्रमणाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्वधर्म रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचा संकल्प झाला. धर्मांतरांवर कायद्याने बंदी आणण्याची मागणी केली गेली. भारतीय संस्कृतीच्या शत्रूंना इशारा देण्यात आला. अरुणाचलातील तरुणाईने प्रतिकूल परिस्थितीतही आपला शत्रू ओळखला आहे. दहशतवादाविरुद्ध साक्षरता अभियान सुरू केलेले आहे. अज्ञानाचे आवरण काढून राष्ट्रीय विचारांचे ज्ञानदीप प्रज्वलित केले आहेत.
वाचकहो, आता आपण निरक्षर, अडाणी राहणार की साक्षर होऊन शत्रूची ओळख करून घेणार ? हा कळीचा मुद्दा आहे.
mak2244@gmail.com
9869296109
Monday, January 19, 2009
पत्रकारांची कार्यशाळा

पत्रकार प्रशिक्षित असतो तेव्हा तो अधिक कुशलतेने आपले दायित्व पार पाडू शकतो, परंतु विडंबना तेव्हा होते, जेव्हा पत्रकार जुना होतो. मात्र, तो अप्रशिक्षित राहतो. जुना असल्यामुळे त्याला वाटू लागते की, आपल्याला सारं काही येतं. माहिती आणि अनुभवाच्या स्तरावर ते खरंही असतं, परंतु व्यवस्थित प्रशिक्षण आणि वैचारिक स्पष्टतेअभावी त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक साचलेपण येऊ लागतं. अशा वेळी प्रवाही न राहलेल्या साचल्या पाण्याचे जे होते, ते पत्रकाराचे होणे अगदी स्वाभाविकच आहे म्हणूनच प्रशिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते।
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची धुरा दशरथ वडतिले यांच्याकडे आल्यापासून सोलापुरातील पत्रकारितेने जणू कात टाकली आहे. सोलापुरातील पत्रकारांमध्ये संघभाव निर्माण झाला आहे. एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आत्मविश्वासाला गुणवत्तेची जोड असेल तर विधायकता येते, हे ध्यानात घेऊन संघातर्फे खास पत्रकारांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सोलापूर विद्यापीठ जनसंज्ञापन विभाग आणि पत्रकार संघाने आयोजिलेली शनिवारची कार्यशाळा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरली।
शहर-जिल्ह्यातील पत्रकारांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, जळगाव, लातूर, धाराशिव, धुळे, नगर, कोल्हापूर आदी भागातील पत्रकारितेचे विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दीर्घकाळ प्रभावीपणे काम करीत असलेले डॉ. समीरण वाळवेकर व प्रसाद काथे यांच्या सत्रांनी कार्यशाळेला एका उंचीवर नेऊन ठेवले. पत्रकारितेत नव्याने येऊ घातलेल्या संकल्पना सुलभपणे सांगण्याची हातोटी समीरण यांच्याकडे आहे।
पत्रकारांना घडविण्याच्या प्रक्रियेत बदल होणे आवश्यक आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना केवळ कालबाह्य अभ्यासक्रम शिकविणे उचित होणार नाही. सगळ्याच वाहिन्या या उदात्त ध्येयाने नाही, तर व्यावसायिक उद्देशाने सुरू करण्यात आल्या आहेत. आता माध्यमकर्मींना तंत्रज्ञानाची भाषा समजून घ्यावीच लागेल. मुद्रित क्षेत्रातील अनुभवी मंडळी इलेक्ट्रानिक माध्यमांत येण्यास तयार नाहीत, हे दुर्दैवी चित्र आहे. विद्यापीठांनी पत्रकारिता अभ्यासक्रम अद्ययावत केला पाहिजे, असे विचार वाळवेकर यांनी मांडले।
दुर्दैवाने इलेक्ट्रानिक मिडियाला समर्पित असा अभ्यासक्रम कोठेही शिकविण्यात येत नाही. दीड ते दोन लाख रूपये शुल्क भरून सर्वसामान्य विद्यार्थी या कोर्सेससाठी जाणे कठीण आहे. त्यामुळे या क्षेत्रात कच्च्या मालाची अर्थात नवोदित क्षमतावान पत्रकारांची निकड जाणवते. लोकांनी आपली निवड सुधारायला हवी. माध्यमांवर सरकारने नाही तर जनतेने अंकुश ठेवायला हवा, असे विचार प्रसाद काथे यांनी व्यक्त केले. सोलापुरातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी अध्यक्षस्थान भूषविले. अध्यक्षीय भाषणांतून काही प्रमाणात पत्रकारांमध्ये ध्येयवाद जागविण्याचा प्रयत्न झाला।
संतोष पवार, प्रवीण सकपाळ, दीपक होमकर सारख्या तरुण पत्रकारांनी कार्यशाळेतील सत्रांमध्ये समन्वयकाची भूमिका यशस्वीपणे बजावली. पत्रकारितेत येणाऱ्या नव्या प्रवाहाशी कसे जुळवून घ्यायचे आणि एक पत्रकार म्हणून स्वत:चा विकास कसा करायचा याबद्दलची शिदोरी साऱ्या तरुण पत्रकारांना या कार्यशाळेतून निश्चितच मिळाली.कार्यकुशलता अंगी बाणवण्याच्या दृष्टीने कार्यशाळा यशस्वी झाली, असा भाव बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता, परंतु कार्यशाळेत वैचारिक स्पष्टतेच्या अंगाने विचारमंथन झाले असते तर कार्यशाळा आणखी सार्थक ठरली असती असे वाटते।
26/11 च्या घटनेबद्दल बरीच चर्चा झाली. या घटनेत सरकार कसे निष्क्रिय होते. प्रशासकीय स्तरावर ताळमेळ कसा नव्हता. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा बेजबाबदारपणा आणि त्यामुळे त्यांची गच्छंती कशी झाली? याची चर्चा झाली. मात्र, या देशात अतिरेकी हल्ले का होतात? जिहादी मानसिकतेचे मूळ कोठे आहे? राज्यकर्ते गठ्ठा मतांकरिता दहशतवादाला पाठिशी कसे घालतात? वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार राज्यकर्त्यांच्या या ढोंगी धर्मनिरपेक्षतेकडे दुर्लक्ष का करतात? घटनेनुसार सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारण्यात आले असतानाही गोरगरीब हिंदूंचे धर्मांतरण करण्यात येते, यामुळे समाजात असंतोष निर्माण होतो. अशावेळी अल्पसंख्यकांच्या बाजूनेच बातमीदारी का करण्यात येते? यामागे परकीय षडयंत्र असते का? अशा या देशाला छळणाऱ्या महत्त्वपूर्ण विषयांबाबत पत्रकार म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? याचा ऊहापोह झाला असता, तर यशस्वी झालेली ही कार्यशाळा आणखी परिपूर्ण यशस्वी झाली असती, असे वाटते।
१९ जनुअरी २००९ पान ४ , तरुण भारत। सोलापुर
Sunday, December 28, 2008
सारखी लायकी
सारखी लायकी नको बढायकी
कुणी कुणासंग भांडायचं न्हाय
गावकीत अमुच्या ठरलच हाय ।।धृ।।
जमीन जुमला अन् गोठ्यातली गाय
कर्जापाण्यापायी इकायची न्हाय
मौजेत पुख्खा ताडीन् माडी
आल्यागेल्याबरूबर प्यायाचं न्हाय ।।1।।
इठुरखुमाईच्या भक्तीशिवाय
गावून डोलून त्या भजनात काय
सरसी करायला तालासुरांची
डोस्क्यात टाळ कुणी घालायची न्हाय ।।2।।
गावोगावी वर्ग सुरूच हाय
केंद्राबिगर गाव सोभायचं न्हाय
आपल्याच गावात ऱ्हायाचं थाटात
भिवूनशान् आता भागायचं न्हाय ।।3।।
Tuesday, December 23, 2008
समर्थ भारत
जगात सर्वात कार्यक्षम आणि सर्वात वजनाने हलकी, लहान लढाऊ विमान भारताने विकसित केले आहे।
कांची पीठातर्फे चालवली जाणारी चेन्नई येथील शंकर नेत्रालय हे आधुनिकता आणि सेवा यात आशिया खंडात सर्वप्रथम आहे।
मुंबई उपनगरीय रेल्वे दररोज 59 लाख प्रवाशांची वाहतूक करते। जगातली ही सर्वाधिक संख्या आहे.
1077 उपनगरीय रेल्वे केवळ 288 ट्रॅकवर धावतात, ही आश्चर्यजनक किमया आहे।
जगातली पहिली 4 stroke gear scooter बजाज कंपनीने 25 जुलै 1991 रोजी बाजारात आणली।
जय हिंद! जय हिंद की सेना॥ भारताची भूदल सेना (1 कोटी 10 लाख) जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे।
जय हिंद! जय हिंद की सेना॥ भारताची भूदल सेना (1 कोटी 10 लाख) जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे।
"जयपूर फुट' artificial limbs of Jaipur जगात प्रसिद्ध आहे।
भारतात 5195 औद्योगिक कंपन्या असून जगात भारत यात दुसऱ्या क्रमांकावर आहे।
संस्कृत ही प्राचीन भारतीय भाषा संगणकासाठी सर्वाधिक उपयुक्त असल्याचे जगाने मान्य केले आहे।
पाणिनी व्याकरणाची तत्वे सांकेतिक भाषेतून आज software निर्मितीत वापरली जातात।
अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था जगातील अग्रगण्य संस्थांत गणली जाते।
जगातील सर्वात मोठे टपाल खाते भारतात आहे।
सोलापूर वालचंद कॉलेजमधील प्रा। सयाजीराव गायकवाड (वय 35) यांनी विज्ञानाला अज्ञात असलेल्या 10 वनस्पती शोधल्या आहेत.
कॅन्सरवर effective painkiller चा शोध भारतातील प्रा। अश्रु सिन्हा व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला.
अभिनव बिंद्रा यांनी 600 पैकी 600 गुण मिळवून नेमबाजीत जागतिक विक्रम केला आहे।
रेल्वे नेटवर्किंग आणि अधिक सुरक्षित प्रवास यातही भारत सर्वप्रथम आहे।
जगात 8 व्या नंबरची लोकप्रिय व्यक्ती नारायणमूर्ती (Infosys चे अध्यक्ष) असून ते जनसेवेसाठी उत्पन्नातील 12 कोटी रुपये दरवर्षी राखून ठेवतात।
लता मंगेशकर यांनी 1991 पर्यंत 20 भारतीय भाषांतून 30 हजार गाणी ध्वनिमुद्रित केली होती।
जगात सर्वाधिक सिमेंट उत्पादन करणारा देश भारत आहे।
जपान, अमेरिकेनंतर super computer बनवणारा भारत हा एकमेव देश आहे।
स्वत:ची उपग्रह प्रक्षेपण क्षमता असणाऱ्या जगातल्या 6 देशांत भारताचा समावेश आहे। इतर देशांचे उपग्रह भारत भाडेतत्वावर प्रक्षेपित करतो.
जगातली सगळ्यात मोठी चित्रपट सृष्टी भारतात असून सर्वात जास्त चित्रपट भारतात बनविले जातात।
UNESCO कडून पुस्तकांची राजधानी म्हणून 2003 साली दिल्लीची निवड करण्यात आली।
विनोद धाम हे Hardware (pentium) चे पिता म्हणविले जातात।
Hotmail चे निर्माते साबिर भाटिया हे भारतीयच।
जगातली पहिली महिला विमानचालक भारतीय आहे।
जगात सर्वाधिक सायकली भारतात निर्माण केल्या जातात। हीरो सायकली दरवर्षी 60 लाख या संख्येत तयार केल्या जातात.
जगात सर्वश्रेष्ठ हातपंप India Mark 2 भारताने विकसित केले आहे।
India Mark 2 ची दरवर्षी 1 लाख पंपनिर्मिती केली जाते। जगातील अनेक देशांना निर्यातही केल्या जातात.
जर येथील लोक संगठित, प्रशिक्षित आणि मोठ्या ध्येयाने प्ररित केले तर लोकसंख्या ही समस्या नव्हे आपले बलस्थान बनेल।
भारतात प्रति हेक्टर कृषि भूमीवर 5।5 लोक अशी स्थिती आहे. जपानमध्ये हे प्रमाण 30.2, युरोपात 5.9 आहे.
आम्ही भारताचे ऋणी आहोत, कारण त्यांनीच आम्हाला गणित शिकवलं, नसता आजचे वैज्ञानिक शोध लागलेच नसते। - -अल्बर्ट आईन्स्टाइन
जगातल्या कोणत्याही देशापेक्षा भारतातली भूमी दुपटीहून अधिक उपजाऊ आहे।वर्षातून तीन पिके घेण्यासाठी आवश्यक वातावरणही भारतातच आहे.
यज्ञवेदी तयार करणाऱ्या प्राचीन ऋषींनी भूमितीतील अनेक प्रमेये शोधून काढली।
शून्याचा शोध भारताने लावला।
Monday, December 22, 2008
राष्ट्रभक्ती ले हृदय में
राष्ट्रभक्ती ले हृदय में हो खडा यदी देश सारा
संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा ।।धृ।।
क्या कभी किसने सुना है, सूर्य छिपता तिमीर भय से
क्या कभी सरिता रूकी है, बांध से वन पर्वतोंसे
जो न रूकते मार्ग चलते, चीर कर सब संकटोंको
वरण करती कीर्ती उनका, तोडकर सब असूर दल को
ध्येय मंदीर के पथीक को, कंटकों का ही सहारा ।।1।।
हम न रूकने को चले है, सूर्य के यदि पुत्र है तो
हम न हटने को बढे है, सरित की यदी प्रेरणा तो
चरण अंगद ने रखा है, आ उसे कोई हटा दे
दहकता ज्वालामुखी यह आ उसे कोई बुझा दे
मृत्यू की पीकर सुधा हम चल पडेंगे ले दुधारा ।।2।।
ज्ञान के विज्ञान के भी, क्षेत्र में हम बढ पडेंगे
नील नभ के रूप के नव, अर्थ भी हम कर सकेंगे
भोग के वातावरण में, त्याग का संदेश देंगे
त्रास के घन बादलोंसे, सौख्यकी वर्षा करेंगे
स्वप्न यह साकार करने, संघटित हो हिंदू सारा ।।3।।
विजय की यदि प्रेरणा ले, चल पडेंगे हम सभी
संकटोंके दल यहां से, भाग जाएंगे सभी
संघटन के सूत्र मे हम, हृदय जोडेंगे तभी
मातृभूको हम सजाएँ, वैभवोंसे हम सभी
परम वैभव प्राप्त करने, संचरित हो केंद्र धारा ।।4।।
Saturday, December 13, 2008
गायी गोपालक संघास
मदरशातून जप्त केलेल्या गायी
गोपालक संघास देण्याचा आदेश
सोलापूर : जोडभावी पेठेतील चिराग अली तकियाजवळील मदरशातून जप्त केलेले 58 बैल आणि 11 गायी सांभाळ करण्यासाठी गोपालक संघाकडे देण्याचा आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला.
सोलापूर जिल्ह्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच निकाल आहे. 58 बैल खाटकांना देण्याची मागणी न्यायालयाने गुरुवारी फेटाळली होती. 9 डिसें.ला बकरी ईददिवशी बेकायदा कत्तलींसाठी आलेल्या या जनावरांची हिंदुत्ववादी संघटनांनी सुटका केली. नंतर पोलिसांनी ही जनावरे कोंडवाड्यात ठेवली होती. आज न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. त्याचबरोबर 8 जनावरांची कत्तल ही टळली.
मदरशातून मुक्त करण्यात आलेल्या गायी-बैलांचा सांभाळ करण्याची तयारी गोपालक संघाने अर्जाद्वारे न्यायालयासमोर दाखवली होती. न्यायालयाने गुरुवारी यावरील निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी संध्याकाळच्या सत्रात न्यायाधीश डागा यांनी हा निकाल दिला. गोपालक संघाच्या वतीने ऍड. कणबसकर, ऍड. म्हाळस व रमा कणबसकर यांनी काम पाहिले, तर विरोधी बाजूने ऍड. कोथिंबिरे यांनी काम पाहिले.
पोलीस निरीक्षक काणे यांनी गोपालक संघाच्या गोशाळेस भेट देऊन पाहणी केली. गायी-बैलांचा सांभाळ करण्याची व्यवस्था गोपालक संघाकडे असल्याची खात्री काणे यांनी करून घेतली. तसा अहवाल न्यायालयाकडे सादर केला. त्यानंतर न्यायालयाने निकाल दिला. गोपालक संघ गायी-बैलांचा मालक नाही, असा युक्तिवाद ऍड. कोथिंबिरे यांनी केला. गोपालक संघ ही सामाजिक संस्था आहे. संस्थेकडे गायी-बैलांना सांभाळण्यासाठी पुरेशी जागा आहे. गायी-बैलांच्या संरक्षणाची व्यवस्था आहे, अशी बाजू न्यायालयापुढे मांडण्यात आली.
कायदेशीर तरतुदी
प्राणीरक्षण कायदा अधिनियम 6 नुसार गायी-बैल आणि म्हशींच्या कत्तलींवर पूर्णपणे बंदी आहे. 15 वर्षे वयापर्यंतचा बैल शेतीसाठी उपयुक्त असल्याने, त्याच्या कत्तलीवरही बंदी आहे. काही कारणाने बैल शेतीकामासाठी उपयुक्त नसेल तरच बैलांची कत्तल करण्यास परवानगी आहे. (गायीच्या नव्हे); परंतु अशा बैलांची कत्तल करण्याआधी पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. कत्तल करण्यासाठी परवानगी दिलेल्या बैलाच्या शरीरावर खूण करून कोणत्या कत्तलखान्यात कत्तल करण्यात येणार आहे. याची निश्चितीही संबंधित अधिकारी करतात. या कायद्याचा भंग करणाऱ्यास 1 हजार रुपये दंड किंवा 1 वर्षे कारावास किंवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी होऊ शकतात।
दै। तरुण भारत, पान ५, १३ दिसम्बर २००८
Monday, December 8, 2008
बापूसाहेब नावाचा दीपस्तंभ
पूर्णवेळ समाजकार्य करणाऱ्या प्रचारक कार्यकर्त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील परंपरा अत्यंत समृद्ध आहे। ऐन उमेदीच्या वयात व्यक्तिगत आकांक्षा आणि निजी जीवनाची उभारणी (आजच्या परिभाषेत करिअर) पूर्णपणे बाजूला सारून नि:संगपणाच्या वाटेवर काही पावले चालण्याची प्रेरणा आजवर हजारो तरुणांंच्या मनात जागविण्यात ही संघ परंपरा यशस्वी ठरली आहे. अगदी प्रारंभीच्या काळात अनेकांनी याच वाटेवर आपली मार्गक्रमणा अखंडितपणे करून आपली जीवनयात्रा संपन्न केली. तर अन्य अनेकांनी काही वर्षांनंतर प्रचारकी दिनक्रम थांबवून व्यक्तिगत जीवनाचा मार्ग पत्करला. मात्र व्यक्तिगत जीवनाकडेही त्यांनी साधना म्हणूनच पाहिले. प्रचारकी जीवनाच्या काळात प्राप्त केलेल्या जीवनदृष्टीच्या प्रकाशातच प्रत्येक पाऊल टाकण्यात आणि आपल्या कौटुंबिक जीवनाचा प्रत्येक पैलू घडविण्यात इतिकर्तव्यता मानली. चं.प. तथा बापूराव भिशीकर हे अशा तपस्वी व्यक्तिमत्त्वांपैकीच एक.
एकूण 93 वर्षांच्या आयुष्यातील 5-6 वर्षे बापूसाहेब संघाचे प्रचारक राहिले। त्यानंतरच्या 65 वर्षांमध्येही प्रचारकी मानसिकतेचा एक क्षणासाठीही त्यांनी कधी विसर पडू दिला नाही. सामूहिकता, अनामिकता, साधनसुचिता, गुणग्राहकता, मूल्यांबाबतच्या निष्ठा, प्रथमपुरुषी एकवचनी वृत्तीतून स्वत:प्रती कठोर आणि अन्यांप्रति क्षमाशीलतेचे औदार्य या साऱ्या बाबींचा विकटस्पर्श त्यांच्या वृत्तीप्रवृत्तींनी सतत जोपासून ठेवला. संघाच्या वाट्याला आलेल्या संघर्षात साहस, संयम आणि दृढनिष्ठेने सामोरे जाणाऱ्या आघाडीच्या फळीतले स्वयंसेवक ही भूमिकाही कधी सोडली नाही. विभाजनपूर्व कराची- सिंध भागात त्यांनी संघप्रचारक म्हणून काम केले, तो काळ तर सतत संघर्षाचा आणि जोखमीचा. नंतरही पत्रकार- संपादक या नात्याने ज्या तरुण भारतच्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यालाही (तरुण भारतला) सतत संकटांनी घेरलेल्या वातावरणातच वाटचाल करावी लागत आली. तशाही स्थितीत सत्य जपत आणि स्वत्वाशी तडजोड न करता त्यांनी तरुण भारत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आणि लौकिकप्राप्त बनवला. पुढे ज्यांनी पत्रकार-स्तंभलेखक-लेखक म्हणून मानमान्यता मिळविली, अशा अनेकांना लिहिते करण्याचे श्रेय बापूसाहेबांच्याच नावावर लिहिले जाते. आणीबाणी आली, हुकुमशाहीचा बेजुमान वरवंटा लोकशाही मूल्यांना चिरडत निघाला, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. सुमार बुद्धीचे आणि कर्तृत्वाचे सरकारी अधिकारी सेन्सॉरशिपच्या नावाखाली वृत्तपत्राच्या कार्यालयात बसून मुजोर हडेलहप्पी करू लागले. अशा अत्यंत विपरित परिस्थितीत मोठ्या कुशलतेने पण खंबीरपणे मोजक्याच पत्रकारांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याची नौका हाकत ठेवली. बापूसाहेबांचे नाव अशा पत्रकार/ संपादकांच्या यादीत अग्रभागी तळपले. संघविचारावरील अतूट, अविचल निष्ठा आणि अस्सल पत्रकाराची तटस्थता यांच्यातील समतोल सांभाळण्याचे कौशल्य त्यांच्या ठायी होते. अनिष्ट, अनौचित्यावर कठोर प्रहार करताना त्यांची लेखणी कधीच थरथरली नाही, पण भाषेचे साधन, सौष्ठव, सभ्यता, शालीनता, यांच्या मार्यादांचाही त्यांनी कधी अतिक्रम केला नाही.
शाश्वत नीतिमूल्ये, सुसंस्कार यांचा पाझर तर त्यांच्या लेखणीतून अखंड स्त्रवत असे. संपादकीय आणि विविध विषयांवर विविध नियतकालिकांमधून त्यांनी दीर्घकाळ केलेले स्तंभलेखन असो. साध्या, सोप्या, सुगम आणि नेमक्या शब्दांमध्ये अर्थगर्भ लिखाण कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठच बापूसाहेबांचे लेखन साकार करीत आले. म्हणूनच सध्याच्या काळात पत्रकारितेत फोफावलेल्या सवंगपणाने आणि उथळपणाने ते व्यथित होत असत. दोनच वर्षांपूर्वी राष्ट्रीय पत्रकारिता न्यासातर्फे देण्यात येणारा ज्येष्ठ पत्रकाराचा नामवंत पुरस्कार त्यांना सांगली येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या ज्येष्ठ पत्रकार बापूराव लेलेंचे सहकारी, समकालीन या नात्यानेच बापूसाहेब भिशीकर संपादक म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरले. त्यामुळे बापूराव लेलेंच्या नावाचा पुरस्कार बापूसाहेब भिशीकर यांना हा एक अपूर्व समसमा संयोग होता. त्या समारंभात बापूसाहेबांनी केलेल्या भाषणामधून त्यांनी आजच्या पत्रकारितेवर केलेले भाष्य अतिशय मोलाचे होते. नव्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाने प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात केलेल्या क्रांतीचे त्यांनी आपल्या भाषणातून मुक्तपणे स्वागत केले, पण त्याचबरोबर यांत्रिक झगमगाटाने दीपून न जाण्याचा, पत्रकारितेच्या मूलमंत्रांचा विसर पडू न देण्याचा संदेशही आजच्या पत्रकारांना देण्यास ते विसरले नाहीत. एखाद्या मोठ्या समारंभात बापूसाहेबांनी केलेले बहुधा ते शेवटचेेच मोठे भाषण असावे. व्यक्तिगत संवादातून आजच्या साऱ्या ज्वलंत विषयांवर मनोज्ञ चर्चा करण्याचा क्रम आणि उत्साह मात्र त्यांनी अखेरच्या क्षणांपर्यंत टिकविला हे विशेष. त्यांच्यापाशी बसून ही उत्साही उद्बोधक चर्चा करण्याचे भाग्य मला अगदी अलीकडच्या दिवसांपर्यंत लाभत राहिले.
सध्याच्या राजकीय, सामाजिक वातावरणाबाबतची त्यांच्या मनात दाटून राहिलेली खंत त्यांच्या गप्पांमधून जाणवत असे, पण तरीही त्यांचा सूर आणि त्यांच्या वृत्ती कधीही निराशावादाकडे झुकल्या नाहीत हे विशेष। कार्यकर्त्यांमधील अभ्यासूवृत्ती, व्यासंग कमी होत चालल्याबद्दल जशी त्यांच्या मनात व्यथा होती, तशीच अनौपचारिक स्नेहसंबंध, परस्परसंवाद, संपर्क आणि त्यातून परस्परांबद्दल निर्माण होणारा विश्वास यांना ओहोटी तर लागली नाही ना ही शंका त्यांना भेडसावत असे. अडवाणी- अटलजी यांच्याविषयी सरसंघचालकांनी दिलेल्या मुलाखतीवरून प्रसारमाध्यमांनी माजवलेला गदारोळ, अडवाणी यांनी जिनांविषयी, पाकिस्तान दौऱ्यात, काढलेल्या उद्गारांच्या विषयावरून स्वयंसेवकांच्या वर्तुळात निर्माण झालेले अस्वस्थतेचे वातावरण, अन्यान्य राजकीय पक्षांबरोबरच भारतीय जनता पक्षातही प्रसंगी अनुभवाला येणारे निराशाजनक प्रसंग अशा अतिशय नाजूक विषयांबाबत त्यांनी प्रत्यक्ष चर्चेत तेसच पत्रांच्या द्वारे केलेले मार्गदर्शन माझ्यासाठी सदैव पथदर्शक राहील.
नव्वदी उलटल्यानंतरही शरीर मनाची सर्व गात्रे बऱ्यापैकी सक्षम स्थितीत राहिली हा अर्थातच त्यांच्या सात्विक आणि तपस्वी जीवनशैलीचा परिणाम होता। शेवटपर्यंत त्यांची लेखणी लिहिती होती हे विशेष. पत्रकार या नात्याने राजकारणावर जितक्या अधिकारवाणीने ते बोलू- लिहू शकत, तितक्याच किंबहुना त्यापेक्षा कांकणभर जास्तच अधिकाराने ते अध्यात्म सांगत- लिहित राहिले. हा अधिकार त्यांना अर्थातच व्यासंगाने आणि तपश्चर्येने प्राप्त झाला होता.
सर्वार्थाने बापूसाहेब "एक दीपस्तंभ' या विशेषणाला पात्र ठरतात. पत्रकार म्हणून स्वयंसेवक म्हणून आणि माणूस म्हणूनही त्यांचे जीवन सदैव दीपस्तंभासारखेच मार्गदर्शन करीत राहील, यात शंका नाही.
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)
