Saturday, January 1, 2011

नवीन वर्षाचा संकल्प करताना...

दि. 31 डिसेंबर रोजी पाश्चात्य वर्ष संपते. दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. यानिमित्ताने नवीन वर्षाचे स्वागत कशारीतीने करावे आणि कसे करू नये, याची चर्चा होत असते, परंतु काळाच्या संकल्पनेबाबत मात्र कधी चर्चा होताना दिसत नाही.
काळाची ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांची संकल्पना ही एकरेषीय (लिनियर) आहे. म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी काळाची सुरुवात झाली आणि काही हजार वर्षांनंतर कयामतचा दिवस येईल अन्‌ काळ थांबेल. या संकल्पनेवर आधारित बरेच हॉलिवुड चित्रपट निघाल्याचे दिसते. सन 2000 नंतर विश्वाचा अंत होईल, अशी भाकितेही करण्यात आली होती, हे कित्येकांना आठवत असेल.

कयामतचा दिवस येण्यापूर्वी संपूर्ण जग ख्रिस्ती केले पाहिजे, अशा (अ)विचाराने अनेक कट्टरपंथीय विविध मुखवटे घेऊन काम करताना दिसतात. भारतातही अनेक मिशनरी 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात भोळ्या-भाबड्या हिंदूंना गोडीगुलाबीने किंवा इतर मार्गाने फसवून ख्रिश्चन बनविण्याचे काम करताना दिसतात.
काळाची भारतीय संकल्पना ही आवर्ती (सायक्लिक) आहे. म्हणजे काळ अनंत आहे. दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस. युगानंतर युग. ही विज्ञानाशी सुसंगत अशी संकल्पना आहे.
नवीन वर्षाचा संकल्प करण्यापूर्वी काळाच्या या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. संकल्पनांमागे इतिहास असतो. इतिहास समजून न घेता कृती होऊ लागली तर अनेक समस्या निर्माण होतात. आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक भारतीय जल्लोष करीत पार्ट्यांत रममाण होतात, मद्य रिचवताना दिसतात. दुसरीकडे परधर्मीय मात्र हिंदू धर्माचे लचके तोडण्यासाठी नवनवीन मार्ग शोधतात.
मला दोन आठवड्यांपूर्वी आलेला अनुभव पाहा. भैय्या चौक परिसरात राहणारी कविता ही मध्यमवयीन महिला आमच्याकडे साफसफाई करायला येते. तिची दहावीत शिकणारी मुलगी रविवारी 11 च्या सुमारास पाणी पाहिजे म्हणून घरी आली. आता इकडे कशी, असे विचारता ती म्हणाली, "चर्चला आलेय. आम्ही येशूला स्वीकारलंय.'
दुसऱ्या दिवशी तिच्या आईला विचारलं तर ती म्हणाली, "मुलगी दहावीत शिकतेय. चर्चला आल्यावर परीक्षेत मार्क वाढतात, म्हणून तीन आठवडे झाले ती चर्चला जातेय.'
ही काही एकमेव घटना नाही. डोळे उघडे असतील तर असे अनेक प्रकार तुमच्याही नजरेस पडतील.
नवीन वर्षाचा संकल्प करताना आपण आपल्या स्वत:च्या प्रगतीसाठी नवनवे संकल्प निश्चित करू, परंतु याचवेळी हिंदू धर्माचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांविषयी काही विचार करणार की नाही? अशा घटना पाहून आपले मन व्यथित होते का? आपले रक्त सळसळते का? आपल्या दीन-दलित, शोषित, पीडित बांधवांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आपल्या मनात जागी होते का? समाजासाठी आपण आपला काही वेळ दिला पाहिजे, असे आपणास वाटते का? आपल्या उत्पन्नापैकी काही अंश देश आणि धर्मासाठी कार्य करणाऱ्या संस्था-संघटनांसाठी आपण राखून ठेवतो का?

आंग्ल नवीन वर्षाच्या शुभेच्छा; पण ...

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी