Monday, August 8, 2011

तुम्ही 'दिव्य मराठी'ला भेट दिली का ?

नमस्कार,
 
इंटरनेटविश्वात तुम्ही आम्ही आपण सगळेच रोज वेगवेगळ्या वेबसाईट्सना भेट देतो. त्यातील काही वेबसाईट्सनी आपल्या मनाचा एक कोपरा कायमचा व्यापून टाकलेला असतो. घाईगडबडीतून आणि रोजच्या धावपळीतून वेळ काढून त्या वेबसाईटला आपण न चुकता रोज भेट देतोच. तिथल्या शब्दांवर आपला विश्वास बसलेला असतो. अगदी हक्कांनी तिथे आपले मत मांडत असतो.  अशीच एक वेबसाईट गेल्या काही महिन्यांपासून मराठी ऑनलाईन वाचकांसाठी सज्ज झालीये.

दैनिक भास्कर समुहातील 'दिव्य मराठी' ही मराठी साईट वैविध्यपूर्ण दालनांसह वाचकांच्या सेवेत दाखल झालीये. २४ x ७ अपडेट राहणारी ही साईट महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि छायाचित्रे निःपक्षपातीपणे वाचकांपर्यंत पोचवत आहे. आजूबाजूला क्षणाक्षणाला घडणाऱया घडामोडींबद्दल अपडेट राहण्यासाठी दिव्य मराठीच्या वेबसाईटला रोज भेट दिलीच पाहिजे आणि हक्काने आपले मतही मांडले पाहिजे. सोबत आपल्या साईटचा पत्ता दिला आहेच.
 
आता आम्ही वाट पाहतोय तुमच्या व्हिजिटची आणि प्रतिक्रियांची...

www.divyamarathi.in

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी