अहमदाबाद, दि. २८ (वृत्तसंस्था) - गोमातेची हत्या करणे किंवा गायी खाटकाकडे घेऊन जाणे याविरुद्ध गुजरात सरकारने कडक कायदा केला असून, आरोपींना सात वर्षांची शिक्षा ठोठावणारे विधेयक नुकतेच विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. 'गुजरात प्राणीसंवर्धन कायदा १९५४' या कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक कृषिमंत्री दिलीप संघानी यांनी मांडले. याला भाजपबरोबर कॉंग्रेसच्या आमदारांनीही समर्थन दिल्याने हे विधेयक मंजूर झाले. यानुसार गोहत्येसाठी सात वर्षांचा तुरुंगवास, ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्यात येणार आहे. हत्येसाठी गायींची वाहतूक हाही गंभीर गुन्हा ठरणार आहे.
( दै. सामना, २९ सप्टे. २०११)
( दै. सामना, २९ सप्टे. २०११)
No comments:
Post a Comment