Sunday, November 6, 2011

एकदा तुम्हाला ते गवसले की...

आपल्याला लवकरच मृत्यू येणार आहे याची जाणीव म्हणजे  काहीतरी भव्य-दिव्य  करण्यासाठीचे साधन हाती लागल्याचा आनंद देणारी गोष्ट आहे. कारण  सर्व अपेक्षा,अभिमान, अपयशाने येणारे नैराश्य आणि वैषम्य या सर्व गोष्टी मृत्यूच्या पाश्र्वभूमीवर  नगण्य  ठरतात आणि  सर्वात खरोखरच जे महत्वाचे आहे तेच शिल्लक राहाते. आता आपण मरणार आहोत  याची जाणीवच , आपण काही गमावणार आहोत  या विचारचक्राच्या सापळ्यातून  आपली सुटका  करते. आपला जीवनकाल मर्यादित असतो.  म्हणूनच  सतत इतरांचा विचार करून  दुसऱ्याचे जीवन जगण्यात  वेळ व्यर्थ घालवू नका. जुलूम, अत्याचाराचे बळी ठरू नका. सतत इतरांबद्दल विचार करीत राहिल्याने , इतरांच्या विचाराने वागत राहिल्याने  तुम्ही आपसूक त्याचे बळी ठरत असता.  तुमचा स्वत:चा  जो आंतरिक आवाज आहे,  तुमचा आंतरात्मा  जे सांगतो, ते इतरांच्या मतांच्या ओझ्याखाली दडपले  जाऊ देऊ नका.  तुमचे बहुतांश जीवन हे तुमच्या कार्याने भरलेले असावे. तुम्हाला जे चांगले आणि उदात्त वाटते, ते करणे यातच खरे समाधान आहे.  थोर कार्य करण्याचा एकमेव मार्ग  म्हणजे  तुम्ही जे काम करता  ते मनापासून आणि निष्ठापूर्वक करा. तुम्हाला अद्याप ते गवसले नसेल तर शोध सुरू ठेवा. एकदा तुम्हाला ते गवसले की कार्य कसे करायचे ते तुम्हाला आपोआप कळेल. जसजसा काळ जाईल, तसतसे ते अधिक चांगले आणि प्रभावी होत  जाईल.  म्हणूनच  ते सापडे पर्यंत शोध सुरूच ठेवा..!
एकदा तुम्हाला ते गवसले की कार्य कसे करायचे ते तुम्हाला आपोआप कळेल, जसजसा काळ जाईल, तसतसे ते अधिक प्रभावी आणि चांगले होत जाईल.
- स्टीव्ह जॉब्स ( १९५५ - २०११ )

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी