Saturday, November 19, 2011

सुखी गृहस्थी जीवनासाठी...

यशस्वी गृहस्थी जीवनाचा आधार सुखी दांपत्य असतो. पती-पत्नींमध्ये एकमेकांप्रती सन्मानाची भावना असेल आणि स्वाभिमानाची मर्यादा न ओलांडण्याचा विवेक असेल तरच दांपत्य जीवन सुखी बनणे शक्य आहे. पती पत्नीशी किंवा पत्नी पतीशी सन्मानाने वागत नसल्यास तिथे परामात्मा राहू शकत नाही. परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. ज्या घरात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल तिथेच त्याचा वास असतो.
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-grahasthi-for-happy-household-such-kind-of-relationship-is-essential-between-husband-and-wife-25.html
पतींमधला पुरषत्वाचा अहंकार त्यांना स्त्रीसमोर वाकू देत नाही. काही महिलाही पुरुषांसमोर नम्र होण्यात अपमान समजतात. येथूनच दांपत्य जीवनात अशांतीची सुरूवात होते.
संत तुलशीदासांनी रामचरितमानसमध्ये शिव आणि पार्वती यांच्या दांपत्यावर आधारित एक छोटा प्रसंग सांगितला आहे. गोष्ट छोटी असली तरी त्यामागे सखोल चिंतन आहे. शिव पार्वती यांच्या विवाहानंतर एके दिवशी भगवान शंकराला शांतभावाने बसलेले पाहून पार्वती त्यांच्याकडून रामकथा ऐकण्याची इच्छा व्यक्त करते, असा तो प्रसंग आहे. संत तुलसीदास लिहितात,
बैठे सोह कामरिपु कैसे। धरें सरीरु सांतरसु जैसे।।
पारबती भल अवसरु जानी। गई संभु पहि मातु भवानी।।
 एक दिवस भगवान शांतपणे बसले होते. योग्य संधी समजून पार्वती त्यांच्याजवळ गेली. पाहा पत्नीच्या मनात पतीविषयी किती आदराची भावना आहे. त्यांच्याशी संवाद करण्यासाठीही योग्य संधीची वाट पाहिली. आजकाल पती-पत्नींमध्ये एकमेकांच्या वेळ आणि कार्याविषयी अशी सन्मानाची भावना राहिलेली नाही. मग तुलसीदास लिहितात,
जानि प्रिया आदरु अति कीन्हा। बाम भाग आसनु हर दीन्हा।।
शिवाने पार्वतीला प्रिय संबोधून तिचा खूप आदर केला. आपल्यासोबत डाव्या भागात तिला आसन करून दिले. पती पत्नीचा आदर करतोय. असे होणे केवळ भारतीय संस्कृतीतच शक्य आहे. काही लोक आज गृहस्थीला जंजाळही म्हणतात. परंतु एक दुस-यांप्रती अशी प्रकारे प्रेम आणि सन्मानाची भावना असेल तर गृहस्थ जीवन कधीच जंजाळ वाटणार नाही.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी