Sunday, March 2, 2014

माझी पहिला कविता

काल मराठी दिवस होता. आज आमच्या कार्यालयात स्वलिखित कवितांच्या वाचनाचे कार्यक्रम आयोजले गेले. कविता लिहिण्यासाठी खूप आग्रह झाल्याने मीही एक लंगडा प्रयत्न केला अन लिहिली माझी पहिली कविता…

माझी पहिला कविता

कन्नड माझी मातृभा
षा, शिक्षणाची भाषा मराठी
घरात, मित्रांत कानडी, शाळेत मात्र मराठी
संवाद होतसे
 कानडीवाचन, लेखन मराठी
बालभारती, कुमारभारतीतून शिकत गेलो मराठी
त्यातून अभिलाषा जागली, व्हावे लेखक मराठी

पुढल्या शिक्षणासाठी शहर गाठले
मराठी
बोलताना तारांबळ उडू लागली
बोलण्याच्या ओघात कानडी घुसू लागली
वाचन वाढत गेलं, वृत्तपत्रांचा लळा लागला
विचारांशी मैत्री झाली
अन् पत्रकार बनलो

कामाची गरज म्हणून लेखन करू लागलो
अनेक विषयांवर लेख पाडू लागलो
लेखांना वाचक मिळाला, कौतुकही झाले
स्वांतसुखाय लिहू लागलो, पण लेखक झालो काय?
आग्रहास्तव कविता लिहिली, पण कवी बनलो काय?

- सिद्धाराम

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी