Friday, August 29, 2014

देशोदेशींचा गणपती

Displaying indonesia2000yrs.jpg
२००० वर्षापूर्वीची इंडोनेशिया येथील मूर्ती
शेकडो वैशिष्ट्यपूर्ण रूपं असलेला गणपती हिंदू धर्मातील पंथोपपंथांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. गणपती हा लहान मुलांचा लाडका आणि आवडता देव आहे. तामिळनाडूत गणपतीला पिल्लयार अर्थात मुलांचा देव म्हणतात. दशदिशांत आनंदाची उधळण करणारा गणपती देवांचा सेनापती, दीनदुबळ्यांचा सांगती, साहित्याचा ज्ञाता, केलेचा उद्गाता, भक्तांचा रक्षणकर्ता आहे. रणांगणापासून रणभूमीपर्यंत अग्रस्थानी राहणारा तो नेता आहे. म्हणूनच हिंदू धर्माच्या मुख्य शाखा असणाऱ्या शैव, वैष्णव, जैन, बौद्ध आदी विविध पंथांमध्ये गणपती पूजला जातो.


गुप्तकाळापासून म्हणजे अडीच हजार वर्षांपासून गणेश पूजला जातो, याचे पुरावे सापडतात. अवकाश संशोधक व थोर ज्योितषी वराहमिहीर यांनी बृहत्संिहतेत गणपतीपूजनाचा उल्लेख केला आहे. राजा िवक्रमादित्याच्या दरबारातील वराहमिहीर िवष्णूस्तंभावरून (तथाकथित कुतुबमिनार ) अवकाशसंशोधन करीत असत. आजही कुतुबमिनार म्हणवल्या जाणाऱ्या परिसरात २७ नक्षत्रांवर बांधलेल्या मंिदरांचे अवशेष पाहायला मिळतात. 

बौद्ध धर्माच्या प्रसारासोबतच बौद्ध धर्माचार्यांनी संपूर्ण आशिया खंडात गणेशाचा प्रसार केला, असा संशोधकांचा कयास आहे. अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माच्या उदयापूर्वीपासून िशव आिण गणेशभक्ती सुरू होती, याचे पुरातत्वीय पुरावे मिळाले आहेत.

Displaying afaganistan.jpg
अफगाणिस्तान
अफगाणिस्तान : प्राचीन काळात गांधार नावाने परिचित असलेला हा प्रदेश. महाभारतातील कौरवांची माता गांधारी येथीलच असे मानले जाते. या देशात गुप्तकालीन म्हणजे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या अनेक गणेशमूर्ती आढळून आल्या आहेत. अलीकडेच गार्डेज येथे एक गणेशमूर्ती सापडली. सध्या ती काबूलमधील हिंदूंच्या हवाली करण्यात आली आहे. ६० सेमी x ३५ सेमी असलेली ही मूर्ती अत्यंत सुंदर आिण वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाविनायक असे यावर कोरले आहे. िखंगला राजाने ही मूर्ती बनवल्याचा उल्लेखही त्यावर आहे. मात्र, तो राजा इतिहासाला ज्ञात नाही. सापाचे यज्ञोपवित धारण केलेली ही मूर्ती पिळदार शरीराची असून भारतात मगध येथे सापडलेल्या मूर्तीशी साधर्म्य असणारी आहे. काबूलच्या उत्तरेला १० मैल अंतरावर सकर धर अर्थात शंकर धर येथे गणेशाची दुसरी एक संगमरवरी मूर्ती अलीकडच्या काळात आढळली. त्या भागातच अत्यंत नाजूक नक्षीकाम असलेल्या शिव आिण सूर्य देवाच्या मूर्तीही सापडल्या. उभी असलेली ही गणेशमूर्ती मोठ्या कानांची व एकदंता आहे. गुप्तकालीन मूर्तींशी साम्य असलेली ही मूर्ती नेहमीप्रमाणे मोठ्या पोटाची नाही, हे हिचे वैशिष्ट्य होय. काबूल येथील नरसिंगपूर येथील हिंदू त्याची पूजा करतात.
नेपाळ
नेपाळ : कालपर्यंत जगातील एकमेव हिंदूराष्ट्र म्हणून ओळखले जाणाऱ्या या देशात गणेशभक्तीला कधीपासून सुरुवात झाली, हे सांगता येणे अवघड आहे. परंतु राजा अशोकाची पुत्री चारुमतीने सर्वप्रथम नेपाळात गणेशमंिदर बांधल्याचा उल्लेख सापडतो. येथील हिंदूंसोबत बौद्धपंथीयदेखील गणेशाला भजतात. सिद्धीदाता अर्थात यशस्वी करणारा म्हणून बौद्ध विशेषत्वाने पूजतात. नेपाळात शेकडोंच्या संख्येने प्राचीन गणेशमूर्ती आहेत. काठमांडूतील दोन मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आिण दुर्मिळ अशा प्रकारच्या आहेत. ब्रांझच्या या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या दोन्ही पायाखाली मूषक आहेत.  आणि त्यावर गणपती उभा आहे. डोक्यावर पंचफणी नागाचे किरीट आहे. एकास चार तर दुसऱ्या मूर्तीस सोळा हात विविध आयुधांनी भरलेले अाहेत.
तिबेट
तिबेट : नेपाळएवढे तिबेटात गणपती लोकप्रिय नाही, याला महायाना पंथाची उपासनापद्धती कारणीभूत असावी. पश्चिम तिबेटमध्ये िवशेषकरून असूरमर्दन करणारा गणपती जागोजागी आढळतो. बौद्ध मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर असुरमर्दन करणारा गणपती हमखास आढळतो. आठव्या शतकात बांधलेल्या भारतातल्या हिंदू मंदिरांच्या प्रवेशद्वारावर अशा मूर्ती आढळतात. मध्य प्रदेशातील बेहराधाट येथील ६४ योगिनी मंदिरातील मूर्तीप्रमाणे स्त्री रुपातील गणपती येथे सर्रास आढळतात.
खोटन : या देशात ब्रांझ व लाकडी खांबांवरील गणपतीच्या मूर्ती पाहता गणपती येथे खूपच लोकप्रिय असल्याचे दिसून येते. मध्य आशियातील प्रथेनुसार घट्ट पायघोळ असलेला गणपती भगवान शिव आिण कार्तिकेय यांच्यासोबत आढळतो.

मंगोलिया :
महांकाळला पूजण्याची प्रथा येथे असल्यामुळे शिवाचा पुत्र गणेश याला पूजण्याचा मान मिळाला आहे. हत्तीचे डोके असतानाचा गणेश नृत्य करतानाच्या रूपात दिसतो. गणेशाच्या हातात त्रिशूळ, परशू, मूळकंद व मिठाई आहे. मूषकाच्या मुखात चिंतामणी असून नारथानच्या ५०० देवतांमध्ये गणेशाचा समावेश आहे.

श्रीलंका
श्रीलंका : येथील मिहिंतळे स्तूप पाहिल्यास हत्तीचे डोके असणारे गण रांगेत दिसतात. मूळ गणेशाची ही रुपे आहेत. महाभारतात शंकराचा एक गण हत्तीच्या डोक्याचा असल्याचा उल्लेख आहे. भारतात काही ठिकाणी कार्तिकेयला हत्तीचे डोके आहे. पोलोनारुव्वा येथील शंकराच्या मंदिरात चार हात असलेली गणेशाची सुंदर मूर्ती आहे. कोलंबोपासून १५० मैल अंतरावर कातारगामा येथे सुब्रमण्याम मंदिरात स्वतंत्र रूपातील गणेश आहे. या भागातील बहुतांश हिंदूंचे धर्मांतरण करण्यात आलेले असले तरीही ते लोक गणेश आिण शिवभक्ती करताना दिसतात.

ब्रह्मदेश :
ब्रह्मदेशात बौद्ध मत पोहोचण्यापूर्वीपासून तिथे हिंदू संस्कृती नांदत होती. तेथे शैव व वैष्णव आिण गणेशाच्या शेकडो मूर्त्या दिसतात. ब्रह्मदेशाच्या खालच्या भागात विघ्नहर्ता गणेश अिधक लोकप्रिय आहे. पूर्वी व्यापार कष्टसाध्य आिण प्राणही धोक्यात आणणारा होता. त्यामुळे विघ्नांपासून मुक्ती देणाऱ्या गणेशपूजनाची प्रथा तेथे लोकप्रिय झाल्याचे संशोधक सांगतात. पद्मासनात बसलेला सहा हात आिण हातात बिल्व, चक्र, पाश, धारण करणारा गणपती ब्रह्मदेशात सर्रास आढळतो.

थांयलंड :
भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव प्राचीन काळापासून येथे आहे. गुप्त, पल्लव, पाला राजवटीत गणेश लोकप्रिय असल्याचे पुरावे मिळतात. येथे शेकडोंनी प्राचीन गणेशमूर्ती आहेत. बॅंकाॅक येथील प्रसिद्ध हिंदू मंदिरात व्यास मुनींचा लेखक या रुपात गणपती आहे. ज्ञानाची देवता म्हणून गणेश येथे ओळखला जातो. महाभारताचाही प्रभाव या देशावर जाणवतो.

Displaying cambodia.JPG
कंबोडिया
कंबोडिया : भारतातील एक ऋषी कौंडिण्य अडीच हजार वर्षांपूर्वी या भागात गेले आिण या भागाचे पूर्णपणे भारतीयीकरण झाले. तिथे भारतीय संस्कृती रुजवली. त्यांच्याच नावाने कंबोडिया हे नाव रूढ झाले. हिंदू देवदेवतांच्या हजारो मूर्ती येथे आहेत. येथील अनेक राजे गणेशभक्त होते. मांडी घालून बसलेला गणपती राजस्थानातील मूर्तींशी साधर्म्य दर्शवणारा आहे. शंकरासोबत गणपती बसल्याची मूर्ती हे येथील वैशिष्ट्य.
चंपा : कंबोडियाच्या पूर्वेला असलेला हा देश नावावरूनच भारतीय संस्कृतीचा प्रभाव अधोरेखीत करतो. कंबोिडयाप्रमाणे या देशावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. शंकरासोबत असलेला गणपती बुद्धमूर्तीशी जवळीक साधतो.

Displaying indonesia.jpg
इंडोनेशिया
इंडोनेिशया (बाली व जावा) : रामायणकाळात युवाद्वीप नावाने ओळखला जाणारा हा देश. गुप्तकाळातील अनेक गणेशमूर्ती आज आहेत. गणेशाची स्वतंत्र मंदिरे नाहीत परंतु सर्रासपणे शिवमंदिरांमध्ये गणपती दिसतोच. शंकराच्या गळ्यात कवट्यांच्या माळा असतात तशा माळा या मूर्तीत स्पष्टपणे दिसतात.
बर्निओ : दोन हजार वर्षापूर्वीपासून या देशावर हिंदू संस्कृतीचा फार मोठा प्रभाव आहे. बौद्ध आिण शैव शिल्पे एकत्रितपणे कोमबाेंग येथे कोरलेली आढळतात. कोटेई येथील दगडी मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तसेच पंख्यासारख्या आकारचे कान व जटामुकुट हे मूर्तीचे वैिशष्ट्य होय.

Displaying china.jpg
चीन
चीन : भारतातून चीनमध्ये सुरुवातीच्या काळातच गणपती जाऊन पोहोचला. तन हुआंग व कुंग झेन येथील लेण्यांत सूर्य, कामदेव, नवग्रह यासोबतच गणेशाचे चित्र कोरलेले आहे. जपान आिण चीनमध्ये एका मूर्तीच्या रूपात व द्वीमूर्तीच्या स्वरूपात गणेश आढळतो. सन १०१७ मध्ये चेन त्सुंग या राजाने चीनमध्ये द्वीशरीर रुपातील अर्थात कंगी टेन गणपतीच्या उपासनेवर बंदी आणली होती.
Displaying japan.jpg
जपान
जपान : नवव्या शतकापर्यंत जपानमध्ये गणपती पोहोचल्याचे पुरावे मिळत नाहीत. काॅल्सी देसी या बौद्ध धर्मप्रसारकाने गणपतीचा प्रसार केला. अल्पावधीतच गणपती ही देवता जपानमध्ये लोकप्रिय ठरली. उभ्या स्वरूपात दोन, चार, सहा हात असलेली विनायक मंदिरे जागोजागी आहेत. तीन डोकी, तीन डोळे, चार हातात चार तलवार, मोदक धारण केलेला पर्वतावर आरूढ असलेला पर्वतावर आरूढ असलेला हत्तींचा राजा या रुपातला गणपती काकू झेन खो नावाने ओळखला जातो. द्वीशरीर असलेला गणपती जपानमध्ये सार्वजनिक रुपात पूजत नाहीत. वैयक्तिक गुप्त साधनेसाठी त्याची पूजा होते.

(इंडियाज काॅंट्रीब्यूशन टू वर्ल्ड थाॅट अॅंड कल्चर या िववेकानंद केंद्र कन्याकुमारीने प्रकािशत केलेल्या ग्रंथाचा आधार या लेखासाठी घेतला आहे.)

- सिद्धाराम भै. पाटील

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी