Thursday, August 21, 2014

विवेक विचार'तर्फे मुजफ्फर हुसेन यांचे आज व्याख्यान

सोलापूर. विवेकानंदकेंद्राचे सांस्कृतिक मासिक विवेक विचारतर्फे शुक्रवार (दि. २२ ऑगस्ट) रोजी सायंकाळी वाजता पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
'अरब-इस्राईल संघर्ष और भारत' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. डफरीन चौक येथील ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात हे व्याख्यान होणार आहे.  अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे असतील. कन्याकुमारी येथे तीन सागरांच्या संगमस्थळी विवेकानंद स्मारक उभारणी करणारे विवेकानंद केंद्राचे निर्माते माननीय एकनाथजी रानडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केल्याची माहिती केंद्राचे संचालक दीपक पाटील यांनी दिली.
मुजफ्फर हुसेन हे ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत इस्लामची परखड मीमांसा करणारे गाढे अभ्यासक आहेत. मध्यपूर्व आशियातील घडामोडींवर अधिधकाराने भाष्य करणारे ओजस्वी वक्ते म्हणून श्री. हुसेन यांना ओळखले जाते. देशातील अनेक नामवंत वृत्तपत्रांतून ते नियिमत स्तंभलेखन करतात.याचा शहरवासियांनी लाभ घ्यावा.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी