आमचे प्रतिनिधी लिहितात :
‘हिंदूत्वातूनबाहेर गेलेल्यांविषयी - धर्मांतरितांविषयी - स्वामी विवेकानंदांची मी मुलाखत घ्यावी, असे आमच्या संपादकांनी सुचविले होते. त्यांची व माझी भेट गंगेच्या विशाल पात्रावर तरंगणार्या एका निवासी नौकेत, उतरत्या सायंकाळी झाली. रामकृष्ण मठाच्या नजीकच्या तीरावर नौका स्थिरावली होती. तिथे स्वामीजींचे दर्शन झाले.ती वेळ आणि स्थळही मोठे सुरेख होते. माथ्यावर नक्षत्रे चमकू लागली होती. भोवती गंगेचा प्रवाह उसळत होता. एका बाजूला नारळीच्या झाडांनी आणि गर्द सावली धरणार्या इतर वृक्षांनी वेढलेल्या मठाची वास्तू दिसत होती. ती शांत प्रकाशाने उजळलेली होती.

‘‘स्वामीजी, हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्यांना पुनश्च हिंदू धर्मात घेण्यासंबंधी जी चळवळ चाललेली आहे त्यासंबंधी आपल्याशी बोलावे अशी इच्छा आहे. धर्मांतरितांना अशा प्रकारे हिंदुधर्मात परत घ्यावे असे आपले मत आहे काय ?’’