काही दिवसांपूर्वी सोलापुरात स्त्री प्रसूती तज्ज्ञांची महाराष्ट्र राज्य परिषद झाली. राज्यातून १२०० तज्ज्ञ डाॅक्टर्स सहभागी होते. सोलापूरच्या डाॅ. शोभा शाह यांनी परिषदेत गरोदरपणातील योगाभ्यास आणि ओंकार साधनावर शोधप्रबंध सादर केला आणि त्याला उत्कृष्ट शोधनिबंधाचा पुरस्कार मिळाला.
योगशास्त्राचाउगम भारतात झाला. भारतात उगम पावलेल्या सर्वच धर्मांमध्ये योगशास्त्राची महती गाण्यात आली आहे. आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही दर्शनांमध्ये योगाला मान्यता आहे. भारतीय संस्कृतीतील षडदर्शनातील एक दर्शन आहे योग. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत या सहा दर्शनांना भारतीय संस्कृतीत षडदर्शने म्हणतात.