Wednesday, July 1, 2015

वैदिक, जैन, बौद्ध अन् नास्तिक दर्शनांतही योग!

योगशास्त्राचाउगम भारतात झाला. भारतात उगम पावलेल्या सर्वच धर्मांमध्ये योगशास्त्राची महती गाण्यात आली आहे. आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही दर्शनांमध्ये योगाला मान्यता आहे. भारतीय संस्कृतीतील षडदर्शनातील एक दर्शन आहे योग. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत या सहा दर्शनांना भारतीय संस्कृतीत षडदर्शने म्हणतात.
योगशास्त्र हे मानवसृष्टीइतकेच प्राचीन मानले गेले आहे. योगसिद्ध ऋषींना ध्यानावस्थेत सृष्टीची अनेक रहस्ये स्फुरली. वेद आणि वेदांगामध्ये योगाचे अनेक संदर्भ मिळतात. वेदांच्या अंतिम भागात अर्थात वेदांतामध्ये - कठोपनिषद, श्वेताश्वर आणि मैत्रायणी उपनिषदांमध्ये योग आणि साधनेसंबंधी मोठ्या प्रमाणावर संदर्भ मिळतात.
बौद्ध धर्मात अष्टांगयोग
भगवानबुद्ध यांच्या काळात मंत्रयोग आणि यंत्र योगाचा विकास वेगाने झाला. सिद्धार्थ, मेघंकल, शरणंकर, दीपंकर, कौडिन्य, मंगल, सुमन, रैवत, शोभित, अनामदर्शी, पद्म, नारद, सुमेध, सुजात, प्रियदर्शी, पुष्य आदी २४ बुद्धांनी योग साधनेद्वारा निर्वाण प्राप्त केले. हीनयानी बौद्ध ध्यानमार्ग तर महायानी बौद्ध अष्टांग योगाची साधना करत होते.
योगसूत्रांचे रचनाकार पतंजली
महर्षीपतंजली यांनी योगशास्त्राला क्रमबद्ध करून योगसूत्रांची रचना केली. केवळ १९५ सूत्रांमध्ये त्यांनी संपूर्ण योगशास्त्राची - अष्टांगयोगाची मांडणी केली आहे. योग सूत्रांवरील स्वामी विवेकानंद यांचे भाष्य राजयोग या ग्रंथाच्या रूपात प्रसिद्ध आहे. आधुनिक काळामध्ये भारताबाहेर योगशास्त्राच्या प्रचाराला येथून सुरुवात झाली.
जैन दर्शनातील योगसाधना
जैनांचे२२ वे तीर्थंकर नेमीनाथ हे श्रीकृष्णाचे चुलत बंधू होते. सौराष्ट्रातील गिरनार पर्वतावर योगसाधना करत त्यांनी मोक्षप्राप्ती केली. २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ हेही या काळातील विख्यात योगी होते. २४ वे तीर्थंकर महावीर यांचे शिष्य आर्य सुधर्मा, स्थविर संभूति विजय, भद्रबाहू आदी मुनी योगशास्त्राचे जाणकार होते.
योगशास्त्राचा उद््गाता
भगवानशिव हे योग शास्त्राचा उद््गाता. देवी पार्वतीला त्यांनी परमतत्त्व, सत्य जाणून घेण्याचा मार्ग सांगितला. हे गूढ ज्ञान म्हणजेच योग. विज्ञान भैरव तंत्रात भगवान शिवाने पार्वतीला सांगितलेल्या ११२ ध्यानसूत्रांचा समावेश आहे. ॠषभदेव, सनत्कुमार, नारद, कपिल यांनी योगशास्त्राचा विस्तार केला.
***
अवश्य वाचा
हिंदू - बौद्ध ऐक्यातून सजग सुसंवादाचे नवे पाऊल

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी