Monday, January 25, 2016

#‎आंबेडकरद्रोही‬ डावे अन् देशबुडव्या सेक्युलर गिधाडांची अभद्र युती

‪#‎रोहित_वेमुला‬ आत्महत्या प्रकरणावर 
युवा पत्रकार
सागर सुरवसे यांचा
सोलापूर तरुण भारतच्या
आसमंत या लोकप्रिय रविवार पुरवणीतील
सडेतोड लेख.
👇🏻
कालबाह्य क्रांतीचा
हट्ट धरणारे,
नक्षलवादाला
माणसं पुरवणारे,
नक्सलवादी कारवायांचे
समर्थन करणारे,
जिहादी विचारसरणीला
छुपा पाठिंबा देणारे लोक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे असूच शकत नाहीत.
रोहित वेमुलासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या निरागस तरुणांना आपल्या सापळ्यात ओढून आपले स्वार्थ साधण्याचे काम तेवढे ते करू शकतात.
उद्योजक मिलिंद कांबळे यांच्याप्रमाणे दलित तरुणांना सकारात्मक मार्गाकडे नेण्याऐवजी विद्वेषाच्या आगीत ढकलण्याचे काम कथित सेक्युलर आणि डावे करतात.
डावे बुद्धीजीवी आणि स्वयंघोषित सेक्युलर ही गिधाडे आहेत.
समाजाच्या एकोप्याशी त्यांचे देणेघेणे नाही.
समाज शतखंडीत कसा होईल, यासाठी समाजाच्या जखमांना टवकी मारण्याचे घृणास्पद काम हे करत आहेत.
प्रत्येक गोष्टीकडे राजकीय फायद्या - तोट्यातून पाहण्याच्या या काळात अशांना खड्यासारखे दूर करणे खूप कठीण आहे.
पण
ते काम करावंच लागेल.
अन्यथा समाजाचे अतोनात नुकसान होईल.
डॉ. बाबासाहेब यांच्या १२५ व्या जयंती वर्षात देशाला जोडणारे बाबासाहेबांचे विचार पुढे आणणे हाच यावर उपाय आहे.

Thursday, January 21, 2016

९०० वर्षांपूर्वी दिलेली “गिफ्ट’’ आम्ही उघडून पाहिलीच नाही !


सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धराम. ९०० वर्षांपूर्वी सोलापुरात जन्मास आलेले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी होते. त्यांनी ६८ हजार वचनांची निर्मिती केली. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रात शिवयोगी सिद्धराम यांना ईश्वर मानून भक्ती करणारा वर्ग खूप मोठा आहे. परंतु त्यातील खूप कमी लोकांना सिद्धरामांच्या वचनसाहित्याची माहिती आहे. रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या या विचारांची ही शिदोरी, गिफ्ट आम्ही उघडून पाहिलीच नाही.

Saturday, January 2, 2016

श्रीपाल सबनीस उठले अन् तुम्हीच माझे शरद पवार म्हणत सगळ्यांच्या देखत भोंगळेंच्या पायावर चक्क आपले डोके ठेवले


 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची वस्त्रे उतरवणारा, लबाडी वेशीवर टांगणारा युवा पत्रकार घनश्याम पाटील यांचा खळबळजनक लेख - कुत्र्याला खीर पचली नाही! .

श्रीपाल सबनीस यांचा राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्हाला हर्षोल्हासात फोन आला की ‘‘चपराकच्या संपूर्ण टीमसह ताबडतोब घरी या. मी आतुरतेने तुमची वाट पाहतोय.’’ कसलाही विचार न करता आम्ही आमच्या फौजफाट्यासह त्यांचे घर गाठले. तिथे शरद पवारांच्या गोटातले विश्‍वासू पत्रकार, ‘राष्ट्रवादी’ मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, ‘‘साहेबांनी पी. डी. पाटलाला फोन केलाय. राष्ट्रवादीची सगळी ताकत आपल्या मागे उभी आहे.’’ त्यानंतर सौभाग्यवती सबनीस यांनी औक्षणाचे ताट आणले. भोंगळे यांना राखी बांधली. भोंगळेंनी राखीच्या ताटात ओवाळणी टाकण्यासाठी शंभराची नोट काढली. त्याबरोबर सबनीस उठले आणि आमच्या सगळ्यांच्या देखत त्यांनी भोंगळेंच्या पायावर चक्क आपले डोके ठेवले. ‘‘ओवाळणीत पैसे नकोत. आमच्या ‘हिने’ तुम्हाला भाऊ मानले आहे. सध्या माझ्यासाठी तुम्हीच शरद पवार. तुम्हाला केलेला नमस्कार त्यांना मिळेल. एकदा संमेलानध्यक्ष पदाची भीक माझ्या पदरात घाला. त्यानंतर मी तुम्हाला कधीच काही मागणार नाही. माझी ही शेवटची इच्छा आहे.’’ आणि त्यांनी डोळ्यात पाणी आणले.

संपूर्ण लेख पुढील प्रमाणे...

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी