Saturday, December 3, 2011

तब्बल 811 वर्षांनंतर उभारला देशातील सर्वांत उंच विजयी स्तंभ

दिव्य मराठी नेटवर्क । मोहाली (पंजाब) - पंजाबमधील ऐतिहासिक चप्पडचिडी या गावात मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी बुधवारी देशातील सर्वांत उंच विजयी स्तंभ 'मिनार-ए-फतेह'चे उद्घाटन केले. नांदेड येथील बाबा बंदासिंग बहादूर यांनी 300 वर्षांपूर्वी पंजाबमधील सरहिंदचा नवाब वजीर खानावर मिळवलेल्या यशाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा स्तंभ उभारण्यात आला आहे. कुतुबमिनारनंतर 811 वर्षांनी उभारण्यात आलेला हा देशातील सर्वांत उंच विजयी स्तंभ आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-minar-e-fateh-in-panjab-2611963.html
स्तंभाचे वास्तुविशारद रेणू खन्ना यांनी सांगितले की, या स्तंभाची उंची 330 फूट आहे. देशातील सर्वांत पहिला विजयी स्तंभ कुतुबमिनार 238 फूट उंच आहे. मिनार-ए-फतेहच्या प्रांगणात बाबा बंदासिंग बहादूर आणि त्यांचे पाच सैन्याधिकारी भाई फतेहसिंग, भाई आलीसिंग, भाई मालीसिंग, भाई रामसिंग आणि भाई बाजसिंग यांच्या पुतळ्यांचेही अनावरण करण्यात आले.
1199 मध्ये उभारला होता कुतुबमिनार
मिनार-ए-फतेहचे वास्तुविशारद रेणू खन्ना यांनी सांगितले की या स्तंभाची उंची 330 फूट आहे आणि हा देशातील सर्वांत उंच आणि जगातील सातवा सर्वांत उंच विजयी स्तंभ आहे. यापूर्वी 1199 मध्ये उभारण्यात आलेल्या कुतुबमिनारची उंची 238 फूट आहे. आतापर्यंत तो देशातील सर्वांत उंच विजय स्तंभ होता.
कुतुबमिनार ही वास्तू तेथील मंदिरे नष्ट करून त्या अवशेषापासून बनविल्याचे म्हटले जाते. काही अभ्यासकांच्या मते कुतुबमिनार हे विष्णू स्तंभ होय. येथूनच वराहमिहीर हा राजा विक्रमाच्या दरबारातील विख्यात ज्योतिषी अवकाश संशोधन करायचा.
लिफ्टची सो
'मिनार-ए-फतेह' वर जाण्यासाठी लिफ्ट लावली जाणार आहे. त्यासाठी सहा महिने लागतील. स्तंभावर 35 फूट उंच जाण्यासाठी पाय-या आहेत. लिफ्टमुळे वयोवृद्धांनाही स्तंभावर जाता येईल.
गन मेटलपासून बनवले सर्व पुतळे
रेणू खन्ना यांनी माहिती दिली की, बाबा बंदासिंग बहादूर आणि त्यांच्या सैन्याधिका-यांचे पुतळे गन मेटलपासून तयार केले आहेत. त्यामुळे ते लवकर खराब होणार नाहीत. बाबा बंदासिंग बहादूर यांच्या पुतळ्याची उंची 15 फूट आहे. इतर पुतळे 10 फूट उंचीचे आहेत. या पुतळ्यांच्या मधोमध एक सरोवर तयार करण्यात आले आहे.
बाबा बंदासिंग बहादूर
बाबा बंदासिंग बहादूर गुरू गोविंदसिंग यांना नांदेड येथे भेटले होते. त्यावेळी त्यांचे नाव बंदा बैरागी, असे होते. गुरूसाहेबांनी बाबा बंदासिंग बहादूर यांना सरहिंद जिंकण्यासाठी पंजाबला पाठवले. बंदासिंग बहादूर यांनी पंजाबात शिखांची एकजूट केली आणि मे 1710 मध्ये चप्पडचिडी या गावात सरहिंदचा नवाब वजीर खान याला युद्धात हरवून पहिले शीख राज्य स्थापन केले.
भाई फतेहसिंग
भाई फतेहसिंग पंजाबमध्ये येऊन बाबा बंदासिंग बहादूर  यांच्या सैन्यात दाखल झाले. त्यांना शीख शिपायांच्या पथकाचे कमांडर नियुक्त करण्यात आले. भटिंडा जिल्ह्यात त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'चक्क फतेहसिंग वाला' या नावाचे गाव वसवण्यात आले आहे.
भाई आलीसिंग
भाई आलीसिंग सरहिंदचा नवाब वजीर खानाचे फौजदार होते आणि लढाईपूर्वी ते सर्वांत आधी बाबा बंदासिंग यांच्या सैन्यात दाखल झाले आणि पराक्रम गाजवला. नंतर त्यांना बाबा बंदासिंग बहादूर यांच्याबरोबर दिल्लीत जून 1716 मध्ये हौतात्म्य प्राप्त झाले.
भाई मालीसिंग
भाई मालीसिंग हे भाई आलीसिंग यांचे सख्खे भाऊ होते आणि त्यांच्याबरोबरच बाबा बंदासिंह बहादूर यांच्या सैन्यात दाखल झाले होते. भाई मालीसिंग यांनाही बाबा बंदासिंग बहादूर यांच्याबरोबर जून 1716 मध्ये दिल्लीत हौतात्म्य प्राप्त झाले.
भाई बाजसिंग
भाई बाजसिंग यांची चप्पडचिडीच्या लढाईत महत्त्वाची भूमिका होती. सरहिंद प्रांत जिंकल्यानंतर बाबा बंदासिंग बहादूर यांनी भाई बाजसिंग यांची सरहिंदच्या सुभेदारपदी नियुक्ती केली होती. नवाबाविरुद्ध लढाईत त्यांनी पराक्रमाची शर्थ केली.
भाई रामसिंग
भाई रामसिंग हे भाई बाजसिंगांचे सख्खे भाऊ होते आणि चप्पडचिडीच्या लढाईचे डावपेच आखण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळेच हे युद्ध जिंकता आले. भाई रामसिंग यांनाही बाबा बंदासिंग यांच्याबरोबर दिल्लीत हौतात्म्य प्राप्त झाले.

1 comment:

  1. बाबा बंदासिंह हे मूळचे कुठून होते? नावावरून पंजाबी वाटतात त्यांचे नांदेडमध्ये आगमन किवा मुक्काम कसा काय? त्यांनी युद्धनीती युद्ध डावपेच इत्यादी विषयांवर माहिती मराठ्यांकडून मिळविली का? इत्यादी विषयांवर अधिक विवेचन करावे.

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी