Wednesday, January 25, 2012

इतिहास विसरल्यास...

इतिहास विसरल्यास प्रेरणा लुप्त होते. प्रेरणा जागी राहिली नाही तर माणसाची अधोगती सुरु होते. माणसे लाचार बनतात. कणाहीन माणसांची समाजात संख्या वाढू लागली की
स्वार्थ बोकाळतो. स्वार्थ बोकाळला की देशभक्ती मागे पडते. देशभक्ती गौण मानणा-यांच्या हाती नेतृत्व आले की देशाचा सत्यानास होतो. याचा दाहक अनुभव या देशाने अनेकदा घेतला आहे.
आज प्रजासत्ताक दिन. या दिवशी वंदे मातरमच्या स्फूर्तीदायी इतिहासाची उजळणी व्हावी यासाठी येथे व्हिडीओ क्लिप्स देत आहे. ही माहिती आवडली तर ब्लॉगची लिंक आपल्या मित्र - परिचितांना अवश्य पाठवा, ही विनंती.
२००७ साली सोलापुरातील वृत्तदर्शन या स्थानिक टीव्ही वाहिनीवर वंदे मातरम या विषयावर सौ. अपर्णा रामतीर्थकर यांनी
माझी मुलाखत घेतली होती. ती येथे देत आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी