Wednesday, July 18, 2012

मोदी सेक्स सीडीसाठी कॉंग्रेसची टास्क फोर्स


मुंबईः कॉंग्रेसने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक स्पेशल टास् फोर्सची स्थापना केली असून मोदींची सेक् सीडी बनविण्याची जबाबदारी या फोर्सला देण्यात आली आहे. हा दावा शिवसेनेने केला आहे. 'दोपहर का सामना' या शिवसेनेच्या वृत्तपत्रामध्ये हा दावा करण्यात आला आहे.
http://www.bhaskar.com/article/NAT-shivsena-claims-congress-is-preparing-modis-fake-sex-cd-3539644.html?HT2=

आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला मोदींची धास्ती वाटत आहे. त्यामुळे मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी ही टास् फोर्स तयार करण्यात आली आहे. मोदींची बनावट सेक् सीडी बनविण्याचे काम फोर्सला देण्यात आले आहे. निवडणुकीच्या तोंडावरच ही सीडी उघड करण्यात येईल, अशी योजना आहे. संगणकतज्ज्ञ आणि डिजीटल एडीटींगचे तंत्रज्ज्ञांचा या फोर्समध्ये समावेश करण्यात आल्याचेही 'दोपहर का सामना'मध्ये म्हटले आहे.

कॉंग्रेसच्या एका सुत्राचा हवाला देऊन 'दोपहर का सामना'मधील बातमीत म्हटले आहे की, या टास् फोर्समध्ये एका तमिळ अभिनेत्रीचा समावेश आहे. तसेच एका पंजाबी महिला पदाधिका-यालाही सहभागी करुन घेण्यात आले आहे. या दोन्ही महिला शपथपत्र देऊन मोदींसोबत संबंध असल्याचे स्विकारतील. तसेच सीडीमध्ये वापर करण्यासही त्यांनी मंजूरी दिली आहे. तमिळ अभिनेत्रीला मुंबईत एक फ्लॅट देण्यात आला आहे. तर पंजाबी महिलेला चंदीगढमध्ये एक बंगला देण्यात आला आहे. याशिवाय एक मोठी रक्कमही त्यांना देण्यात आली आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी