Saturday, July 21, 2012

अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचे दुष्परिणाम

अन्वयार्थ
तारीख: 7/13/2012 10:52:19 PM
अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचे दुष्परिणाम
वर्षानुवर्षांपासून अमरनाथ यात्रा सुरू आहे. पण, कधीही मुसळधार पाऊस, वादळ, बॉम्बहल्ले तथा आतंकवादी हल्ल्यांमुळे यात्रेत खंड पडलेला नाही, उलट दिवसेंदिवस यात्रकरूंच्या संख्येत भरच पडत आहे. हिंदू धर्मातील आंतरिक शक्तीच भक्तांना सांप्रदायिक आणि द्वेषाने भरलेल्या विघटनवादी शक्तींपुढे विनम्रता, साहस आणि दृढतेने ईश्वरभक्तीत तल्लीन ठेवू शकतात. काश्मीर खोर्यातील मूठभर पाकिस्तानवादी विघटनवाद्यांनी सत्तेचा पुरेपूर फायदा उचलून गेल्या अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रा रोखण्याचा, त्यात अडथळे आणण्याचा आणि यात्रेकरूंना निरनिराळे प्रयत्न करून निरुत्साहित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पूर्वी चार महिने चालणारी ही यात्रा आता दोन महिन्यांपर्यंतच सुरू राहते.
त्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारच्या इशार्यावर नाचणार्या अमरनाथ विश्वस्त मंडळाने ही यात्रा ५५, ४८, ४५ आणि आता तर फक्त ३५ दिवसांपर्यंत कमी करून टाकली. याउपरही खोर्यातील विघटनवाद्यांच्या मागण्या जोर पकडू लागल्या असून, आता त्यांनी पर्यावरणाला धोका पोहोचण्याचा मुद्दा उपस्थित करून ही यात्रा १५ दिवसांपेक्षा अधिक काळासाठी चालू नये, अशी भूमिका जोरकसपणे मांडणे सुरू केले आहे.
यात्रेचा एक मार्ग जसा ठऱलेला आहे, अगदी तसाच यात्रेला विरोध करणारा एक सुनिश्चित आणि नियोजनबद्ध दुसरा मार्ग स्पष्टपणे दिसतो आहे. प्रारंभी काश्मीर खोर्यातून काश्मिरी पंडितांना हुसकावून लावून हा प्रदेश हिंदूविहीन करण्यात आला. तेथील अल्पसंख्यक लाख हिंदूंवर अनन्य अन्याय, अत्याचार करून अपमानास्पद रीत्या त्यांना खोर्याबाहेर काढण्यात आले. यानंतर केवळ ज्या पर्यटकांमुळे काश्मीरचा आर्थिक फायदा होईल, त्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, अशाच पर्यटकांसाठी हे नंदनवन खुले ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. तथापि, कुठल्याही पद्धतीने काश्मीर खोर्यात हिंदूंचे अस्तित्व दिसू नये, हेच अमरनाथ यात्रेला विरोध करण्यामागचे मूळ कारण आहे, हे लपून राहू शकले नाही. जगभरात कुठेही अमरनाथ यात्रेसारखी सर्वपंथसमभावाचा संदेश देणारी यात्रा असू शकत नाही. ही यात्रा पुन्हा आरंभ होण्याचे श्रेय एका मुस्लिम फकिराला दिले जाते. या यात्रेतील सर्व कुली आणि घोडेवाले मुस्लिम बांधव असतात. अमरनाथ यात्राकाळातच या सर्वांची वर्षभराची कमाई होऊन जाते. सरकारद्वारे निर्धारित केलेले दर कितीतरी कमी असतात, पण यात्रेकरू त्यापेक्षा कितीतरी अधिक पैसा श्रद्धेपोटी देऊन जातात. यात्रेकरूंकडून होणारा खर्च हाच अमरनाथ यात्रेच्या परिसरात राहणार्या लोकांच्या अर्थव्यवस्थेचा मूळ आधार आहे, हे कुणीही अमान्य करू शकत नाही.
यंदा यात्रेचा कालावधी ६० हून कमी करून केवळ ३९ दिवसांचा झाल्याने यात्रेकरूंना अतिशय अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय त्यांना रांगा लावून जाण्याची नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यामुळे थकवा, उद्विग्नता आणि तणावदेखील वाढत जात आहे. जर रांगेत -१० लोक आहेत तर फारसे काही वाटत नाही. पण समोर १००० लोकांची रांग पाहिली की, माणूस तसाच निराशेच्या गर्तेत जातो. शिवाय रांगांची ही व्यवस्था १० ते ११ हजार फूट उंचीवर असलेल्या बर्फाच्छादित पर्वतीय क्षेत्रात करण्यात आली आहे, जेथे पावसाचा कधी भरवसा नसतो आणि अक्षरशः हाडंदेखील आकुंचन पावतील, असे थंडगार वारे सतत वाहत असतात. यात्रेकरूंना विश्रांतीसाठी तंबूच उपलब्ध नाहीत. त्यामुळे ते लवकरात लवकर निर्धारित स्थानी पोहोचण्यासाठी पर्वतीय क्षेत्रातील जीवघेण्या पायवाटांनी जाण्याचा प्रयत्न करतात आणि दुर्घटना होऊन त्यांच्यावर प्राण गमावण्याची वेळ येते. अशा वेळी त्यांना डॉक्टरी उपचारांची अतिशय गरज असते. पण, उत्साहाच्या भरातील यात्रेकरू लोकांच्या गर्दीत हरवून गेलेल्या डॉक्टरांची वाट पाहण्याऐवजी, उगाच वेळ झाला तर भोलेशंकराच्या दर्शनापासून वंचित राहावे लागेल म्हणून, पुढील प्रवासाला निघून जातात. अनेक यात्रेकरू तर भक्तिमार्गात इतके अंध होतात की औषधे घेतल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू होऊन जातो.
यंदा संपूर्ण यात्रेत यात्रेकरूंना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यात्रेकरूंजवळ अस्वच्छ आणि अशुद्ध पाणी पिण्याशिवाय दुसरा चाराच शिल्लक नाही. एक काळ असा होता, देशभरातील लंगरवाले यात्रेकरूंसाठी गरमागरम पुर्या, भाजी आणि हलवादेखील मोफत पुरवायचे. पण, आता या लंगरवाल्यांनाच सरकारी अव्यवस्थेमुळे रस्त्यांवर येण्याची वेळ आली आहे. यात्रेकरूंना शुद्ध पाणी, गरम अन्न, शौचालय आणि प्राथमिक उपचारासाठीसुद्धा विचारायला कुणी तयार नाही. अमरनाथ विश्वस्त मंडळाने यात्रेकरूंना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य केल्याने समस्यांमध्ये भरच पडली आहे. यात्रेकरूंची विभिन्न स्थानी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर व्यक्ती सशक्त आणि निरोगी आढळली तरच तिला पुढच्या प्रवासाची परवानगी दिली जाते. वैद्यकीय तपासणीची तिथे करण्यात आलेली व्यवस्था आपल्या गावात अथवा शहरात केली जाऊ शकत नाही का, हा प्रश् येथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
ही यात्रा दोन हजार वर्षांपासून सुरू आहे. इसवीसन पूर्व ३२ च्या ग्रंथांमध्येही या यात्रेचा गौरवाने उल्लेख करण्यात आलेला आहे. राजतरंगिणीमध्ये या यात्रेचा विशष उल्लेख आहे. मुस्लिम आक्रमकांच्या काळातही या यात्रेत कधी खंड पडला नाही. अकराव्या शतकात १२ हजार ७५६ फूट उंचीवरील या गुहेतील शिवाच्या दर्शनासाठी गेलेल्या काश्मीरच्या महाराणी सूर्यमतीने तेथे त्रिशूळ अर्पण केले होते. आदी शंकराचार्य, भगवान स्वामिनारायण, स्वामी विवेकानंद आदी महापुरुषांनी अतिशय अवघड अशी अमरनाथची यात्रा केली आहे. ही यात्रा भारताची एकता, प्राचीन परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. जिहादींनी प्रथम .के. ४७ चा उपयोग करून हिंदूंवर हल्ले केले. आता त्यांनी यात्रेचा कालावधी कमी करण्याच्या राज्यपालांच्या अधिकाराचा शस्त्र म्हणून वापर करणे सुरू केलेले आहे. जे सरकार अमरनाथ यात्रेबाबत गांभीर्याने विचार करणार नाही, ती सत्ता भारताच्या एकतेवर आणि अखंडतेवरच नव्हे, तर भारतीय संविधानावरही आघाताचा मार्ग खुला करणारी ठरणार आहे. हा इशारा समजून घेण्याची गरज आहे.
तरुण विजय
(लेखक राज्यसभेचे सदस्य आहेत)
अनुवाद : चारुदत्त कहू


No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी