Wednesday, July 25, 2012

प्रत्येक कुटुंबातून मातृभावनेचा जागर होण्याची गरज

प्रत्येक कुटुंबातून मातृभावनेचा जागर होण्याची गरज
प्रतिनिधी सोलापूर
स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात मातृभावनेला उदात्तता प्रदान केली. अमेरिकेतील वास्तव्यात आणि भारतातही स्वामीजींनी आपल्या आचरणातून मातृशक्तीचा गौरव केला, असे प्रतिपादन र्शद्धा व्यास यांनी केले. भाषणातून व्यास यांनी स्वामी विवेकानंदांचे भावविश्व उलगडून दाखवले. विवेकानंद केंद्र आणि हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संयुक्त विद्यामाने आयोजित व्याख्यानातस्वामी विवेकानंद आणि मातृभावया विषयावर बोलत होत्या.
http://10.94.82.15/epapermain.aspx?edcode=261&eddate=7/25/2012&querypage=4
र्शीमती व्यास यांनी गुरूमाता सारदादेवी आणि आई भुवनेश्वरी देवी यांच्याशी स्वामी विवेकानंदांचे असलेले भावबंध अनेक उदाहरणांनी मांडले. अमेरिकेतील शिष्या जॉर्ज डब्ल्यू हेल, लिओन यांनी स्वामीजींना खूप मदत केली. स्वामीजी त्यांना आई म्हणूनच हाक मारायचे. अमेरिकनांना स्वामीजींचा मातृभाव भिडल्यामुळेच त्यांना पर्वताएवढे यश मिळाले. भगिनी आणि बंधू संबोधण्यामागे भारतीय संस्कृतीचा सार असलेला मातृभावच होता. आज पुन्हा एकदा भारतातील घराघरांतून मातृभावाचे जागरण केल्यास अनेक समस्या आपोआप दूर होतील.

व्यासपीठावर
प्रिसिजनच्या संचालिका सुहासिनी शहा, केंद्राच्या अमृता बदामीकर उपस्थित होत्या. परिचय प्रा. सुलभा घोडके, गीत प्रा. शिवराज पाटील, शांतीपाठ निवेदिता देशपांडे, प्रस्तावना डॉ. मनीषा पाटील तर केंद्र माहिती प्रा. स्नेहा औरसंग यांनी करून दिली. यावेळी नागरिक महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
विवेकानंदांचा मातृभाव
आजच्या स्त्रीभ्रूण हत्यांच्या काळात स्वामी विवेकानंदांचा मातृभाव प्रभावी उत्तर ठरणार आहे. घराघरातून मातृभावाचे जागरण झाले तर आजच्या अनेक समस्या आपोआपच दूर होतील, असे मनोगत सुहासिनी शहा यांनी व्यक्त केले. दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी