Wednesday, August 1, 2012

सार्वजनिक गणेशोत्सवामागील प्रेरणा


पुण्यतिथी
बाळ गंगाधर टिळक
अभिमानाची बाब म्हणजे लोकमान्य टिळक यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना सुचली ती सोलापुरातच. त्यांनी येथे आल्यानंतर र्शी बसवेश्वर तरुण मंडळाच्या गणेशोत्सवाचे सार्वजनिक रूप पाहिले. शेकडो तरुणांचे र्मदानी खेळ, दांडपट्टा फिरवणे आणि उत्साहाला आलेले उधाण पाहून त्यांनी मंडळाचे कौतुक केले.

रामेश्वर विभूते सोलापूर

http://10.94.82.15/images%5Cdnsenlarge.gif
आज आजोबा गणपती या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंडळाची प्रतिष्ठापना सन 1885 मध्ये झाली होती. पुढे टिळकांनी पुण्यात सन 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला चालना दिली आणि आज जगभर हा उत्सव पोहोचला आहे.

यांचा
होता पुढाकार

127 वर्षांपूर्वी
र्शी बसवेश्वर तरुण मंडळाची प्रतिष्ठापना झाली. शुक्रवार पेठेतील महालिंगप्पा वजीरकर, मल्लिकार्जुन कावळे, मल्लिकार्जुनप्पा शेटे, संगनबस्सय्या नंदीमठ, देवबा मंठाळकर, पंचप्पा जिरगे, देशमुख, गणेचारी, पारकर, म्हमाणे, ओणामे, दर्गोपाटील, शिरजीरी, नंद्याळ, आवटे तसेच इतर कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून ही मुहूर्तमेढ रोवली. पुढे 1926 नंतर स्वामी र्शद्धानंद समाजाकडे या मंडळाची धुरा आली.

र्शद्धानंद
समाजाचा मानाचा आजोबा गणपती म्हणून ख्याती झाली. उत्सवापश्चात मूर्ती शुक्रवार पेठेतील र्शी. शेटे यांच्या घरासमोर आणि त्यानंतर त्रिपुरांतकेश्वर मंदिरात ठेवली जायची. तेथेच गणेशोत्सव व्हायचा. 1994 मध्ये माणिक चौकात मंदिर उभारून तेथे प्रतिष्ठापना करण्यात आली.

र्शद्धानंद
समाजाची स्थापना

लाला
मुन्शीराम हे लाहोर हायकोर्टात वकील होते. संन्यास घेतल्यानंतर स्वामी र्शद्धानंद नावाने ते विख्यात झाले. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी मोलाचे योगदान दिले. खिलाफत आंदोलन फसल्यानंतर हजारो हिंदूंची हत्या आणि धर्मांतर झाले. तेव्हा स्वामी र्शद्धानंद धावून गेले. शुद्धीकार्यात स्वत:ला झोकून दिले. 1926 मध्ये अब्दुल रशीद याने त्यांची हत्या केली. त्यानंतर सोलापुरात बंद पाळण्यात आला आणि सिद्रामप्पा फुलारी, रेवणसिद्धप्पा खराडे, नागप्पा शरणार्थी, नागप्पा धोत्री, ईरय्या कोरे आदींनी एकत्र येऊन र्शद्धानंद समाजाची स्थापना केली.

र्शद्धानंद
समाजाची स्थापना झाल्यानंतर केवळ गणेशोत्सव साजरा करता तरुणांमध्ये आत्मविश्वास, उत्साह आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्याच्या दृष्टीने सिद्रामप्पा फुलारी यांनी लाठी, काठी, दांडपट्टा आणि तलवार चालवण्याचे प्रशिक्षण सुरू केले. व्यायामशाळाही उभारली. सक्षम तरुणांचे संघटन हेच ध्येय ठेवण्यात आले. हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी हे या व्यायामशाळेचे व्यवस्थापक होते.

ब्रिटिशांनी
आणली होती बंदी

र्शद्धानंद
समाजाचे कार्य केवळ धार्मिक नाही तर देशातून ब्रिटिशांना हाकलण्याचे कारस्थान होत आहे, असा संशय आल्याने ब्रिटिश सरकारने बंदी आणली होती. महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर कायदेभंग चळवळ सुरू राहण्यासाठी शेठ गुलाबचंद वालचंद यांनी कार्यकर्त्यांना आर्थिक मदत करून स्वातंत्र्य चळवळीला हातभार लावला.

मुस्लिमांचाही
सहभाग

माणिक
चौकातील सुफी संत मगरीब शाह बाबा हे अत्यंत र्शद्धेने या गणपतीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेत असत. बाबा मूळचे इराणचे तरी हैदराबादनंतर येथेच स्थायिक झाले. गणपतीच्या मिरवणुकीत पीरबाबांचा हिरवा झेंडाही असतो.

आता
यांच्या हाती आहे धुरा

र्शद्धानंद
समाज आणि मंदिराची धुरा पाच विश्वस्त आणि 26 कार्यकारणी सदस्यांवर आहे. अध्यक्ष अँड. गौरीशंकर फुलारी, उपाध्यक्ष चिदानंद वनारोटे, खजिनदार चंद्रशेखर कळमणकर, सचिव अनिल सावंत, सहसचिव कमलकांत करमाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली मंडळ कार्यरत आहे.

**************
1906 मध्ये बैलगाडीतून निघाली होती मिरवणूक
बाळ गंगाधर टिळक
http://10.94.82.15/EpaperImages%5C01082012%5CBP2435508-small.jpg
http://10.94.82.15/images%5Cdnsenlarge.gif
चंद्रकांत मिराखोर सोलापूर

लोकमान्य
बाळ गंगाधर टिळक यांचे सोलापूरशी जिव्हाळ्याचे नाते होते. येथील आजोबा गणपतीची मिरवणूक आणि तरुणांचे संघटन पाहून त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना स्फुरली होती. लोकमान्यांवर ब्रिटिशांनी खटला भरला तेव्हा सोलापुरातील त्यांच्या मित्रमंडळींनीच जामीन दिला होता. सन 1906 मध्ये त्यांनी सोलापुरात केलेले भाषण ऐतिहासिक होते. नंतर त्या चौकाचे 1974 मध्ये टिळक चौक असे नामकरण झाले.

शहराच्या
गावठाण भागात मुख्य बाजारपेठ असलेल्या कुंभार वेस, विजापूर वेस, बाळीवेस, तुळजापूर वेसच्या मध्यभागी टिळक चौक आहे. 1906 मध्ये लोकमान्य टिळक सोलापुरात आले तेव्हा ते स्वातंत्र्यसैनिक अण्णाराव पाटील आणि भुतडा यांच्या घरी वास्तव्यास होते. तेव्हा बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप आज टिळक चौक नावाने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी झाल्यानंतर त्यांनी तेथे भाषण केले. भाषणात राष्ट्रहिताची संकल्पना मांडत हिंदूंना संघटित होण्यासाठी आवाहन केले. नागरिकांत देशभक्ती आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी भावना जागविली.

लोकमान्य
टिळकांच्या निधनानंतर सोलापूरकरांना खूप दु: झाले. त्यांचा शहरात पुतळा व्हावा, अशी शहरवासीयांची इच्छा होती. त्या परिसरातील नेते बाबूराव चाकोते यांनी महापौर पदावर विराजमान झाल्यावर टिळकांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला. 19 जून 1974 रोजी तत्कालीन गृहराज्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी खासदार जयंतराव टिळक, महापालिका आयुक्त . भा. ससाणे उपस्थित होते. मूर्तिकार श्याम सारंग यांनी तयार केलेला टिळकांचा पूर्णाकृती पुतळा चौकात दिमाखात उभा आहे.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी