Thursday, February 21, 2013

विवेकानंद, विज्ञान आणि धर्म

डॉ. आर. चिदंबरम्, मुख्य वैज्ञानिक सल्लागार, भारत सरकार
अनेक थोर पुरुषांचे निधन लवकरच झाले आहे. सनातन धर्माचे पुनरुत्थान करणार्‍या श्रीमद्आद्य शंकराचार्यांचे निधन ३२ व्या वर्षी झाले. थॉमस केले यांनी ज्यांचे वर्णन त्यांच्या शतकातील ‘‘आश्‍चर्यकारक प्रतिभावान’’ असे केले त्या थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचेही निधन ३२ व्या वर्षीच झाले. स्वामी विवेकानंदांचे वय मृत्युसमयी ३८ वर्षे होते. या थोर पुरुषांनी अल्प आयुष्यात दरारा निर्माण करणार्‍या गोष्टी साध्य केल्या आहेत. स्वामी विवेकानंदांची जयंती - १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिवस म्हणून भारत सरकारने घोषित केला आहे, जेणेकरुन ज्या तत्वांसाठी व संकल्पीत कार्यासाठी विवेकानंदांनी कार्य केले ते भारतीय युवकांना सतत प्रेरणा देत राहील. विवेकानंद हे शंभर वर्षांपूर्वी होऊन गेले असले तरी ते आधुनिक भारतीय युवकांचे प्रेरणास्थान आहेत. शंका घेणे, तर्ककठोर चिकित्सा करणे, आधुनिक बुद्धीजीविंप्रमाणेच विचार करणे हा स्वभाव असलेला नरेंद्रनाथ नंतर विवेकानंद बनला. नरेंद्रनाथ हा थोर संत आणि योगी श्रीरामकृष्ण परमहंसांच्या संपर्कात आला, जे भारतीय परंपरा, अध्यात्म आणि उपनिषद यांचे घनिभूत प्रतिक होते. रामकृष्णांच्या सानिध्यात नरेंद्रनाथ विवेकानंद झाला. विवेकानंदांनी पुढे आधुनिक परिभाषेत जगापुढे वेदांत मांडला.

शास्त्रज्ञ
("to take the leadership of a Research Institute for Science in India'')Indian Institute of Science, Bangalore२३ नोव्हेंबर १८९८ ला जमशेदजी टाटा यांनी विवेकांनदंाना पत्र लिहिले आहे. भारतातील विज्ञान संशोधन संस्थेचे नतृत्त्व विवेकानंदांनी करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.  हीच संस्था पुढे  या नावाने प्रसिद्धीस आली. जमशेदजी व विवेकानंदांनी १८९३ साली जपान ते अमेरिका एकत्रित प्रवास केला होता. जमशेदजी हे स्टील उद्योग भारतात आणण्याच्या ध्येयाने पछाडले होते. विवेकानंदांनी त्यांना सुचविले की फक्त साधनसामग्री आणून चालणार नाही तर तुम्हाला ‘साधनसामग्रीचे तंत्रज्ञान भारतातच उभे करता आले पाहिजे.’’ दूरदृष्टीची सूचना ! व्यावसायिक संशोधकसुद्धा यापेक्षा चांगली सूचना करु शकला नसता. म्हणून जमशेदजी अध्यात्मिक प्रेरणा विज्ञानात आणू इच्छित होते. त्यांनी विवेकानंदांना पाठविलेल्या आमंत्रण पत्रात म्हटले आहे, ‘‘(विज्ञान संशोधन संस्था उभी करण्यासाठी) ही योजना यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्याशिवाय दुसरे नाव आता माझ्यापुढे नाही.’’

चारित्र्याची आवश्यकता
आज भारताला राजकारण, प्रशासन, व्यवस्थापन, उद्योग, सैन्य आणि संशोधक या सर्वांमध्ये चारित्र्यवान व जे तत्वांशी तडजोड करणार नाहीत अशा नेतृत्वाची आवश्यकता आहे.


स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘तडजोडींपासून सावधान. तम्ही कोणाशी वैर घ्यावे असे मला म्हाणायचे नाही, परंतु तुम्ही सुख-दुःखात स्वतःला स्थिर ठेवले पाहिजे. इतरांच्या सहकार्याच्या लोभाने बदलू नकात.’’ थोर शास्त्रज्ञ आईनस्टाईन म्हणतात, ‘‘खूप लोक समजतात की बुद्धीमत्ता माणसाला संशोधक बनवते पण ते चूक आहेत, चारित्र्य माणसाला थोर संशोधक बनविते.’’ याचा अर्थ असा नाही की, कुणीपण थोर संशोधन करेल. कुशाग्र बुद्धीमत्तेची आवश्यकता आहे पण तेवढेच पुरेसे नाही, चारित्र्य हे त्याहीपेक्षा महत्वाचे आहे. चारित्र्याची व्याख्या सोपी नाही. चारित्र्य म्हणजे एकात्मता, याचा अर्थ व्यक्तीच्या मर्यादेत उत्कृष्टतेचा पाठलाग करणे, अर्थातच आपत्तीपासून संरक्षण करणे, याचाच अर्थ देशहित व समाजहितासाठी समर्पण. न्याय व सामाजिक एकतेसाठी समर्पण. अर्थातच चारित्र्य हे फक्त नेत्यामध्येच हवे असे नाही तर ते प्रत्येक नागरिकाकडे असले पाहिजे.

चारित्र्य आणि साहस
मोहाच्या व दबावाच्या प्रसंगीही चारित्र्य जपण्यासाठी अंगी साहस लागते.
‘‘उठा! शूर व्हा ! बलवान व्हा !’’ हाच विवेकानंदांच्या व्याख्यानात पुन्हा पुन्हा येणारा विचार आहे.
बलशाली होण्याची आवश्यकता हे व्यक्ती व देश दोहोंनाही लागू पडते. देशाचा विकास व देशाचे संरक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संरक्षणाशिवाय विकास हे असुरक्षित आणि दोषपूर्ण आहे तर विकासाशिवाय संरक्षणाला अर्थच नाही. बलशाली असण्याच्या जाणीवेचा सर्वात मोठा फायदा हा की, त्याचा तुम्हाला वापर करावा लागत नाही. ज्ञात दुर्बलतेचा सर्वात मोठा तोटा म्हणजे शत्रुला साहसी बनतो.

आपले कर्तव्य
 भगवद्गीतेने आईनस्टाईन व समरफील्टसारख्या अनेक विख्यात शास्त्रज्ञांना प्रभावित केले आहे. रॉबर्ट ओपेनहिमरने म्हटले आहे की, ‘‘अमेरिकेतील पहिल्या आण्विक चाचणीचा प्रकाश पाहिला तेव्हा मला भगवद्गीतेतील श्‍लोकाची आठवण झाली. ज्या श्‍लोकात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की, जर तू मला माझ्या मूळ स्वरुपात पाहिलेस तर ते तुला हजारो सूर्य एकाच वेळेस पाहण्यापेक्षाही प्रकाशमान असेल.’’
सर्वात जास्त परिचित असणारा गीतेतील श्‍लोक हा आपणास मिळणार्‍या फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य करण्याचा संदेश देतो. पण आपले कर्तव्य काय आहे? दैनंदिन जीवनातली कर्तव्ये विवेकानंदांनी सांगीतले- ‘‘ जे तुमचे सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे ते प्राधान्याने करावे, जे काम हातात आहे ते पूर्ण करावे, अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण आपला विकास साधून बलशाली बनू शकतो. अशा पद्धतीने आपण अशा स्थितीला पोहोचू की जेथे समाजातील सर्वात सन्माननीय यश आणि कर्तव्य पूर्ण करण्याचा अधिकार आपणास प्राप्त होईल.’’

विषमता दूर करणे
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘वासना, उपेक्षा आणि विषमता या तीन गोष्टी गुलामगिरीकडे नेणार्‍या आहेत. त्यामुळे दरिद्य्र दूर करणे, प्रामुख्याने ग्रामीण भागातील दारिद्य्र दूर करणे खूप महत्वाचे आहे.
   
विकसित भारताची माझी व्याख्या अशी आहे की जेव्हा भारताच्या ग्रामीण भागातील जीवनमान हे विकसित देशातील ग्रामीन जीवनाच्या तुलनेने चांगले होईल. शासकीय स्तरावरून आणि विविध संघटनांच्या माध्यमांतून असे प्रयत्न सुरू आहेत. त्यापैकी एक म्हणजे ग्रामीण तंत्रज्ञान कृति दल. या माध्यमातून विविध संघटनांनी काही तंत्रज्ञान कार्यवाहीत आणले आहे. अशा ठिकाणी तंत्रज्ञानाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. या दलाचे कार्यालय सध्या देशातील ६ आय.आय.टी.मध्ये आहेत. यांच्या साहाय्याने ग्रामीण भागापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवीले जाते. या दलाच्या सोबत कार्य करणार्‍यांमध्ये आय.आय.टी. चेन्नई सोबत विवेकानंद केंद्रसुद्धा कार्यरत आहे. अद्वैत वेदांत


स्वामी विवेकानंदानी हॉवर्ड विद्यापीठात १८९६ (२५ मार्च) दिलेले सुंदर व्याख्यान हे आधुनिक युवकांसाठी हिंदू धर्मग्रंथाचा सारांश म्हणावा लागेल. ते तीन वैचारिक आणि सांप्रदायीक गटांविषयी बोलतात. एक म्हणजे द्वैत, दुसरे विशिष्टाद्वैत आणि तिसरे म्हणजे अद्वैत. यापैकी भारतातील अधिकांश लोक द्वैत आणि विशिष्टाद्वैत यामध्ये येतात. तुलनेने अद्वैत हे संख्येने कमी आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘माझ्यामध्ये जे सत्य आहे तो देव आहे. देवामध्ये जे सत्य आहे तो मी आहे. अशा रीतीने देव आणि मी यांच्यामधील दरी जोडली गेली आहे.’ विज्ञानाने भौतीक अस्तित्व हे भ्रम असल्याचे सिद्ध केले आहे आणि लहान सहान, स्वार्थी, संकुचिततेवर मात करून अनंताची आणि वैश्‍वीक अस्तित्वाची जाणीव होऊ शकते, जे की अद्वैत वेदांतामध्ये सांगितले आहे, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. हे गहन तत्त्वज्ञान समजायला भरपूर कालावधी लागेल.


वैज्ञानिक नकळतपणे अद्वैत वेदांताच्या वैचारिक धारणेच्या जवळ जवळ आले आहेत. विज्ञानाचे नियम हे वैश्‍विक आहेत. मॅक्सवेलचे विद्युत चुंबकीय समीकरण असेल किंवा स्कॉर डिंगमचे क्वॉंटम मेकॅनिक्सचे समीकरण किंवा सापेक्षवादाचा सिद्धांत, हे काही भौगोलिक मर्यादेमध्ये अडकलेले नाहीत. त्याला जागतिक मान्यता आहे. सापेक्षवादाच्या सिद्धांतानुसार क्वॉंटम मेकॅनिक्समधील वेव्ह पार्टीकल्सची मूलभुत संकल्पना किंवा वस्तुमानाचे ऊर्जेतील व ऊर्जेचे वस्तुमानातील रुपांतरण हे २० व्या शतकाच्या सुरुवातीलाच जगासमोर आले. ज्याला सखोल तात्त्विक आधार आहे. अनेक वैज्ञानिकांच्या मते विज्ञानामध्ये स्थिर असे काहीही नाही. आपण असे मानतो की विज्ञानातील आजचे शोध हे पुढे सुद्धा स्थिर रहाते. पण वेळोवेळी नवीन नवीन शोधामुळे जुन्या शोधामध्ये सुधारणा होतात. ह्या आणि अशा वेगवेगळ्या नैसर्गिक शोधांना आपण दैवी स्वरुप मानतो.
व्यक्तीला मिळालेल्या सांस्कृतिक वातावरणाप्रमाणे व्यक्तीपरत्वे धार्मिक जाणिवा बदलतात. स्वामी विवेकानंदांनी या सर्व जाणिवांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. स्वामी विवेकानंदांनी १०० वर्षांपूर्वी सांगितल्याप्रमाणे आधुनिक विज्ञानामध्ये मग ते सापेक्षवादाचा सिद्धांत असो किंवा विश्‍व उत्पत्तीचा नियम, यात अद्वैत वेदांताच्या विरोधी असे काहीही नाही.

 ही एक कुतुहलाची बाब आहे की, निर्जिव वस्तुमधील अणू, दूरवर असलेली आकाशगंगा आणि आपले असलेले अस्तित्व हे सर्व एकाच नियमाने नियंत्रित आहेत. परब्रह्माच्या संकल्पनेचा हाच आधार नाही काय? स्वामी विवेकानंद म्हणतात, सगळीकडे एकच अस्तित्व आहे, हा वेदांताचा गाभा आहे. प्रत्येक जीव हा पूर्ण आहे. त्या अस्तित्वाच एखाद तुकडा नव्हे.
थोड्याशा विनोदाने आणि गंमतीशीरपणे स्वामी विवेकानंद म्हणतात की, ग्रह-तारे आणि अशा रहस्यमय गोष्टी या दुर्बल मनाची लक्षणे आहेत. म्हणून तुमच्या मनात असे विचार येऊ लागले की तुम्ही तात्काळ डॉक्टरांकडे जा आणि चांगला आहार घेऊन थोडी विश्रांती घ्या, कसे.
स्वामी विवेकानंदांना उपासनापद्धतींमधील भिन्नता तेवढी महत्त्वाची वाटत नाही. ते म्हणतात, ‘सर्व उपासनापद्धतींचा अभ्यास केल्यानंतर आपणास कळते की त्यांची तत्त्वे एकच आहेत.
११ सप्टेंबर १८९३ ला शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील व्याख्यानानंतर, न्यूयॉर्क हेरॉल्ड दैनिकाने लिहिले होते, ‘विवेकानंद हे निर्विवादपणे सर्वधर्म परिषदेतील थोर व्यक्तिमत्त्व आहे. त्याना ऐकल्यानंतर असे वाटले की, ख्रिस्ती धर्मप्रचारकांना त्यांच्या या सुशिक्षित देशात पाठविणे हा मूर्खपणा आहे.’
विकसित देश म्हणून भारत
लवकरात लवकर आपण विकसित देश बनू. जर आपण महान सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा एकत्रितपणे जपू शकलो तर नक्कीच आपण एक महाशक्ती बनू.
माझ्या युवक मित्रांनो,
जगाला देण्यासाठी भारताकडे महान आध्यत्मिक संदेश आहे, जो की स्वामी विवेकानंदांनी शतकापूर्वी देण्याचा प्रयत्न केला होता. हे आपण करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. ते आपणास एका बलशाली, स्वतंत्र, पंथनिरपेक्ष, लोकशाहीवादी, विकसीत भारताकडून जगाला द्यायचे आहे.
भारताला विकसित व्हायचे असेल आणि तसेच राहवयाचे असेल तर आर्थिकदृष्ट्या विकसित पण वैज्ञानिक दृष्ट्या आधुनिक आणि सैन्य बलाच्या दृष्टीने सुद्धा बलशाली रहावे लागेल.

तुमच्यासमोर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून भारताला विकसित करण्याचे आव्हान आहे. तसेच राष्ट्रीय संपत्ती निर्माण करणे. आपल्या लोकांचा जीवनमानाचा दर्जा उंचावणे; विशेषत: ग्रामीण भागातील लोकांचा. राष्ट्रीय सुरक्षितता वाढविणे आणि त्याचवेळी आपला महान सांस्कृतिक आणि अध्यात्किम वारसा जपणे हे मोठे आव्हान आहे. जेव्हा भावी भारतातून पुढील स्वामी विवेकानंद येतील तेव्हा त्यांचा संदेश हा जगामध्ये वेगाने पसरेल.
साभार : युवा भारती

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी