Thursday, April 4, 2013

बराक ओबामांची योगासनांना पसंती


वॉशिंग्टन। दि. १ (वृत्तसंस्था)
हिंदुत्ववादास चालना मिळत असल्याचे सांगून अमेरिकेतील काही शाळांनी योगाविरोधी भूमिका घेतली असताना व्हाईट हाऊसने मात्र लाभदायी शारीरिक कसरत म्हणून योगाचा मन:पूर्वक अंगीकार केला आहे.


पारंपरिक इस्टर एग रोल समारंभात सहभागी होणारी मुले आणि त्यांच्या पालकांसाठी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि प्रथम महिला मिशेल ओबामा यांनी योगाचे सत्रही ठेवल्याचे व्हाईट हाऊसने गेल्या आठवड्यात घोषित केले होते. या आणि प्रशिक्षित मार्गदर्शकांकडून योगसत्राचा आनंद लुटा, असे आवाहनच व्हाईट हाऊसने केले होते. तंदुरुस्त राहा, सक्रिय राहा आणि स्वत:ला ओळखा, अशी या सत्राची थीम आहे.
ओबामा यांच्या निवासस्थानी ईस्टरनिमित्त योगाचे सत्र ठेवले जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. मात्र, शाळेत योगा शिकविण्याविरुद्ध कॅलिफोर्नियातील एका न्यायालयात याचिका दाखल झालेली असल्याने यावर्षीच्या व्हाईट हाऊसमधील योगा सत्राला विशेष महत्त्व आले आहे. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. विशेष म्हणजे ज्या न्यायाधीशांसमोर ही याचिका सुनावणीस आली ते स्वत: योगा करतात. यावरूनच अमेरिकेच्या मुख्य प्रवाहात योगाची पाळेमुळे किती घट्ट रोवली गेली आहेत हे दिसून येते.
मी स्वत: योगा करतो. त्याची कोणाला काही अडचण आहे का, असे विचारत न्यायाधीश जॉन मेयर यांनी सुनावणी सुरू केल्याचे सांगण्यात येते.


http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-01-04-2013-f659a&ndate=2013-04-02&editionname=main

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी